AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

खडेमीठाचा फेसपॅक त्वचेसाठी फायदेशीर, वाचा सविस्तर

सुंदर दिसायला कोणाला नको असत, सुंदर दिसण्यासाठी प्रत्येकजण पार्लर, ब्यूटी क्रिम, फेसमास्क आणि विविध घरगूती उपाय करतो.

खडेमीठाचा फेसपॅक त्वचेसाठी फायदेशीर, वाचा सविस्तर
उन्हाळ्यात आपल्या त्वचेला हायड्रेट ठेवण्यासाठी फेस मास्कचा वापर केला पाहिजे. त्वचेला हायड्रेट ठेवण्यासाठी आपण अ‍ेवोकॅडो फेस मास्क लावू शकता. (टीप : औषध म्हणून वापरण्यासाठी किंवा कोणत्याही कृतीपूर्वी डॉक्टरांचा सल्ला आवश्य घ्या.)
| Edited By: Anish Bendre | Updated on: May 27, 2021 | 7:35 AM
Share

मुंबई : सुंदर दिसायला कोणाला नको असत, सुंदर दिसण्यासाठी प्रत्येकजण पार्लर, ब्यूटी क्रिम, फेसमास्क आणि विविध घरगूती उपाय करतो. परंतु, सौंदर्य केवळ मेकअप आणि कपड्यांमधूनच येत नाही, तर यासाठी त्वचा स्वच्छ आणि चमकदार दिसणे देखील महत्वाचे आहे. जर, त्वचा चांगली नसेल तर चेहऱ्यावरचा मेकअप फार चांगला दिसत नाही.(Extremely beneficial for rock salt face pack skin)

मुळात आपली त्वचाच तजेलदार आणि सुंदर असणे आवश्यक असते. चला तर, त्वचा सुधारण्यासाठीच्या काही नैसर्गिक टिप्स जाणून घेऊया. खडेमीठ खाणे आपल्या अत्यंत फायदेशीर आहे. अडे मीठ खाल्ल्याने आपल्या आरोग्याच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होते. मात्र, तुम्हाला हे माहिती आहे का की, खडेमीठ आपल्या त्वचेसाठी देखील खूप फायदेशीर आहे. दोन चमचा बारीक खडेमीठ घ्या त्यामध्ये तीन चमचे दही आणि लिंबाचा रस मिसळा आणि दहा मिनिटांनंतर आपल्या चेहऱ्यावर लावा.

त्यानंतर चेहऱ्यावरील पेस्ट सुकल्यानंतर थंड पाण्याने आपला चेहरा धुवा. यामुळे आपला चेहरा तजेलदार दिसेल. हा फेसपॅक आपण आठवड्यातून तीन वेळा लावला पाहिजे. फेसपॅक बनविण्यासाठी कॉफी पावडर एक चमचा मधात व्यवस्थित मिसळा आणि हातांनी हलक्या हाताने मसाज करा. यानंतर 15 ते 20 मिनिटांसाठी पॅक चेहऱ्यावर ठेवा. मग आपले तोंड धुवा. खरं तर, कॉफीमध्ये अँटीऑक्सिडंट्स आढळतात, तसेच यामध्ये अँटी एजिंग गुणधर्म देखील असतात. ज्यामुळे आपली त्वचा चमकदार बनते आणि चेहर्‍यावरील सुरकुत्याची समस्या दूर होते.

हा फेसपॅक आपण आठवड्यातून दोन ते तीन वेळा लावला पाहिजे.  सर्वांत अगोरद अर्धी वाटी तांदूळ घ्या आणि ते बारीक करून घ्या. त्यामध्ये ताजे दही घाला ही पेस्ट व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि चेहऱ्यावर 30 ते 40 मिनिटे तसेच ठेवा आणि हा पॅक सुकल्यानंतर चेहऱ्यावर हात फिरवा यामुळे तुमचे स्क्रब देखील होईल. यानंतर चेहरा थंड पाण्याने धुवा याचा फायदा त्वचेला होईल. आपली त्वचा चमकदार होण्यास मदत होईल. आठवड्यातून साधारण तीन ते चार वेळा ही पेस्ट चेहऱ्याला लावा.

(टीप : कोणताही उपचार करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Skin Care Tips | लग्न करताय? ना ब्यूटी पार्लर, ना ट्रिटमेंट, ‘या’ घरगुती उपायांनी मिळवा ग्लो!

Dark Circle Home Remedy | डोळ्यांखाली काळी वर्तुळे येतायत? ‘या’ टिप्स नक्की वापरून पाहा…

(Extremely beneficial for rock salt face pack skin)

Follow Us
अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई! मुंबई महापालिका कचाट्यात, अचानक छापा
अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई! मुंबई महापालिका कचाट्यात, अचानक छापा टाकताच...
माहाराष्ट्रातील पर्यटक गुजरातमधील पूरात अडकले, हेलिकॉप्टरने रेस्क्यू..
Video | माहाराष्ट्रातील पर्यटक गुजरातमधील पूरात अडकले, हेलिकॉप्टरने रेस्क्यूचा थरार! पहा व्हिडीओ
नुसता गोंधळ, धावपळ अखेर... जंतर-मंतर नाही नागपूरातील व्हिडीओ आला समोर
CJP Protest | नुसता गोंधळ, धावपळ अखेर... जंतर-मंतर नाही नागपूरातील व्हिडीओ आला समोर
पावसाचा हाहाकार! पवित्र नदीचं रौद्र रूप, पाण्याची पातळी अचानक वाढली
पावसाचा हाहाकार! पवित्र नदीचं रौद्र रूप, पाण्याची पातळी अचानक वाढली
व्हिडीओ पाहा, पोट धरून हसाल; मुंबई पोलिसांच्या तावडीतून कॉक्रोच पळाले
Viral Video | व्हिडीओ पाहा, पोट धरून हसाल; मुंबई पोलिसांच्या तावडीतून कॉक्रोच पळाले
संध्याकाळी 6 वाजता राहुल गांधींची खासदारांसोबत बैठक,
संध्याकाळी 6 वाजता बैठक, पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेरील आंदोलनानंतर कॉंग्रेसची पुढील रणनीती काय?
मी फक्त भारताच्या बाजूने... सुव्रत जोशींची पोस्ट चर्चेत
Suvrat Joshi | मी फक्त भारताच्या बाजूने... सुव्रत जोशींची पोस्ट चर्चेत; विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला समर्थन
मोठी बातमी! CJPच्या आंदोलनानंतर केंद्रात मोठ्या हालचाली, अमित शहा...
मोठी बातमी! CJPच्या आंदोलनानंतर केंद्रात मोठ्या हालचाली, अमित शहा घेणार लोकसभा अध्यक्षांची भेट
आसाममध्ये महापूराचं संकट कायम; 24 तासांत मृतांचा आकडा 31 वर
Assam Flood | आसाममध्ये महापूराचं संकट कायम; 24 तासांत मृतांचा आकडा 31 वर
एका हाताने पोलिस व्हॅन रोखली! मुंबईच्या तरुणीचा व्हिडीओ तुफान व्हायरल
Viral Video | एका हाताने पोलिस व्हॅन रोखली! मुंबईच्या तरुणीचा व्हिडीओ तुफान व्हायरल