AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दररोज सकाळी नाश्त्यामध्ये अंडी खाणे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर!

अंडी आपल्या शरीरासाठी खूप लाभदायी आहेत. तसेच, त्यात अनेक प्रकारचे पोषक घटक आढळतात. अंडी उच्च गुणवत्तेच्या प्रथिनांचा (High Quality Protine) चांगला स्रोत आहे.

दररोज सकाळी नाश्त्यामध्ये अंडी खाणे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर!
अंडी
Harshada Bhirvandekar
Harshada Bhirvandekar | Edited By: Anish Bendre | Updated on: Apr 02, 2021 | 7:13 AM
Share

मुंबई : अंडी आपल्या शरीरासाठी खूप लाभदायी आहेत. तसेच, त्यात अनेक प्रकारचे पोषक घटक आढळतात. अंडी उच्च गुणवत्तेच्या प्रथिनांचा (High Quality Protine) चांगला स्रोत आहे. अंडी आपल्या स्नायूंच्या तंदुरुस्तीसाठी देखील खूप उपयुक्त आहेत. याव्यतिरिक्त आपल्या रक्तातील साखर नियंत्रित करण्यात, रोग प्रतिकारशक्ती मजबूत करण्यात आणि वजन कमी करण्यास अंडी खूप प्रभावी आहेत. मात्र, तुम्हाला हे माहिती आहे का? की, दररोज सकाळी नाश्त्यामध्ये अंडी खाल्ली तर आपल्या आरोग्याला नेमकी कोणते फायदे होतात चला तर मग जाणून घेऊयात दररोज सकाळी नाश्तामध्ये अंडी खाण्याचे फायदे…(Eating eggs for breakfast every morning is extremely beneficial for health)

नाश्तामध्ये अंड्यांचं सेवन केल्यास लवकर वृद्धत्व येत नाही. त्वचा आणि डोळ्यांच्या सभोवतालच्या सुरकुत्या कमी होतात. ज्यामुळे त्वचा बर्‍याच काळापर्यंत तजेलदार राहते. अंड्यांमध्ये मुबलक प्रमाणत ‘व्हिटामिन डी’ आढळतो, जो तुमच्या हाडांना बळकटी देण्यास फायदेशीर ठरतो. अंडी सर्वोत्तम आणि आरोग्यासाठी उपयुक्त पदार्थांपैकी एक मानली जातात. अंड्यात कॅलरी, प्रथिने, निरोगी चरबी, फोलेट, कॅल्शियम, फॉस्फरस, सेलेनियम, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी 5, व्हिटॅमिन बी 12, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन के, व्हिटॅमिन बी 6 यासारखे पोषक असतात.

अशाप्रकारे शिजवा अंडी

तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, अंडे निरोगी एलडीएल ब्लड कोलेस्ट्रॉलच्या तुलनेत संतृप्त अन्न म्हणून शरीराचे पोषण करते. अंड्यातील पिवळ्या बलकाचा उष्मांक 55 आहे. अंड्यात ट्रिप्टोफेन आणि टायरोसिन हे घटक असतात. यासह, अंड्यांमध्ये अमिनो आम्ल देखील आहेत जे, आपला हृदयरोगापासून बचाव करण्यासाठी उपयुक्त आहेत. अंडी शिजवताना त्याचं तापमान नियंत्रित ठेवणं गरजेचं आहे. कारण त्यातील अनेक पोषक घटक संपण्याची शक्यता असते. अंडी मायक्रोव्हेवमध्ये गरम करणं, फ्राय केल्यानं त्यातील पोषक तत्व कमी होतात.

तुम्हाला अंडी खाल्ल्यानंतर शरीर सुजने, उल्टी, खोकला, शिंक यांसारखे प्रकार होत असतील तर तुम्हाला अंड्याची अॅलर्जी आहे. अंड्यांमधील अल्ब्यूमिनमुळे असा प्रकार होऊ शकतो. त्याचबरोबर अंडी खाल्ल्यानं शरिरातील बायोटीन नामक K व्हिटामीन कमी होतं. बायोटीनमुळे शरिरात विटामिन H आणि विटामिन B7चं प्रमाण कमी होतं. ज्यामुळे केस गळणे आणि त्वचेसंदर्भातील अनेक आजार होऊ शकतात.

(Eating eggs for breakfast every morning is extremely beneficial for health)

हेही वाचा :

केळी सुपरफूड, मात्र रिकाम्या पोटी खाणे टाळा…

रिकाम्या पोटी ‘चहा’ पिणे आरोग्यासाठी हानिकारक !

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली