उन्हाळ्यात काकडी खाण्याचे ‘हे’ फायदे तुम्हाला माहिती आहेत का? वाचा

| Updated on: Mar 05, 2021 | 1:33 PM

उन्हाळ्यामध्ये आरोग्याची काळजी घेणे खूप महत्वाचे आहे. म्हणूनच, स्वतःला हायड्रेटेड ठेवण्यासाठी आपण वेगवेगळे उपाय करतो.

उन्हाळ्यात काकडी खाण्याचे हे फायदे तुम्हाला माहिती आहेत का? वाचा
Follow us on

मुंबई : उन्हाळ्यामध्ये आरोग्याची काळजी घेणे खूप महत्वाचे आहे. म्हणूनच, स्वतःला हायड्रेटेड ठेवण्यासाठी आपण वेगवेगळे उपाय करतो. पण आज आम्ही तुम्हाला काकडीचे फायदे सांगणार आहोत, जे उन्हाळ्यात आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानले जाते. तसेच काकडी तुम्हाला बर्‍याच आजारांपासून दूर ठेवते. आपण काकडी कोशिंबीरसाठी जास्त वापरतो किंवा जेवताना देखील काकडी खातो. (Eating cucumber in summer has many health benefits)

-काकडीमध्ये बरेच पौष्टिक पदार्थ आढळतात. ज्यामुळे शरीरातील रक्तामध्ये साखरेचे पातळी नियंत्रण राहते. म्हणूनच काकडी खाल्ल्याने मधुमेहावरही नियंत्रण मिळते. म्हणून उन्हाळ्यात काकडी खाण्याचा सल्ला दिला जातो.

-उन्हाळ्यात तर काकडी जास्तीत जास्त खाल्ली पाहिजे. कारण काकडीमध्ये 80 टक्के पाणी आढळते, ज्यामुळे काकडी खाल्ल्याने आपल्या शरीरात पुरेसे पाणी मिळते. याशिवाय काकडीमध्येही जीवनसत्त्वे आढळतात.

-काकडीमध्ये भरपूर कॅलरी असतात काकडी खाल्लाने शरीरामध्ये चरबी निर्माण होत नाही. म्हणूनच काकडी खाल्ल्याने देखील नियंत्रणात राहते. दिवसातून एकदा तरी आपण काकडी खाल्ली पाहिजे.

-उन्हाळ्यात सर्वांचीच त्वचा कोरडी होते. काकडीमध्ये सिलिकॉन, मॅग्नेशियम आणि पोटॅशियमचे प्रमाण भरपूर आहे. हे तीन पौष्टिक घटक त्वचेसाठी आवश्यक आहेत. काकडी खाल्ल्याने त्वचा स्वच्छ होते.

संबंधित बातम्या : 

Oily Skin | उन्हाळ्यात चेहरा तेलकट होतोय? ‘या’ गोष्टींचा वापर केल्यास सर्व समस्या होतील दूर!

Beauty Tips | नखांचा पिवळेपणा दूर करायचाय? मग, ‘या’ टिप्स नक्की ट्राय करा!

(Eating cucumber in summer has many health benefits)