झोपण्याआधी दुधात ‘हा’ पदार्थ मिसळून प्या, होतील अनेक फायदे!

आपल्या सर्वांनाच माहिती आहे की, दुध आपल्या आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे

झोपण्याआधी दुधात 'हा' पदार्थ मिसळून प्या, होतील अनेक फायदे!

मुंबई : आपल्या सर्वांनाच माहिती आहे की, दुध आपल्या आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे. मात्र, दररोज रात्री झोपण्याच्या अगोदर एक चमचा बडीशेप गरम दुधात घाला आणि प्या त्याचे अनेक चांगले फायदे आपल्या शरीराला होतील. बडीशेपची गोड चव आणि सुगंधामुळेच लोक ती माऊथ फ्रेशनर म्हणून वापरतात. बडीशेप विविध पदार्थांची चव वाढवण्यासोबतच औषध म्हणून देखील वापरली जाते. (Drinking a combination of milk and Saunf has many health benefits)

बडीशेपमध्ये व्हिटॅमिन सी असून त्यात कॅल्शियम, सोडियम, लोह आणि पोटॅशियम सारख्या आवश्यक पदार्थांचा समावेश आहे. बडीशेपमध्ये फायबर, अँटी-ऑक्सीडंट्स आणि खनिज इत्यादी असतात. शरीरावरील चरबी कमी करण्यासाठी बडीशेप खूप फायदेशीर आहे. यात असलेले आवश्यक तेल आणि फायबर सारखी पोषक तत्त्वे आपल्या शरीरातून टॉक्सिक घटक काढून टाकण्यास मदत करतात, म्हणूनच बडीशेप रक्त शुद्धिकरणासाठी देखील उपयुक्त आहेत.

बडीशेपमध्ये असणाऱ्या नैसर्गिक तेलामुळे अपचन, आतड्यांची सूज आणि बद्धकोष्ठतेची समस्या दूर करण्यास मदत होते. म्हणूनच बडीशेप दूध हे पोटातील आजार बरे करण्यासाठी खूप प्रभावी मानले जाते. यात असलेल्या अ‍ॅस्ट्रॅगल आणि अ‍ॅनिथोलमुळे, हे गॅस, वेदना आणि जठरासंबंधी विकार यांसारख्या पोटाच्या आजारांसाठी एक प्रभावी औषध मानले जाते. दूध व बडीशेप अशा दोन्ही तत्वांमधील आरोग्यवर्धक फायदे शरीराला मिळतात.

बडीशेप घातलेले दूध बनवणे अत्यंत सोपे आहे. एक ग्लास दुधात एक चमचा बडीशेप घालून ते दूध चांगले उकळवून घ्या. नंतर हे दूध प्या. बडीशेप दूध हे पोटातील आजार बरे करण्यासाठी खूप प्रभावी मानले जाते. यात असलेल्या अ‍ॅस्ट्रॅगल आणि अ‍ॅनिथोलमुळे, हे गॅस, वेदना आणि जठरासंबंधी विकार यांसारख्या पोटाच्या आजारांसाठी एक प्रभावी औषध मानले जाते. मसालेदार जेवणामुळे होणारी जळजळ आणि आतड्यांची सूज कमी करण्यासाठी बडीशेप प्रभावीपणे कार्य करते.

संबंधित बातम्या : 

(Drinking a combination of milk and Saunf has many health benefits)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI