कोरोना काळात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी ‘हे’ खास पेय दिवसातून तीन वेळा प्या

कोरोनापासून दूर राहण्यासाठी प्रत्येकजण रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यावर भर देताना दिसत आहे.

कोरोना काळात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी 'हे' खास पेय दिवसातून तीन वेळा प्या
काढा

मुंबई : कोरोनापासून दूर राहण्यासाठी प्रत्येकजण रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यावर भर देताना दिसत आहे. मात्र, रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आहार जास्त प्रमाणात घेतला जात आहे. यामुळे वजन देखील वाढण्याची समस्या निर्माण झाली आहे. मात्र, आज आम्ही तुम्हाला असे एक खास पेय सांगणार आहोत. ज्यामुळे तुमची रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढेल आणि तुमचे वजन देखील वाढणार नाही. (Drink this special drink three times a day to boost the immune system)

हे खास पेय खरी तयार करण्यासाठी आपल्याला लागणार आहे. चार तुळशीची पाने, चार पुदिन्याची पाने, हिंग, मध दोन चमचे, काळी मिरी चार, लवंग पाच, कढीपत्ताची चार पाने, गुळ चार चमचे आणि आद्रक हे तयार करण्यासाठी तीन ग्लास पाणी गॅसवर गरम करण्यासाठी ठेवा. त्यामध्ये सुरूवातीला तुळशीची, पुदिन्याची आणि कढीपत्ताची पाने मिक्स करा हे दहा मिनिटे चांगले उकळूद्या. त्यानंतर यामध्ये काळी मिरी, हिंग, लवंग आणि गुळ मिक्स करा. परत दहा मिनिटे उकळूद्या आणि शेवटी यामध्ये मध मिक्स करा आणि प्या. हे पाणी आपण दिवसातून तीन वेळा पिले पाहिजे.

हे आपण एकदाच तयार करून ठेऊ शकतो. मात्र, जेंव्हा हे प्यायचे आहे तेंव्हा ते गरम करून घ्या. या खास पेयामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती चांगली होते. तुळशीचे पाने, दालचिनी, सुंठ, काळे मिरे हे सर्व एकत्र वाटून त्याची पावडर बनवा. त्याच्यापासून 4 ग्रॅमची टी-बॅग किंवा 500 मिलिग्रॅम पावडरच्या गोळ्या तयार करा. दिवसातून एक किंवा दोन वेळा याला 150 मिलीलिटर उकळलेल्या पाण्यात घालून चहासारखं प्या. याचा फायदा आपल्या आरोग्यासाठी नक्की होईल. ताप किंवा सर्दी असेल तर तुम्ही हा काढा दिवसातून चार वेळा घेऊ शकतात.

जर तुम्ही रक्तदाबाचे रुग्ण असाल तर, डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय कधीही काढा पिऊ नये. यामुळे नाकातून रक्तस्त्राव होऊ शकतो आणि आपण मोठ्या समस्येत अडकू शकाल. काढ्यात मसाल्याच्या पदार्थांचा समावेश असतो. अनेकजण डॉक्टरांचा सल्ला न घेता इंटरनेटवर पाहून घरी काढा तयार करत आहेत. पण त्यामुळे अनेक आरोग्यविषयक समस्या उद्भवण्याची शक्यता असते. काळी मिरी दालचीनीच्या अतिसेवनाने पोटदुखीची समस्या निर्माण होऊ शकते.गुळवेळ, अश्वगंधा यांसारख्या औषधीं वनस्पतींच्या ओव्हरडोसमुळे शारीरिक समस्या उद्भवतात.

संबंधित बातम्या : 

Side Effect | केसांना ब्लीच करताय? सावधान…. वाचा काय परिणाम होऊ शकतो

Papaya Seeds Benefit | तुम्ही पपईच्या बिया फेकून देताय…? तर थांबा अगोदर हे वाचा!

(Drink this special drink three times a day to boost the immune system)