Anti Aging | ‘अ‍ॅण्टी एजिंग फूड्स’चे नियमित सेवन करा आणि वार्धक्य रोखा

| Updated on: Mar 09, 2021 | 10:31 AM

वाढत्या वयाचा त्वचेवरील परिणाम टाळण्यासाठी आपल्या नियमित आहारात काही पदार्थांचा समावेश केला पाहिजे. यात व्हेज आणि नॉनव्हेज असे दोन्ही पर्याय आहेत. (eat ‘Anti Aging Foods’ regularly and prevent aging, know about benefits)

Anti Aging | ‘अ‍ॅण्टी एजिंग फूड्स’चे नियमित सेवन करा आणि वार्धक्य रोखा
‘अ‍ॅण्टी एजिंग फूड्स’चे नियमित सेवन करा आणि वार्धक्य रोखा
Follow us on

मुंबई : कुणालाही आपण कायमच चिरतरुण राहावे, असे वाटते. इतक्यात म्हातारपण नको रे बाबा म्हणत लोक आपले सौंदर्य जपण्यासाठी नाना प्रकारचे उपाय करतात. अनेक जण स्कीन केअर फेस पॅक्सचा वापर करतात. तारुण्याचे सौंदर्य टिकवण्यासाठी स्कीन केअर फेस पॅक्सच वापरला पाहिजे, असे बंधनकारक नाही. इतर उपायही तुम्हाला तारुण्य टिकवण्यासाठी मदत करू शकतात. वाढत्या वयाचा त्वचेवरील परिणाम टाळण्यासाठी आपल्या नियमित आहारात काही पदार्थांचा समावेश केला पाहिजे. यात व्हेज आणि नॉनव्हेज असे दोन्ही पर्याय आहेत. (eat ‘Anti Aging Foods’ regularly and prevent aging, know about benefits)

तीन विशेष पदार्थांची महत्त्वपूर्ण मदत

त्वचेवरील वाढत्या वयाच्या खाणाखुणा टाळण्यासाठी आपल्याला तीन विशेष पदार्थांची महत्त्वपूर्ण मदत होईल. यात ऑलिव्ह ऑईल, रेड वाईन आणि डार्क चॉकलेट यांचा समावेश आहे. भारतीय नागरिकांनी आपल्या जेवणात तुपाप्रमाणेच ऑलिव्ह ऑईलचा वापर करावा. डाळीला तडका देण्यासाठी ऑलिव्ह ऑईलचा उपयोग करू नये. प्रत्येक दिवशी रेड वाईनचा छोटासा पॅकदेखील आरोग्यवर्धक ठरणारा आहे. तसेच डार्क चॉकलेटचे एक-दोन पीससुद्धा आपल्या चेहर्‍यावरील वार्धक्य झाकू शकतात. डार्क चॉकलेटमध्ये अ‍ॅण्टीऑक्सीडेंट्स, तर रेड वाईनमध्ये पॉलिफेनॉल्स असतात. अ‍ॅण्टी एजिंग क्रीम्सच्या वापराबरोबरच अ‍ॅण्टी एजिंग फूडचे सेवन करण्यामुळेही तारुण्याचे सौदर्य अबाधित राखता येऊ शकते. यासाठी आहारात दही, मध, केळे, डाळींब, लिंबू, काकडी, गाजर, टॉमॅटो, सलाडचा समावेश केला तर अधिक बरे होईल.

‘ग्रीन टी’चे सेवनही सौंदर्य टिकवण्यासाठी चांगले

‘ग्रीन टी’मुळे केवळ वजनच नियंत्रणात राहते असे नाही. ‘ग्रीन टी’ तुम्हाला स्लीम दिसण्यासाठी उपयुक्त ठरेलच, त्याचबरोबर नियमित ग्रीन टी घेतल्यामुळे त्वचेचे आरोग्यही अबाधित राहते. त्वचेच्या सेल्फ रिपेअरिंग प्रोसेसला गती मिळते. त्वचेला उत्तम ग्लो येतो. चहा आणि कॉफीच्या सेवनाप्रमाणे ग्रीन टीचे नियमित सेवन केल्यामुळे शरीरातील पाण्याची पातळी कमी होत नाही, तर पाण्याची पातळी जैसे थे ठेवते.

कोड मासा

मांसाहार करणार्‍यांनी कोड मासा खाल्ला पाहिजे. हा मासा खाऊन त्वचेवरील वार्धक्याचा परिणाम रोखता येतो. आहारात या माशाचा समावेश करण्यामुळे त्वचा सुंदर बनतेच, त्याचबरोबर नियमित सेवनामुळे त्वचेचा कॅन्सरही टाळता येतो. आहारात बेरी, ब्लॅकबेरीज, चेरी, क्रेनबेरी यापैकी काहीही नियमित ठेवल्यास त्याचाही आरोग्याला खूप मोठा फायदा होऊ शकतो. दुपारचा स्नॅक्स किंवा सकाळच्या नाश्त्यामध्ये याचा जरुर उपयोग करा. बहुतांश बेरीजचे समान गुणधर्म असतात, केवळ चव आणि सुगंध वेगळा असतो. त्याचबरोबर दररोज एक मूठभर ड्रायफ्रुटस खाल्ल्यास आपल्या चेहर्‍याला कुठलीही अ‍ॅण्टी-एजिंग क्रिम लावण्याची गरज भासणार नाही. (eat ‘Anti Aging Foods’ regularly and prevent aging, know about benefits)

इतर बातम्या

JEE Main 2021 Result : जेईई मेन परीक्षेचा निकाल जाहीर, अधिकृत वेबसाईटवर पहा निकाल

JEE Main Result 2021: JEE मेन निकाल जाहीर, 6 विद्यार्थ्यांना 100 एनटीए गुण, महाराष्ट्रातील एक टॉपर