वाढलेले वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करत आहात? मग सफरचंद खा…

सफरचंद खाणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. सफरचंदमध्ये कँलरी कमी असून विटामिन सी, मिनिरल्सबरोबर फायबरची मात्रा जास्त प्रमाणात असते.

वाढलेले वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करत आहात? मग सफरचंद खा...

मुंबई : सफरचंद खाणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. सफरचंदमध्ये कँलरी कमी असून विटामिन सी, मिनिरल्सबरोबर फायबरची मात्रा जास्त प्रमाणात असते. त्यामुळेही वजन कमी होण्यास मदत होते. जर, आपण वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल, तर सफरचंद सालासमवेत खाण्याचा प्रयत्न करा. या फळाच्या सालीमध्ये ओरसोलिक आम्ल हा एक आवश्यक कंपाऊंड असतो, जो लठ्ठपणाशी लढायला मदत करतो. (Apples are beneficial for weight loss)

बर्‍याच बाबतीत असे दिसून आले आहे की, सफरचंदावर कीटकनाशके फवारलेली असतात. अशावेळी साल न सोलता सफरचंद खाणे आरोग्याच्या दृष्टीने धोकादायक ठरू शकते. तज्ज्ञांच्या मते, प्रथम सफरचंद धुवावे आणि नंतर त्यांना एका तासासाठी पाण्यात भिजवत ठेवावे. नंतर त्या सालीवरील कीटकनाशक आणि मेणाचा ठर काढून टाकण्यासाठी त्यांना कोमट पाण्याने 2-3 वेळा धुवावे.

सफरचंदच्या सालीमध्ये विरघळणारे आणि न विरघळणारे दोन्ही प्रकारचे फायबर असतात, ज्यांचे नियमितपणे सेवन केल्यास बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते. याव्यतिरिक्त, विरघळणाऱ्या फायबरमुळे आपले पोट बऱ्याचवेळासाठी भरलेले राहते आणि कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते. फायबर आपल्या आतड्यात असणाऱ्या अनुकूल बॅक्टेरियांच्या वाढीसाठीदेखील मदत करते.

बर्‍याच लोकांना असे वाटते की, रिक्त पोटी सफरचंद खाणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. परंतु तसे नाही, जर आपणही या सवयीचे अनुसरण करत असाल, तर आजच त्यात बदल करा. रिकाम्या पोटी सफरचंद खाल्ल्याने हृदयरोग होण्याचा धोका वाढतो. सफरचंदांमध्ये ग्लूकोज आणि फ्रुक्टोज हे घटक भरपूर प्रमाणात असतात.

ग्लूकोज शरीरातील रक्तात विरघळून जातो. परंतु, फ्रुक्टोज शरीरात जमा होते आणि आपल्या यकृतावर गंभीर परिणाम करतो. फ्रुक्टोजच्या जास्त साठून राहिल्यामुळे, ट्रायग्लिसेराइड्सची चरबी जमा होते. जी हृदयरोगाचा धोका वाढवण्यासाठी जबाबदार आहे.

संबंधीत बातम्या : 

पायांना सतत दुर्गंध येतोय? मग ‘या’ घरगुती टिप्स ट्राय करा नि समस्येतून मुक्त व्हा!

एकदा उकळवलेले दूध पुन्हा उकळवण्याची चूक करताय? होऊ शकते मोठे नुकसान!

(Apples are beneficial for weight loss)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI