हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात? तज्ज्ञांनी सांगितलं सत्य
केस गळण्याची समस्या सामान्य झाली आहे. आजकालच्या धकाधकीच्या आयुष्यात केसांची काळजी घेणे सर्वांनाच जमत नाही. पण केस गळण्याचं अजून एक कारण समोर आलं आहे ते म्हणजे हेल्मेट घातल्याने केस गळतात, पण याबद्दल तज्ज्ञ काय म्हणतात ते जाणून घेऊयात.

आजकाल केस गळण्याची समस्या सामान्य झाली आहे. आजकालच्या धकाधकीच्या आयुष्यात केसांची काळजी घेणे सर्वांनाच जमत नाही.शिवाय प्रवास, धूळ, माती किंवा प्रदूषण यामुळे केसांची अवस्था आणखी वाईट होते. तर कधी बदलत्या हवामानामुळे तर कधी अस्वस्थ जीवनशैलीमुळे लोकांना केस गळण्याची समस्या भेडसावत आहे. पण हेस कधी ऐकलं आहे का की हेल्मेट घालण्याचा देखील केसांवर परिणाम होतो. हेल्मेट घातल्याने केसं गळतात. यात नक्की काय सत्य आहे जाणून घेऊयात.
हेल्मेट घातल्याने खरंच केस तुटतात?
हेल्मेट घालून बराचवेळी प्रवास केला तर केसात नक्कीच घाम येतो, ऑक्सिजन कमी पडतो त्यामुळे केसांची मुळे कमकुवत होऊ लागतात आणि त्यामुळे केसं गळणे सुरु होते.
तसेच हेल्मेट जर डोक्याच्या आकारापेक्षा लहान असेल तर ते काढताना केस ओढली जातात त्यामुळे देखील केस गळण्याचं प्रमाण हळू हळू वाढू लगातं.
तर कधीकधी बुरशीजन्य संसर्गाचा धोका देखील असतो. सेलिब्रिटी त्वचारोगतज्ज्ञ दिपाली भारद्वाज म्हणतात की जर तुमचे केस मानेपर्यंत असतील आणि तुम्ही ते व्यवस्थित धुतले नाहीत तर घाम, धूळ आणि घाण त्यावर चिकटते, ज्यामुळे कोंडा, बॅक्टेरियाचा संसर्ग आणि बुरशीजन्य संसर्गाचा धोका वाढतो.
पण जर तुम्ही तुमचे केस स्वच्छ ठेवले तर मात्र हेल्मेट घातल्याने केस गळणार किंवा तुटणार नाही. यासाठी तुम्ही चांगले हेअर जेल लावू शकता, जेणेकरून धूळ आणि घाण केसांना चिकटणार नाही. यासाठी तुम्ही एलोवेरा जेल देखील वापरू शकता.
हेल्मेट घातलेच पाहिजे कारण ते सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. पण त्यावेळी काय काळजी घ्यावी ते पाहुयात?
तुम्ही हेल्मेट घालता तेव्हा केसांना तेल लावू नका. तसेच, जेव्हा तुम्ही हेल्मेट घालता तेव्हा ते काढल्यानंतर तुम्ही गुलाबपाण्याचा स्प्रे किंवा केसांना हलके पाणी देखील लावू शकता.
तसेच हेल्मेट थेट डोक्यात घालण्यापेक्षा केसांना आधी सुती , मऊ असा एखादा रुमार बांधा. संपूर्ण माथा झाकला जाईल असा रुमाल बांधा आणि मग त्यावर हेल्मेट घाला म्हणजे हेल्मेट घालताना किंवा काढताना केस तुटणार नाही.
एकंदरितच केसांची काळजी कशी घ्यावी?
दोन प्रकारचे शॅम्पू वापरू शकता. एक अँटी-डँड्रफ आणि एक सामान्य शॅम्पू वापरा. दमट हवामानात, जेव्हा केसांना जास्त घाम येतो, तेव्हा आठवड्यातून एकदा अँटी-डँड्रफ शॅम्पू वापरा आणि उर्वरित दिवसांमध्ये सामान्य शॅम्पू वापरा.
केसांना तेल लावू नका दीपाली भारद्वाज यांनी सांगितले की, हेल्मेट घालण्याआधी केसांना तेल लावू नका कारण त्यामुळे डोक्यावर बॅक्टेरिया चिकटू शकतात. त्याऐवजी तुम्ही केसांवर जेल वापरू शकता. जर तुम्ही केसांवर कोणताही उपचार घेत असाल तर रात्री ते प्रोडक्ट लावा आणि सकाळी सामान्य पाण्याने केस धुवा कारण आपण दररोज शाम्पू लावू शकत नाही.
डॉक्टरांचा सल्ला दरम्याम केस गळण्याचे प्रमाण जास्तच वाढलं असेल तर डॉक्टरांचा सल्ला नक्कीच घ्या. कारण जर इतर कोणती समस्या असेल तर ती चेकअपदरम्यान समजून येईल.
