पावसाळ्यात रात्री झोपण्याआधी उंबरठ्यावर किंवा दरवाजात मीठ टाका; परिणाम जाणून आश्चर्य वाटेल
पावसाळा हा ऋतू म्हणजे सर्वत्र हिरवळ आणि दमट वातावरण असतं. पण त्यासोबतच अनेक समस्या येतच असतात. रात्री झोपताना फक्त उंबरठ्यावर किंवा दरवाजात मीठ टाकून झोपा सकाळी तुम्हाला याचे फायदे नक्कीच दिसून येतील.

वास्तुशास्त्रात मिठाबद्दल अनेक उपाय सांगितलेले आहेत. अनेकदा लोक घरात मीठ असलेले अनेक उपायही करतात. तसेच काहीजण अंघोळीच्या पाण्यातही मीठ टाकून अंघोळ करतात. पण मिठाचा उपयोग हा फक्त वास्तूशास्त्रापुरता मर्यादित नाही तर आपण अनेक घरगुती कामासाठी उपयोगात येत. आणि मिठाचा फायदा हा पावसाळ्यात तर नक्कीच करण्यासारखा आहे.
पावसाळ्यात मिठाचा अनोखा उपयोग: घर आणि आरोग्याचे रक्षण
मीठ हा आपल्या रोजच्या जेवणातील एक अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. मिठाशिवाय जेवणाची आपण कल्पनाही करू शकत नाही. आणि जर जेवणात मीठ कमी असेल किंवा नसेल तर जवेण बेचव लागतं. पण तुम्हाला माहिती आहे का, की मीठ फक्त जेवणासाठीच नाही तर इतर अनेक समस्यांवरही उपयुक्त ठरते? विशेषतः पावसाळ्यात. होय, जसं की पावसाळ्यात घराचा उंबरा, बाथरूमचा उंबरा असेल किंवा दरवाजाच्या फटीजवळ, गॅलरीच्या दरवाजांजवळ जर रात्री झोपताना तुम्ही मीठ टाकलं तर एक असा फायदा तुम्हाला मिळेल ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल.
पावसाळ्यातील आव्हाने
पावसाळा हा ऋतू म्हणजे सर्वत्र हिरवळ आणि थोडं दमट वातावरण असतं. तसेच पावसाळ्यात वातावरणातील आर्द्रता वाढते त्यामुळे डास, माश्या आणि इतर कीटकांचा त्रासही वाढतो. शिवाय हे किटक रात्री घरात येतात. या कीटकांमुळे आजार होण्याची शक्यता असते, विशेषतः डेंग्यू आणि मलेरिया, पोटाचे आजार होण्याची शक्तता असते. त्यामुळे या समस्यांपासून बचावासाठी मीठ हे नक्कीच मदत करेल.
मिठाचा अनोखा उपयोग
मिठाचा वापर आपण सामान्यपणे जेवणात करतो, पण याशिवायही त्याचे अनेक उपयोग आहेत. असाच एक अनोखा उपयोग सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका गृहिणीने मिठाचा हा खास जुगाड तिच्या अकाउंटवरून शेअर केला आहे, जो प्रत्येकाला उपयुक्त ठरू शकतो. तिने सांगितले की, दरवाजाच्या खाली असलेल्या छोट्या फटीतून बाहेरील कीटक, किडे, गोम, मुंग्या लागतात किंवा अगदी सापासारखे धोकादायक प्राणी घरात येऊ शकतात. एवढंच नाही तर पावसाळ्यात बाथरुममध्ये देखील किडे, झुरळ निघतात, आणि ते तेथून घरात येतात. तसेच ग्रामीण भागात राहणाऱ्यांना देखील हा धोका जास्त असतो. या समस्येवर उपाय म्हणून,घराचा उंबरा, बाथरूमचा उंबरा असेल किंवा दरवाजाच्या फटीजवळ, गॅलरीच्या दरवाजांजवळ जर रात्री मीठ टाकल्यास हे कीटक घरात येण्यापासून रोखले जाऊ शकतात.
मिठामध्ये असे कोणते रसायन असतं ज्यामुळे किडे दूर होतात
मिठामध्ये सोडियम क्लोराईड (NaCl) नावाचे रसायन असते, ज्यामुळे किडे दूर होतात. हे रसायन किटकांमध्ये निर्जलीकरण (dehydration) आणि विषबाधा (poisoning) निर्माण करून त्यांना मारते किंवा दूर ठेवते. मीठ हे एक नैसर्गिक कीटकनाशक म्हणून काम करते, विशेषतः लहान कीटकांवर जसे की मुंग्या आणि गोगलगायीवर सुद्धा.
मिठातील सोडियम क्लोराईड (NaCl) किटकांच्या शरीरातील पाणी शोषून घेते, ज्यामुळे त्यांचे निर्जलीकरण होते आणि ते मरतात किंवा दूर जातात. मीठ सहज उपलब्ध असल्याने, ते एक स्वस्त आणि सोपा उपाय आहे.
इतर फायदे
मिठाचा उपयोग केवळ कीटकांपासून बचावासाठीच नाही, तर ते घरातील ओलावा शोषण्यासाठीही उपयुक्त ठरते. यामुळे घरातील आर्द्रता कमी होऊन बुरशी आणि दुर्गंधीपासूनही सुटका मिळते. पावसाळ्यात घर आणि आरोग्याचे रक्षण करण्यासाठी हा मिठाचा जुगाड नक्की आजमावून पाहा. हा छोटासा उपाय तुमच्या घराला सुरक्षित आणि स्वच्छ ठेवण्यात मोठी भूमिका बजावू शकतो!
