AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Foods For Cholesterol : कोलेस्ट्रॉल नियंत्रित करण्यासाठी ‘हे’ 8 पदार्थ आहारात घ्या

सध्या आपण पॅक केलेले आणि बाहेरचे अन्न जात प्रमाणात खातो. यामुळे कोलेस्ट्रॉल वाढण्याची शक्यता असते.

Foods For Cholesterol : कोलेस्ट्रॉल नियंत्रित करण्यासाठी 'हे' 8 पदार्थ आहारात घ्या
निरोगी आहार
| Updated on: May 24, 2021 | 4:21 PM
Share

मुंबई : सध्या आपण पॅक केलेले आणि बाहेरचे अन्न जात प्रमाणात खातो. यामुळे कोलेस्ट्रॉल वाढण्याची शक्यता असते. कोलेस्ट्रॉलच्या वाढीमुळे हृदयविकाराचा झटका देखील येऊ शकतो. तसेच कोलेस्ट्रॉल वाढण्याची अनेक कारणं असू शकतात. म्हणजेच बाहेरचं खाणं, व्यायाम न करणं, तळलेलं अन्न खाणं आणि आरोग्यदायी नसलेली जीवनशैली याला कारणीभूत ठरू शकते. कोलेस्टेरॉल नियंत्रित करण्यासाठी आपण आहारात काही पदार्थांचा समावेश केला पाहिजे. ज्यामुळे आपल्या शरीरातील कोलेस्टेरॉल नियंत्रित राहू शकतो. (Eat these foods to control cholesterol)

अ‍ॅवाकाडो – अ‍ॅवाकाडोमध्ये भरपूर प्रमाणात मोनो सॅच्युरेटेड फॅट, फायबर आणि पोटॅशियम असते. जे आपल्या शरीरातील एचडीएल कोलेस्ट्रॉलची पातळी वाढवते आणि एलडीएल कोलेस्ट्रॉल नियंत्रित करते. म्हणूनच अ‍ॅवाकाडोला ‘सुपर फूड’ असे देखील म्हणतात. अ‍ॅवाकाडो सॅलड आणि इतर पाककृतींमध्ये वापरले जाते.

नारळाचे दूध – नारळाच्या दुधात संतृप्त चरबी असते. हे कोलेस्टेरॉल नियंत्रित करण्यास मदत करते. त्यात लॅरिक अॅसिड असते. हे चांगले कोलेस्ट्रॉल वाढवते. म्हणूनच, कोलेस्ट्रॉल नियंत्रित करण्यासाठी आपण आपल्या आहारात नारळाच्या दुधाचा समावेश करू शकता.

डार्क चॉकलेट – डार्क चॉकलेट फक्त खाण्यापुरतेच मर्यादित नाही. त्याव्यतिरिक्त डार्क चॉकलेटमध्ये भरपूर फायबर, हेल्थी फॅट, लोह, मॅग्नेशियम, अँटिऑक्सिडेंट्स आहेत. जे आपले रक्तदाब कमी करतात आणि एलडीएल कोलेस्ट्रॉल देखील कमी करतात.

ओट्स – आहारात ओट्स असणं फायदेशीर आहे. ओट्स खाल्ल्याने कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रित राहते. यामध्ये ग्लूकोन नावाचा घटक असतो जो आतडे साफ करण्यास मदत करतो.

कांदा – चवीसाठी जेवणामध्ये कांदा वापरला जातो. पण त्याचे अनेक आरोग्यादायी फायदेही आहेत. लाल कांद्या खाल्ल्याने कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रित केली जाऊ शकते.

लसूण – लसूणमध्ये अ‍ॅलिसिन आणि वनस्पती घटक असतात. यामुळे एलडीएल कोलेस्ट्रॉल कमी होतो. याद्वारे रक्तदाब देखील नियंत्रित केला जातो. लसूण खाल्ल्याने हृदयरोग आणि स्ट्रोक टाळता येऊ शकतो.

सोयाबीन – सोयाबीनमध्ये अनेक पोषक घटक असतात. यामध्ये फायबर देखील मोठ्या प्रमाणात असते. याव्यतिरिक्त, त्यात अँटीऑक्सिडंट्स असतात. यामुळे पाचन तंत्र निरोगी राहते. तसेच कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहतो.

बदाम – बदाम खाणे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. त्यात कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम इ. असते. ते रक्तदाब नियंत्रित करण्यात मदत करतात. अक्रोडमध्ये ओमेगा 3 फॅटी अॅसिड असतात. हे हृदय निरोगी ठेवते.

(टीप : कोणताही उपाय करण्यापूर्वी नेहमीच एखाद्या विशेषज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)

संबंधित बातम्या : 

Holi 2021 | रासायनिक रंगानी होऊ शकतो कर्करोगाचा धोका, होळीच्या रंगाचा बेरंग होण्यापूर्वी जाणून घ्या दुष्परिणाम!

Skin Care | चेहऱ्यावरील नको असणाऱ्या केसांमुळे त्रस्त आहात? पार्लर विसरा आणि ‘हे’ उपाय ट्राय करा!

(Eat these foods to control cholesterol)

Follow Us
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ; थेट कारवाईची मागणी; आरोप काय?