AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Lemon Water | स्वादच नाही तर, ‘या’ फायद्यांसाठी लिंबू पाणी पिणे आवश्यक !

लिंबू पाणी पिणे अनेक लोकांना आवडते तर काही लोकांची सुरूवातच लिंबू पाणी पिण्याने होते.

Lemon Water | स्वादच नाही तर, ‘या’ फायद्यांसाठी लिंबू पाणी पिणे आवश्यक !
लिंबू पाणी
| Updated on: Mar 23, 2021 | 10:26 AM
Share

मुंबई : लिंबू पाणी पिणे अनेक लोकांना आवडते तर काही लोकांची सुरूवातच लिंबू पाणी पिण्याने होते. लिंबू पाणी हे असेच एक पेय आहे, जे उन्हाळ्यात तोंडाची चव वाढवण्यासाठी वापरले जाते, परंतु आपणास माहित आहे का की चवी व्यतिरिक्त, लिंबू पाणी शरीरासाठी अनेक प्रकारे फायदेशीर आहे. चला, जाणून घ्या याचे फायदे (Drinking lemon water is beneficial for health)

-लिंबूयुक्त पाणी प्यायल्याने शरीराची प्रतिकारशक्ती सुधारते, परंतु यात साखरेऐवजी गुळ वापरण्याची खबरदारी घेतली पाहिजे. अधिक साखर घालून सेवन केल्याने पोटात आम्लता निर्माण होते.

-सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी दररोज लिंबू पाणी पिल्याने आपल्या शरीराला अनेक फायदे मिळतील लिंबू पाणी पिल्याने चेहरा उजळतो आणि चेहरा चमकदार होतो. त्वचेच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होते.

-याच्या सेवनामुळे नैराश्य आणि तणाव कमी होतो. बर्‍याच संशोधनात असे निष्कर्ष समोर आले आहेत की, शरीर हायड्रेटेड राहिल्यास तणावापासून दूर राहण्यात मदत होते. त्याचबरोबर, शिकंजीमध्ये लिंबाचा वापर केला जातो, जो तुम्हाला ताजेतवाने ठेवण्यात प्रभावी आहे.

-एक चमचा मधात लिंबाचा रस मिसळा आणि मास्क सारख्ये चेहऱ्यावर लावा. लिंबाचा रस मुरुमाचे डाग दूर करण्यास मदत करते. जर तुम्ही डोक्यातील कोड्यामुळे त्रस्त असाल तर लिंबाचा रस, मध आणि नारळ तेलाने केसांची मालिश करा. आपण मालिश केल्यानंतर साधारण 30 मिनिटांनंतर पाण्याने केस धुवा.

‘हे’ ही लक्षात ठेवा! लिंबाच्या पाण्याचे नियमित सेवन केल्याने छातीत जळजळ होण्यास त्रास होऊ शकतो आणि एखाद्या व्यक्तीस आधीपासूनच हा आजार असेल, तर त्यांनी लिंबाच्या पाण्यापासून दूर रहावे. हार्टबर्नला ‘अ‍ॅसिड रिफ्लक्स’ असेही म्हणतात, ज्यात पोटात तयार होणारे अ‍ॅसिड अन्न पचवण्यासाठी अन्ननलिकेकडे परत येते, ज्यामुळे छातीत दुखणे आणि जळजळ जाणवते. असे झाल्यास लिंबासह सर्व आम्ल पदार्थांचे कमीतकमी सेवन केले पाहिजे.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Gulkand Benefit | वजन कमी करण्यापासून ते अनेक समस्यांवर गुणकारी ‘गुलकंद’, जाणून घ्या याचे फायदे..

Constipation Problem | बद्धकोष्ठतेच्या समस्येला तुमच्यापासून दूर ठेवतील ‘हे’ रस, नियमित करा सेवन!

(Drinking lemon water is beneficial for health)

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली