साखर की मीठ? दह्यासोबत नेमकं काय खाणं आरोग्यासाठी फायदेशीर
दही तुमच्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरेल. दहीमध्ये भरपूर प्रमाणात पोषक तत्वं असतात ज्यामुळे तुमचं शरीर निरोगी राहाण्यास मदत होते.

दही हा भारतीय आहाराचा एक महत्त्वाचा भाग मानला जातो. दही तुमच्या आरोग्यासाठी पोषक आणि आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत फायदेशीर ठरतो. दहीमध्ये असलेले प्रोबायोटिक्स, कॅल्शियम आणि प्रथिने तुमच्या शरीरातील हाडे मजबूत करण्यास, पचन सुधारण्यास आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यास मदत करतात. योग्य प्रमाणात दहीचे सेवन केल्यामुळे तुम्हाला कोणत्याही प्रकारचे संसर्गाचे आजार होत नाही. पण जेव्हा दही मीठ किंवा साखर टाकली जाते तेव्हा त्याचे गुणधर्म बदलू शकतात. दह्यात मीठ घालणे योग्य आहे की साखर असा प्रश्न अनेकांना पडतो, चला तर जाणून घेऊया याबद्दल विज्ञान आणि आयुर्वेद दोघांचेही वेगवेगळे मत आहे.
विज्ञान आणि आयुर्वेद या दोन्हीनुसार, दही त्याच्या नैसर्गिक स्वरूपात सर्वात फायदेशीर आहे. वैज्ञानिक दृष्टिकोनातून, दहीमध्ये मीठ घातल्याने त्यामधील प्रोबायोटिक्सचा प्रभाव कमी होऊ शकतो, तर साखर मिसळल्यामुळे रक्तातील साखर वाढवू शकते ज्यामुळे मधुमेहाच्या रूग्णांसाठी धोकादायक ठरू शकते. आयुर्वेद म्हणतो की योग्य प्रमाणात मीठ खाल्ल्यामुळे पचनासाठी चांगले असते म्हणून, सर्वोत्तम पर्याय म्हणजे कोणत्याही भेसळीशिवाय किंवा सैंधव मीठ, गूळ, मध किंवा फळे यांसारख्या निरोगी पर्यायांसह दही खाणे आरोग्यासाठी उपयुक्त ठरू शकते. अशा प्रकारे दहीचे सेवन केल्यामुळे, त्याचा जास्तीत जास्त तुमच्या आरोग्याला फायदा होतो.
आयुर्वेदानुसार, दह्यात मीठ घालणे पचनासाठी चांगले मानले जाते. दही अशा प्रकारे खाल्ल्यामुळे भूक वाढवण्यास, पोटाच्या समस्या दूर करण्यास आणि अन्न अधिक पचण्यास मदत करते. विशेषतः उन्हाळ्यात, सैंधव मीठासह दही खाणे फायदेशीर मानले जाते कारण ते शरीराला थंड करते आणि इलेक्ट्रोलाइट संतुलन राखण्यास मदत करते. दह्यात साखर घालल्याने त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स वाढतो, म्हणजेच ते लवकर पचते आणि रक्तातील साखरेची पातळी लवकर वाढू शकते. मधुमेहाच्या रुग्णांसाठी हे विशेषतः हानिकारक ठरू शकते. साखर घातल्याने दह्याची चव गोड लागते, परंतु त्यामुळे वजन वाढू शकते आणि चयापचय विकार देखील होऊ शकतात. आयुर्वेदातही दह्यासोबत साखर खाणे पूर्णपणे योग्य मानले जात नाही. तथापि, उन्हाळ्यात गूळ किंवा मध मिसळून दही खाणे फायदेशीर मानले जाते कारण ते शरीराला थंडावा देते. परंतु जास्त साखर टाकल्याने कफची समस्या उद्भवू शकते आणि पचनसंस्थेवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.
निरोगी आरोग्यासाठी भेसळशिवाय दहीचे सेवन करणे अत्यंत फायदेशीर ठरेल. दहीची चव वाढवण्यासाठी तुम्ही त्यामध्ये सैंधव मीठाचा किंवा काळ्या मीठाचा वापर करू शकता. त्यासोबतच तुम्हाला जर गोड खाण्याची आवड असेल तर तुम्ही दहीमध्ये साखरे ऐवजी मध किंवा गूळ घालू शकता. यामुळे दहीला चव येईल तुमच्या आरोग्यासाठी देखील हे फायदेशीर ठरेल. यामुळे दहीमधील पौष्टिक पातळी वाढते आणि शरीराला अतिरिक्त फायदे होतील.