चिंता नको… आता ‘या’ घरगुती उपायांनी काढा कपड्यांवरील डाग…

अनेकदा कपड्यांवरील हट्टी डाग काढताना अगदी नाकेनउ येत असतात. डाग निघत नाही म्हणून अगदी नवे असलेले कपडे धुळखात पडलेले असतात. परंतु आता डाग काढून टाकण्यासाठी तुम्ही काही सोपे घरगुती उपाय वापरु शकतात. हे कपड्यांचे डाग पूर्णपणे काढून टाकण्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरेल.

चिंता नको... आता ‘या’ घरगुती उपायांनी काढा कपड्यांवरील डाग...
कपड्यांवरील डाग काढण्याचे घरगुती उपाय
Follow us
| Updated on: Mar 04, 2022 | 11:20 AM

कपड्यांवरील हट्टी डाग (Stubborn stains) काढणे ही गृहिणींसाठी खूप मोठी समस्या असते. अनेक प्रयत्न करुनही हे डाग निघण्याचे नाव घेत नाहीत. अशा वेळी महिलाही मेटाकुटीस येत असतात. अनेक महागडे डिटर्जंट पावडर वापरुनही हे हट्टी डाग निघत नहीत. त्यात, पेनाची शाई, तेलकट, तुपकट डाग मोठ्या प्रमाणात डोकेदुखी ठरत असतात. जर तुम्हाला तुमच्या आवडत्या कपड्यांवरील डाग हटवायचे असतील तर तुम्ही विविध घरगुती उपाय (Home Remedies) करून पाहू शकता. हे उपाय कपड्यांवरील हट्टी डाग दूर करण्याचे काम करतात. जर तुम्हाला तुमच्या कपड्यांवर केमिकल (Chemical) वापरायचे नसेल तर तुम्ही हे सोपे घरगुती उपाय करून पाहू शकता. पांढऱ्या कपड्यांवरील डाग दूर करण्यासाठीही हे फायदेशीर ठरते.

  1. लिंबू आणि मीठ वापरा- हे मिश्रण तयार करण्यासाठी मीठ आणि लिंबाचा रस समान प्रमाणात मिसळा. दोन्ही घटक चांगले मिसळून पेस्ट बनवा. आता ते कापडावरील डाग असलेल्या भागावर पसरवा. मिश्रण डागावर घासून घ्या. यानंतर 1 ते 2 तास उन्हात वाळवा. दर 20 ते 25 मिनिटांनी ते तपासत राहा, जेणेकरून लिंबूमुळे कापड खराब होणार नाही. त्यानंतर ते धुवा. डाग निघालेला असेल.
  2. बेकिंग सोडा आणि लाँड्री डिटर्जंट- डाग पडलेला कपडा आधी थंड पाण्याने धुवून ओला करावा. 3 टेबलस्पून बेकिंग सोडा साध्या पाण्यात मिसळा आणि हे दोन्ही मिक्स करून पेस्ट बनवा. ही पेस्ट डागावर लावा. 30 मिनिटे असेच राहू द्या. त्यानंतर त्यावर लाँड्री डिटर्जंट लावा. त्यानंतर पुन्हा 30 मिनिटे राहू द्या. नंतर वॉशिंग मशिनमध्ये धुवून वाळवा.
  3. भाज्यांचे डाग- कधी कधी कपड्यांवर भाजीचे तेलकट असे डाग पडतात. ते काढण्यासाठी तुम्ही व्हिनेगर वापरू शकता. यासाठी कापडाच्या डागलेल्या भागावर व्हिनेगर लावा. सुमारे 30 मिनिटे सोडा. त्यानंतर ते चांगले चोळून धुवा. कठीण डाग दूर करण्यासाठी फायदेशीर आहे.
  4. शाईचे डाग- अनेकदार पेनामुळे कपड्यांवर शाईचे डाग पडतात. अशावेळी तुम्ही डेटॉल वापरू शकता. डाग पडलेल्या भागावर डेटॉल लावा आणि घासून घ्या. त्यानंतर ते धुवा. हे शाईचे डाग दूर करण्याचे उत्तम काम करेल.
  5. चहाचे डाग- यासाठी बटाटे उकळून घ्या. हे उकडलेले बटाटे तुम्ही भाज्या बनवण्यासाठी वापरू शकता. बाकीचे हे पाणी डाग घालवण्यासाठी वापरू शकतात. बटाट्याच्या पान्यात डाग असलेले कपडे भिजवून ठेवावे. काही काळ तसेच राहू दिल्यानंतर ते पाण्याने स्वच्छ धुवावे.
  6. व्हिनेगर आणि बेकिंग सोडा- पांढऱ्या कपड्यांवरील डाग काढण्यासाठी तुम्ही व्हिनेगर आणि बेकिंग सोडा वापरू शकता. यासाठी दोन्ही एकत्र करून पेस्ट बनवा. त्यानंतर त्यापासून कपडे स्वच्छ करा.

संबंधित बातम्या : 

शरीरात हे बदल दिसताच, तुम्ही वेळीच सावध व्हा; जीवघेण्या आजाराला पडू शकता बळी

World Birth Defects Day: जन्मजात विकार असल्यामुळे जगातील लाखो नवजात बालकांचा मृत्यू होतो, त्यावर हे आहेत उपाय

Non Stop LIVE Update
'त्यांना' शिंदे मुख्यमंत्री म्हणून नको होते, राऊतांचा मोठा गौप्यस्फोट
'त्यांना' शिंदे मुख्यमंत्री म्हणून नको होते, राऊतांचा मोठा गौप्यस्फोट.
आता सरकारच्या दोऱ्या माझ्या हातात, एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?
आता सरकारच्या दोऱ्या माझ्या हातात, एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?.
तसाच गेम शिंदेंसोबत, नारायण राणेंबद्दल फडणवीसांचा मोठा गौप्यस्फोट काय?
तसाच गेम शिंदेंसोबत, नारायण राणेंबद्दल फडणवीसांचा मोठा गौप्यस्फोट काय?.
मुंबईत कुणाचा किती टक्का? मराठी मताचं विभाजन होणार? कोण किंगमेकर ठरणार
मुंबईत कुणाचा किती टक्का? मराठी मताचं विभाजन होणार? कोण किंगमेकर ठरणार.
बीड मतदाससंघात बोगस मतदान? 'ते' 5 व्हिडीओ रोहित पवारांकडून टि्वट
बीड मतदाससंघात बोगस मतदान? 'ते' 5 व्हिडीओ रोहित पवारांकडून टि्वट.
कोटेचांवर पैसे वाटल्याचा आरोप, शिवसैनिकांवर कारवाई अन् ठाकरेंचा इशारा
कोटेचांवर पैसे वाटल्याचा आरोप, शिवसैनिकांवर कारवाई अन् ठाकरेंचा इशारा.
लोकसभेच्या शेवटच्या टप्प्यात 'ठाकरे ब्रदर्स'मध्ये टीकेचा सामना
लोकसभेच्या शेवटच्या टप्प्यात 'ठाकरे ब्रदर्स'मध्ये टीकेचा सामना.
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु.
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव.
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका.