AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tulsi | चुकूनही चावून खाऊ नका तुळशीची पाने, अन्यथा होऊ शकते नुकसान!

तुळशीच्या पानांमध्ये अँटी-बॅक्टेरियल घटक असतात, जे खोकला, सर्दी, पडसे यासारख्या समस्यांना आपल्यापासून दूर ठेवतात आणि श्वसन प्रणालीला अधिक बळकट बनवतात.

Tulsi | चुकूनही चावून खाऊ नका तुळशीची पाने, अन्यथा होऊ शकते नुकसान!
तुळस
| Updated on: Feb 10, 2021 | 3:15 PM
Share

मुंबई : धार्मिकदृष्ट्या, तुळशीची रोपटे अतिशय पवित्र मानले जाते. असा विश्वास आहे की, घरात हे रोपटे ठेवल्याने नकारात्मकता दूर होते, तसेच कुटुंबात आनंद आणि समृध्दीचे वातावरण तयार होते. तुळस या वनस्पतीचे महत्त्व जितके धार्मिकदृष्ट्या आहे, तितकेच आयुर्वेदातही आहे, याबद्दल आपल्याला माहित आहे का? तुळशीला आयुर्वेदात एक औषधी वनस्पती म्हटले जाते, जी एखाद्या व्यक्तीला अनेक आजारांपासून वाचवते. जर, आपल्याला दररोज रिकाम्या पोटीवर तुळसची पाच पाने खाण्याची सवय असेल, तर तुमची रोगप्रतिकार शक्ती मजबूत होईल आणि कोणतेही आजार तुमच्या अवतीभोवती फिरकणार देखील नाहीत. मात्र, ही आरोग्यदायी पाने कधीही चावून खाऊ नयेत. चला तर याबद्दल अधिक जाणून घेऊया…( Don’t chew tulsi leaves it is harmful for teeth)

तुळशीचे आरोग्यदायी गुणधर्म :

– तुळशीच्या पानांमध्ये अँटी-बॅक्टेरियल घटक असतात, जे खोकला, सर्दी, पडसे यासारख्या समस्यांना आपल्यापासून दूर ठेवतात आणि श्वसन प्रणालीला अधिक बळकट बनवतात. याशिवाय तुळशीची पाने पाचन समस्या दूर करतात.

– तुळशीच्या पानांमध्ये असलेले अ‍ॅडाप्टोजेन ताण कमी करण्याचे काम करते. याचे नियमित सेवन केल्याने रक्त परिसंचरण सुधारते आणि नर्व्हस सिस्टीमला आराम मिळतो. तुळशीची पाने डोकेदुखीमध्ये देखील आराम देतात.

– जर आपल्याला बर्‍याचदा अॅसिडीटी, गॅस आणि अपचन यासारख्या समस्या उद्भवत असतील, तर तुळशीच्या पानांचा रस नियमित सेवन केल्यास बराच आराम मिळतो. यामुळे, शरीराची पीएच पातळी देखील संतुलित राहते (Don’t chew tulsi leaves it is harmful for teeth).

– तुळस आपल्या शरीरास डिटोक्स करते आणि चयापचय दर वाढवते. तुळशीची पाने वजन कमी करण्यासही उपयुक्त ठरतात.

– मुख दुर्गंधीचा त्रासही तुळशीच्या पानांनी नाहीसा होतो. जर तुम्ही दररोज सकाळी तुळशीची पाने रिकाम्या पोटी खाल्ली तर, ती तोंडातील बॅक्टेरिया काढून टाकतात आणि तोंडातून येणाऱ्या दुर्गंधीचा त्रास दूर करतात.

कसे कराल सेवन?

रात्री तुळशीची चार ते पाच पाने एका भांड्यात भिजत घाला. सकाळी रिकाम्या पोटी पाण्यासह ही पाने थेट गिळा. जर आपण पाने थेट गिळू शकत नसाल तर, ते पाणी प्या. आणि त्यातील पाणी पुन्हा काही पाणी टाकून उकळवा, नंतर ते फिल्टर करा आणि चहासारखे प्या.

चुकूनही चावू नका तुळशीचे पान!

बरेच लोक तुळशीची पाने चवतात आणि खातात, अशी चूक करू नका. कारण तुळशीच्या पानांमध्ये पारा आढळतो. आपल्या दातांच्या आरोग्यासाठी तो योग्य मानला जात नाही. जर तुळशीची पाने नियमितपणे चावून खाल्ली गेली तर, त्यामुळे आपले दात कमकुवत आणि खराब होऊ शकतात.

(Don’t chew tulsi leaves it is harmful for teeth)

हेही वाचा :

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.