JEE Main 2021 Result : जेईई मेन परीक्षेचा निकाल जाहीर, अधिकृत वेबसाईटवर पहा निकाल

पहिल्यांदाच तब्बल 13 भाषांमध्ये या परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. यात मराठी, हिंदी, इंग्रजीबरोबरच आसामी, बंगाली, कन्नड, मल्याळ्म, उडिया, पंजाबी, तमिळ, तेलगू, उर्दू, गुजराती या भाषांचा समावेश होता. (JEE Main Exam Result Announced, View Result on Official Website)

JEE Main 2021 Result : जेईई मेन परीक्षेचा निकाल जाहीर, अधिकृत वेबसाईटवर पहा निकाल
जाणून घ्या जेईई मेनचा निकाल कधी येणार, अशा प्रकारे तपासू शकाल

नवी दिल्ली : जेईई मेन परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. दिर्घ प्रतिक्षेनंतर नॅशनल टेस्टिंग एजन्सी म्हणजेच एनटीएने या परीक्षेचा निकाल जारी केला आहे. विद्यार्थ्यांना एनटीएच्या jeemain.nta.nic.in या संकेतस्थळाला भेट देऊन किंवा खाली दिलेल्या अधिकृत लिंक्सवर क्लीक करून आपला रिझल्ट पाहता येणार आहे. कोरोना महामारीचे सावट काही प्रमाणात कमी झाल्यानंतर यंदा जेईई मेन परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेला जवळपास 95 टक्के विद्यार्थी बसले होते. 23 फेब्रुवारी ते 26 फेब्रुवारी या कालावधीत ही परीक्षा घेण्यात आली होती. पहिल्यांदाच तब्बल 13 भाषांमध्ये या परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. यात मराठी, हिंदी, इंग्रजीबरोबरच आसामी, बंगाली, कन्नड, मल्याळ्म, उडिया, पंजाबी, तमिळ, तेलगू, उर्दू, गुजराती या भाषांचा समावेश होता. (JEE Main Exam Result Announced, View Result on Official Website)

जेईई मेन परीक्षेनंतर काय, तेही जाणून घ्या

जर आपण टॉप 2,50,000 उमेदवारांपैकी असाल तर आपल्याला जेईई अ‍ॅडव्हान्ससाठी बसण्याची संधी मिळेल. लक्षात ठेवा की, परीक्षा आणखी तीन सत्रांमध्ये घेण्यात येईल. या सत्रांमध्ये आपण आपली गुणवत्ता सुधारू शकता. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला सुरुवातीच्या परीक्षेत चांगले गुण मिळवता आले नाही तर तुम्ही दुसर्‍या परीक्षेत बसून चांगले गुण मिळवू शकता. एनटीएकडून आपल्याला देण्यात आलेल्या तीन सत्रांपैकी ज्या सत्रात सर्वाधिक गुण असतील, त्या सत्राचा विचार केला जाईल. त्या सर्वाधिक गुणांच्या साहाय्याने रँक लिस्ट तयार केली जाईल.

मार्च सत्रासाठी नोंदणीची प्रक्रिया पूर्ण

मार्च सत्राच्या परीक्षेसाठी नोंदणीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. मार्चमध्ये जेईई मेन फेज -2 परीक्षा 15, 16, 17 आणि 18 मार्च रोजी होईल. या परीक्षेचे प्रवेश पत्र लवकरच जारी केले जाईल. जेईई मेन परीक्षेचे प्रवेश पत्र (अ‍ॅडमिट कार्ड) अधिकृत वेबसाइटवर जाऊन डाउनलोड करता येऊ शकते. उमेदवारांना आपला निकाल पाहण्यासाठी लॉग इन करावे लागेल. (JEE Main Exam Result Announced, View Result on Official Website)

इतर बातम्या

CBSE 10th Class Science Exam 2021: दहावीच्या परिक्षेत विज्ञान विषयात स्कोअर करायचा आहे? मग जाणून घ्या या टिप्स

नाशिकमध्ये अंशतः लॉकडाऊन; सर्व शाळा, कॉलेज, कोचिंग क्लासेस पूर्णपणे बंद

Published On - 10:23 pm, Mon, 8 March 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI