AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उन्हातून आल्यावर लगेच पाणी पिताय? शरीराला होऊ शकतो घातक धोका! वाचा सविस्तर…

कडक उन्हात बाहेरून घरात आल्यानंतर लगेच पाणी पिणं आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतं, असं तज्ज्ञ सांगतात. हेच खरं का? तापलेल्या शरीरात अचानक थंड पाणी प्यायल्याने काय परिणाम होऊ शकतात? आणि पाणी प्यायचं असेल तर किती वेळ थांबायला हवं?

उन्हातून आल्यावर लगेच पाणी पिताय? शरीराला होऊ शकतो घातक धोका! वाचा सविस्तर...
उन्हातून आल्यावर लगेच पाणी पिता का ?Image Credit source: social media
साक्षी कणसे
साक्षी कणसे | Edited By: | Updated on: Apr 28, 2025 | 2:40 PM
Share

उन्हाळ्यात कडक उन्हात बाहेर पडल्यावर शरीराच्या आंतरिक तापमानात मोठी वाढ होते. अशा वेळी घरात आल्यावर थंड पाणी पिण्याची इच्छा होणं स्वाभाविक आहे.पण तज्ज्ञ सांगतात की, लगेच थंड पाणी पिणे आपल्यासाठी धोकादायक होऊ शकतं. हे का घडतं आणि पाणी कधी प्यावं, हे जाणून घेऊया.

उन्हात जास्त वेळ घालवल्यामुळे शरीराचे आंतरिक तापमान वाढलेले असते. अशा स्थितीत शरीराला थंड ठेवण्याचा प्रयत्न करत असताना, जर आपण तात्काळ थंड पाणी प्यालं, तर शरीराच्या तापमानाच्या नैसर्गिक समतोलात बिघाड होऊ शकतो. याचा परिणाम शारीरिक धक्का, रक्तदाब कमी होणे, चक्कर येणे किंवा पाचनाशी संबंधित समस्यांमध्ये होऊ शकतो. याशिवाय, अचानक थंड पाणी पिण्यामुळे पोटात गॅस होणे, घसा बसणे किंवा तोंडात खवखवणे सारख्या त्रासांची शक्यता असते.

तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, उन्हातून आल्यानंतर पाणी पिण्याआधी किमान 5 ते 10  मिनिटे थांबणे आवश्यक आहे. या वेळेत शरीराला थोडं आराम द्या, पंख्याखाली किंवा सावलीत बसून शरीराला शांत होऊ द्या. तसेच, चेहऱ्यावर किंवा हाता-पायांवर हलके पाणी फेकून शरीराचे तापमान कमी करा. यामुळे शरीर थोडं थंड होईल आणि पाणी पिणे सुरक्षित ठरेल. मात्र, थोडे थोडे हळूहळू पाणी प्या. एकदम तासभर पाणी प्यायल्यास पाचनावर दुष्परिणाम होऊ शकतात.

विशेष काळजी घ्या जर तुम्ही खूप वेळ बाहेर होते आणि शरीराला कमी पाणी मिळाले असेल. अशा स्थितीत लगेच थंड, बर्फाळ पाणी पिणे टाळा. हे शरीराच्या हृदय गतीवर आणि पाचनावर परिणाम करू शकते. जर तुम्हाला तहान लागली असेल, तरी थोडं थोडं पाणी प्यायल्यास मळमळ किंवा उलटी होण्याची शक्यता कमी होते.

शरीराचे तापमान सामान्य होण्यापूर्वी थंड पाणी प्यायल्यास उष्माघात होण्याचा धोका अधिक वाढतो. त्यामुळे, उन्हाळ्यात आरोग्याच्या दृष्टीने थंड पाणी पिण्याची योग्य पद्धत आणि सावधगिरी अत्यंत महत्त्वाची आहे.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

Follow Us
मी पुन्हा येईल, मी... फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
Abhijeet Dipake On CM Fadnavis : जेलमध्ये टाकलं तर... मीच तेच म्हणेल जे तुम्ही म्हणायचे; मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल...मुख्यमंत्री फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
Abhijeet Dipke : खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर अभिजीत दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं कौतुक
Abhijeet Dipke : मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; अभिजीत दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं तोंडभरून कौतुक
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ते.....
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ‘वोटचोर ग्यानू’पर्यंत भन्नाट पोस्टर्स होतायेत व्हायरल
दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; शिरसाटांचा विरोधकांना..
Sanjay Shirsat : दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; संजय शिरसाटांचा विरोधकांना थेट सवाल, पुढे म्हणाले...
CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच..
Mumbai CJP Protest : ज्ञानेश कुमारांविरोधात शिवाजी पार्कवर रणकंदन; CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच...
परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी....
Mumbai CJP Protest : परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी;  ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी CJPचं जेलभरो आंदोलन
हे आंदोलन म्हणजे..; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले
Ashish Shelar : हे आंदोलन म्हणजे....; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले...
व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : ठाकरे बंधूंवर विखे पाटलांनी साधला निशाणा
Video : राजकीय प्रतिमा परत मिळवण्यासाठी ठाकरे बंधूं..., विखे पाटलांनी साधला निशाणा