रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी प्या काळ्या मिरीचे पाणी, वाचा अधिक फायदे !

| Updated on: May 21, 2021 | 10:11 AM

रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी काळी मिरी फायदेशीर आहे. काळी मिरी एक शक्तिशाली अँटी-ऑक्सिडंट आहे.

रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी प्या काळ्या मिरीचे पाणी, वाचा अधिक फायदे !
काळ्या मिऱ्याचे पाणी
Follow us on

मुंबई : रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी काळी मिरी फायदेशीर आहे. काळी मिरी एक शक्तिशाली अँटी-ऑक्सिडंट आहे. ज्यामुळे सर्दी आणि खोकला कमी होण्यास मदत होते. कफ प्रकृतीसाठी काळी मिरी खूप फायदेशीर मानली जाते. काळी मिरीत लोह, पोटॅशियम, मॅग्नेशियम, मॅंगनीज, जस्त, क्रोमियम, व्हिटामिन ए आणि इतर पोषक गुणधर्म आढळतात. दररोज सकाळी रिकाम्या पोटी आपण काळी मिरीचे पाणी घेतले पाहिजे. (Drink Black pepper water to boost the immune system)

सात ते आठ काळी मिरी घ्या आणि एक ग्लास पाणी घ्या. मंद आचेवर पाणी गरम करायला ठेवा. साधारण वीस ते तीस मिनिटे हे पाणी उकळूद्या. त्यानंतर हे पाणी गरम असतानाच प्या. हे पाणी दररोज पिल्याने आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. सतत खोकल्यामुळे त्रास होत असल्यास, काळीमिरीच्या 4-5 दाण्यांसह 15 मनुका चावून खाल्ल्याने आराम मिळेल. जर घसा बसला असेल, तर तूप, साखर आणि मिरपूड मिसळून त्याचे चाटण तयार करा. जर तुम्हाला सतत खोकल्याचा त्रास होत असेत तर काळीमिरीचा वापर करून तुम्ही या समस्येतून मुक्त होऊ शकता.

काळीमिरी सेवन केल्याने 3 ते 4 दिवसांतच फरक दिसून येईल. गॅसची समस्या असल्यास काळी मिरी हा रामबाण उपाय आहे. एक कप पाणी घेऊन त्यामध्ये अर्धा चमचा लिंबाचा रस, अर्धा चमचा काळी मिरी पूड आणि अर्धा चमचा काळं मीठ याचं काही दिवस सेवन केल्याने गॅसची समस्या दूर होते. खोकला येत असेल तरी सुद्धा काळी मिरी लाभदायक ठरते. अर्धा चमचा काळी मिरी पूड आणि अर्धा चमचा मध एकत्र करुन खाल्याने खोकला दूर होतो.

काळी मिरीमध्ये रायबोफ्लेविन, थायामिन, पोटॅशियम, सोडियम, फॉलेट, बेटेन आणि नियासिन हे घटकदेखील आढळतात. अपचनाची समस्या निर्माण होत असेल तर, लिंबाचा अर्धा तुकडा घेऊन त्यातील बिया काढून टाका. त्यात काळे मीठ आणि मिरपूड भरून गरम करा आणि चोखा. याने अपचनाची समस्या दूर होईल. फुफ्फुसात आणि श्वसन नलिकांमध्ये संसर्ग झाल्यास आपण काळीमिरी आणि पुदीना युक्त चहा पिऊ शकता.

(टीप : कोणत्याही उपचारापूर्वी डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Weather change sickness । बदलत्या हवामानात चुकूनही करु नका या 5 चुका, आजारी पडाल

Summer Drink : मनाला ताजेतवाने करण्यासह त्वरित उर्जा देईल मँगो लस्सी, आपणही करा ट्राय

(Drink Black pepper water to boost the immune system)