AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

व्हिटॅमिन्सयुक्त मटार खाण्याचे ‘हे’ फायदे वाचा !

आपल्यापैकी अनेकांना मटारच्या (Green Peas) शेंगा खायला आवडतात. मटार खाण्यासाठी चवदार असतात.

व्हिटॅमिन्सयुक्त मटार खाण्याचे ‘हे’ फायदे वाचा !
| Edited By: Anish Bendre | Updated on: Mar 30, 2021 | 11:38 AM
Share

मुंबई : आपल्यापैकी अनेकांना मटारच्या (Green Peas) शेंगा खायला आवडतात. मटार खाण्यासाठी चवदार असतात. केवळ चविष्ठच नाही, तर त्यात बरीच पोषक द्रव्ये देखील असतात. मटारमध्ये व्हिटॅमिन्स ए, बी 1, बी 6, सी आणि के आढळतात. म्हणूनच मटारला व्हिटॅमिन्स आणि ऊर्जेचा उत्तम स्त्रोत अर्थात ‘पॉवरहाऊस’ देखील म्हटले जाते. मटारमध्ये अत्यंत कमी कॅलरी असतात. तर, शरीरासाठी पोषक ठरणारे फायबर, प्रथिने, मॅंगनीज, लोह आणि फोलेट हे घटक भरपूर प्रमाणात आढळतात. चला तर मग जाणून घेऊयात मटार खाण्याचे फायदे…(Eating green peas is beneficial for health)

-मटारमध्ये आढळणारा व्हिटॅमिन सी कोलेजमुळे आपली त्वचा मऊ आणि चमकदार बनते. हिरव्या वाटाण्यामध्ये फ्लेव्होनॉइड्स, कॅटेचिन, एपिक्टिन, कॅरोटीनोईड्स आणि अल्फा-कॅरोटीन असतात, जे अकाली वृद्धत्वाची लक्षणे थोपवू शकतात.

-मजबूत हाडांसाठी व्हिटॅमिन के आवश्यक आहे. व्हिटामिन के ऑस्टिओपोरोसिसच्या समस्येपासून शरीराचे रक्षण करते. उकडलेल्या हिरव्या वाटाण्यामध्ये व्हिटामिन के-1 प्रमाण 46 टक्के इतके असते. ज्यामुळे हाडे मजबूत राखण्यास मदत होते.

-फायबरने समृद्ध मटार पाचन तंत्रासाठी खूप चांगले मानले जातात. यामुळे शरीरातील चांगले बॅक्टेरिया वाढतात. ज्यामुळे आतडे योग्य प्रकारे कार्य करते. मटार खाल्ल्याने पोट व्यवस्थित साफ होते आणि बद्धकोष्ठतेची समस्या निर्माण होत नाही.

-मटारमध्ये आढळणारे मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि कॅल्शियम हृदय निरोगी ठेवते. मटार खाल्याने उच्च रक्तदाबाची समस्या कमी होते. मटार शरीरातून खराब कोलेस्ट्रॉल देखील कमी करते. मटारमध्ये आढळणारा अँटिऑक्सिडेंट देखील हृदयासाठी चांगला मानला जातो.

-मटारचा वाटाणा वजन कमी करण्यासाठीचा सर्वोत्तम आहार मानला जातो. मटारमध्ये फायबर आणि प्रथिनांचे प्रमाण अधिक असल्यामुळे खाल्ल्यानंतर फार काळ भूक लागत नाही. परिणामी वजन नियंत्रित होण्यास मदत होते.

संबंधित बातम्या : 

Skin Care Tips | लग्न करताय? ना ब्यूटी पार्लर, ना ट्रिटमेंट, ‘या’ घरगुती उपायांनी मिळवा ग्लो!

Papaya Seeds Benefit | तुम्ही पपईच्या बिया फेकून देताय…? तर थांबा अगोदर हे वाचा!

(Eating green peas is beneficial for health)

Follow Us
थोड्याच वेळात लालबागच्या राजचं विसर्जन होणार, भाविकांचे डोळे पाणावले
Lalbaugcha Raja Visarjan | थोड्याच वेळात लालबागच्या राजचं विसर्जन होणार, भाविकांचे डोळे पाणावले
लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी अनंत अंबानी गिरगाव चौपाटीवर उस्थिती
Anant Ambani : लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी अनंत अंबानी गिरगाव चौपाटीवर उस्थिती
ढोल-ताशांच्या गजरात चिंचपोकळीच्या चिंतामणीला निरोप; गिरगाव चौपाटीवर...
ढोल-ताशांच्या गजरात चिंचपोकळीच्या चिंतामणीला निरोप; गिरगाव चौपाटीवर भाविकांची गर्दी
गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या च्या जयघोषात बाप्पाला निरोप
Mumbai Ganpati Visarjan | गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या च्या जयघोषात बाप्पाला निरोप
20 तासांपासून लालबागच्या राजाची मिरवणूक सुरू; आणखी विलंब होण्याची...
20 तासांपासून लालबागच्या राजाची मिरवणूक सुरू... आणखी विलंब होण्याची शक्यता, नेमकं कारण समोर
गणेशोत्सव आणि विसर्जनाबाबत अमृता फडणीसांचं मोठं विधान
आजच्या मोहिमेत जवळपास 3 हजार... गणेशोत्सव आणि विसर्जनाबाबत अमृता फडणीसांचं मोठं विधान
जयघोष, फुलांची उधळण अन् भक्तांची गर्दी; लालबागच्या राजाच्या विसर्जना..
जयघोष, फुलांची उधळण अन् भक्तांची गर्दी; लालबागच्या राजाच्या विसर्जना आणखी उशिर
मुंबई गणेश विसर्जन 2026 लालबागचा राजा, गिरगावचा राजा मिरवणूक
Lalbag Cha Raja : मुंबई गणेश विसर्जन 2026 लालबागचा राजा, गिरगावचा राजा मिरवणूक
लालबागचा राजा ते साकीनाक्याचा... मुंबईच्या गणपतींची अनोखी कलाकुसर
Ganpati Idol : लालबागचा राजा ते साकीनाक्याचा महाराजा; कुठे 45 अंशात झुकलेली मूर्ती, तर कुठे... मुंबईच्या गणपतींची अनोखी कलाकुसर
गणपतीची आरती मुस्लिम बांधवांनी केली, हिंदू बांधवांनी...
Jalgaon : गणपतीची आरती मुस्लिम बांधवांनी केली, हिंदू बांधवांनी... जळगावात 1970 पासूनची राष्ट्रीय एकात्मतेची अनोखी परंपरा कायम