उन्हाळ्यात ‘या’ फळांचे रस पिणे ठरेल आरोग्यासाठी गुणकारी !

| Updated on: Apr 16, 2021 | 8:55 AM

सध्या धावपळीच्या युगात स्वत:ला फीट ठेवण्यासाठी अनेकजण वेगवेगळ्या प्रकारच्या फळांचा ज्यूस पितात.

उन्हाळ्यात या फळांचे रस पिणे ठरेल आरोग्यासाठी गुणकारी !
Follow us on

मुंबई : सध्या धावपळीच्या युगात स्वत:ला फीट ठेवण्यासाठी अनेकजण वेगवेगळ्या प्रकारच्या फळांचा ज्यूस पितात. यामुळे शरीराला योग्य ती पोषक तत्वे मिळतात. त्यासोबतच शरीरातील पाण्याची कमतरताही यामुळे भरुन निघते. उन्हाळ्यात तर शरीर चांगले ठेवण्यासाठी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी फळांचा रस पिणे आवश्यक आहे. (Drinking fruit juice in summer is beneficial for health)

उन्हाळ्यात नेमक्या कोणत्या फळांचा रस घ्यावा याबद्दल अनेकांमध्ये संभ्रम निर्माण होतो. चला तर आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत उन्हाळ्यात नेमक्या कोणत्या फळांचा रस घेतला पाहिजे. कलिंगडमध्ये अँटिऑक्सिडेंट्स, जीवनसत्त्वे बी, सी आणि डी मोठ्या प्रमाणात आढळतात. जे उन्हाळ्यात शरीरासाठी खूप महत्वाचे मानले जातात. यामुळे कलिंगडचा रस पिल्ल्याने मन शांत राहते आणि शरीराला उर्जाही मिळते.

उन्हाळ्यात कलिंगडचा रस पिण्याचा सल्ला डाॅक्टर देतात. कलिंगडचा रस पिल्याने शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित राहते. ज्यामुळे आपल्याला हृदयाशी संबंधित आजारांचा धोका कमी होतो. उन्हाळ्यात शरीरात पाण्याची कमतरता असू नये. कारण पाण्याचे प्रमाण कमी होताच आपण आजारी होऊ शकतो. म्हणून शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी कलिंगडचा रस हा एक उत्तम पर्याय मानला जातो. कलिंगडचा रस पोट थंड ठेवते आणि शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होत नाही.

किवी कमी कॅलरीज असणारे एक पौष्टिक फळ आहे. किवीमध्ये फोलेट आणि पोटॅशियम देखील आढळतात. किवी खाल्ल्याने पाचन शक्तीत वाढ होते. तसेच शरीरातील कोलेस्ट्रॉल नियंत्रित करते. किवीमुळे सेरोटोनिन हार्मोन्स वाढतात. हे हार्मोन्स शांत झोपेसाठी खूप महत्त्वाचे मानले जातात. किवीमध्ये व्हिटॅमिन सी, अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म आहेत.

उन्हाळ्यात किवीचा रस पिणे आरोग्यासाठी फायदेशीर असतो. किवीमध्ये व्हिटॅमिन ई आणि अ‍ॅन्टिऑक्सिडंट घटक मुबलक असतात. यामुळे त्वचेचे आरोग्य सुधारण्यास मदत होते. यामुळे त्वचा मुलायम होण्यास मदत होते. त्वचेची कांती सुधारते. किवीच्या फळामुळे आतड्यांचं आरोग्य सुधारण्यास मदत होते.

आंब्यामध्ये व्हिटॅमिन ए, सी सोबतच कॉपर, झिंक, पोटॅशियमसारखे अनेक मिनरल्स असतात. जे आपल्या आरोग्यासाठी खुप फायदेशीर आहेत. यामुळे उन्हाळ्यात किमान एक ग्लास तरी दररोज आंब्याचा रस पिला पाहिजे. आंब्यामध्ये ए,बी आणि सी ही तिन्ही जीवनसत्वे असतात. याशिवायही आंब्यामध्ये शरीराला आवश्यक आणि वजन कमी करण्यास उपयुक्त असे अनेक घटक आहेत. फिजिशियनच्यामते, एक सर्वसाधारण आकाराचा आंबा हा बटर किंवा बदामांपेक्षा अधिक पौष्टिक आहे. आंब्यामुळे शरीरातील नसा, टिश्यू व स्नायू मजबूत होतात. तसेच शरीर आतून स्वच्छ होते व रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते.

स्ट्रॉबेरीला बर्‍याच लोकांनी सुपरफ्रूट देखील म्हटले आहे.  1 कप स्ट्रॉबेरीमध्ये सुमारे 85 मिलीग्राम व्हिटामिन सी असते, ज्यामुळे तुमची रोग प्रतिकारशक्ती मजबूत होते. यामुळे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये जास्तीत-जास्त स्ट्रॉबेरीचा रस पिला पाहिजे. याव्यतिरिक्त त्यात हेल्दी फोलेट आणि अँटीऑक्सिडेंट देखील आढळतात, जे हृदयाच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. याशिवाय स्ट्रॉबेरीचा रस पिण्याचा एक फायदा म्हणजे ती नैसर्गिक पद्धतीने आपले दात पांढरे करण्यात मदत करते.

संबंधित बातम्या : 

(Drinking fruit juice in summer is beneficial for health)