तोंडली खाण्याचे ‘हे’ जबरदस्त फायदे तुम्हाला माहिती आहेत का? वाचा…

| Updated on: Mar 24, 2021 | 1:02 PM

आपण तोंडलीची भाजी दररोजच खात नाही, परंतु तोंडलीची भाजी आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.

तोंडली खाण्याचे हे जबरदस्त फायदे तुम्हाला माहिती आहेत का? वाचा...
तोंडली
Follow us on

मुंबई : आपण तोंडलीची भाजी दररोज खात नाहीत, परंतु तोंडलीची भाजी आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. तोंडलीच्या भाजीच्या चवीपेक्षाही त्यात जीवनसत्त्वाचा खनिज खूप मोठ्या प्रमाणात आहे. 100 ग्रॅम तोंडलीमध्ये सुमारे 1.4 मिलीग्राम लोह, 0/08 मिलीग्राम व्हिटॅमिन बी -2 , 0.07 मिलीग्राम व्हिटॅमिन-बी 1, 1.6 ग्रॅम फायबर आणि 40 मिलीग्राम कॅल्शियम असते. (Eating pointed gourd is good for health)

-तोंडलीमध्ये फायबर मोठ्या प्रमाणात मिळते. त्यामुळे पचनशक्ती सुधारण्यासाठी तोंडली फायदेशीर आहेत. तोंडली लिव्हरच्या समस्यांवर देखील हे गुणकारी आहे. यामुळे आपल्या नियमित आहारात तोंडल्यांचा समावेश असणे आवश्यक आहे.

-रोज तोंडली खाल्ल्याने एसिडिटीची समस्या दूर होण्यास मदत होते. वजन कमी करण्यासाठी तोंडली अत्यंत महत्वाची मानली जातात. तोंडली खाल्ल्याने भूकेवर नियंत्रण येण्यास मदत होते.

-तोंडल्यामध्ये कॅलरी कमी असतात. खूप वेळ पर्यंत पोट भरल्यासारखे वाटते. ताप, घशाच्या समस्यांवरील इलाजावर औषधाचे काम देखील तोंडली करते. नियमित तोंडली खाल्ल्याने सर्दी आणि ताप वारंवार येण्यावर नियंत्रण आणले जाऊ शकते.

-उच्च रक्तदाब ग्रस्त असलेल्यांनी त्यांच्या आहारात तोंडली नियमित समावेश केला पाहिजे. यामध्ये चरबी अजिबात नसते आणि सोडियमचे प्रमाणही कमी असते. तोंडली नियमितपणे खाल्ल्याने उच्च रक्तदाब नियंत्रित होतो.

-मधुमेह असलेल्या लोकांसाठी तोंडली फायदेशीर आहेत. दररोज तोंडलीचे सेवन केल्याने रक्तातील साखर नियंत्रित केली जाते. यात प्रतिरोधक स्टार्च असतो, जो सहजपणे शरीरात शोषला जात नाही.

(टीप : सेवनापूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Papaya Seeds Benefit | तुम्ही पपईच्या बिया फेकून देताय…? तर थांबा अगोदर हे वाचा!

Side Effect | केसांना ब्लीच करताय? सावधान…. वाचा काय परिणाम होऊ शकतो

(Eating pointed gourd is good for health)