AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Eye Mask: सतत स्क्रीन पाहून डोळे थकलेत? ‘या’ नैसर्गिक गोष्टींनी बनवा कूलिंग आय मास्क

सतत मोबाईल, लॅपटॉप किंवा टीव्हीच्या स्क्रीनकडे पाहिल्याने डोळ्यांना थकवा आणि कोरडेपणा जाणवू शकतो. अशावेळी घरात सहज उपलब्ध असलेल्या नैसर्गिक गोष्टींपासून कूलिंग आणि हायड्रेटिंग आय मास्क तयार करता येतात.

Eye Mask: सतत स्क्रीन पाहून डोळे थकलेत? ‘या’ नैसर्गिक गोष्टींनी बनवा कूलिंग आय मास्क
Eye care tips know natural eye masks for tired dry eyes (photo - magnific)Image Credit source: magnific
| Edited By: | Updated on: Oct 11, 2026 | 2:55 PM
Share

दिवसभर स्क्रीनसमोर बसून काम केल्यानंतर डोळे जड होणे, थकवा जाणवणे किंवा डोळ्यांखाली काळी वर्तुळे दिसणे ही समस्या आता सामान्य झाली आहे. मोबाईल फोन, कॉम्प्युटर आणि टीव्हीचा वाढता स्क्रीन टाइम यामुळे डोळ्यांवर ताण येऊ शकतो. त्यातच अपुरी झोप आणि सततचा थकवा यामुळे डोळ्यांभोवतीची त्वचाही निस्तेज दिसू लागते. त्यामुळे चेहरा फ्रेश दिसत असला तरी थकलेले डोळे संपूर्ण लूक खराब करू शकतात. अशा वेळी डोळ्यांना थोडा आराम आणि थंडावा देण्यासाठी काही घरगुती उपाय करून पाहता येतात. यासाठी तुम्हाला कुठलीही महागडी प्रोडक्ट घेण्याची गरज नाही. तर घरात सहज उपलब्ध असलेल्या नैसर्गिक गोष्टींच्या मदतीने रिफ्रेशिंग आणि कूलिंग आय मास्क तयार करता येतात. हे आय मास्क डोळ्यांभोवतीच्या त्वचेला मॉइश्चर देण्यास आणि थकवा कमी जाणवण्यास मदत करू शकतात. चला तर मग जाणून घ्या घरच्या घरी थकलेल्या डोळ्यांना आराम कसा द्यावा.

नारळाचे तेल

डोळ्यांखालील त्वचा कोरडी असल्यास नारळाचे तेल मॉइश्चरायझिंगसाठी वापरले जाते. डार्क सर्कल किंवा आय बॅग्सच्या समस्येसाठी नारळाच्या तेलाचे काही थेंब घेऊन डोळ्यांच्या खाली हलक्या हाताने मसाज करता येतो. रात्री झोपण्यापूर्वी ही प्रक्रिया करावी. मात्र, तेल डोळ्यांच्या आत जाणार नाही याची काळजी घ्या.

बदामाचे तेल

बदामाचे तेल त्वचेला हायड्रेट ठेवण्यासाठी वापरले जाते. रात्री झोपण्यापूर्वी बदामाचे तेल आणि मध कमी प्रमाणात मिसळून डोळ्यांच्या आसपासच्या त्वचेवर लावता येते. यामुळे त्वचेला मॉइश्चर मिळण्यास मदत होऊ शकते. तुमची त्वचा संवेदनशील असेल तर हे वापरण्यापूर्वी पॅच टेस्ट करावी.

गुलाब जल

थकलेल्या डोळ्यांना थंडावा आणि ताजेपणा देण्यासाठी गुलाब जलाचा वापर केला जातो. कॉटन पॅडवर गुलाब जल घेऊन बंद डोळ्यांवर सुमारे १५ मिनिटे ठेवता येते. यामुळे डोळ्यांच्या आसपास फ्रेश वाटू शकते. मात्र, गुलाब जल थेट डोळ्यांत टाकणे टाळावे.

दूध आणि बेकिंग सोडा

थकलेल्या डोळ्यांसाठी थंड दूध वापरण्याचा घरगुती उपायही केला जातो. ४ चमचे ताजे दूध आणि २ चमचे बेकिंग सोडा मिक्स करा. हे मिश्रण थंड करून डोळ्यांच्या जवळपासच्या भागावर कोल्ड मास्क प्रमाणे लावता येते. हे साधारण २० ते २५ मिनिटं राहू द्या. नंतर थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा. जळजळ, खाज किंवा लालसरपणा जाणवल्यास हा उपाय त्वरित थांबवा.

Follow Us
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
अभिजीत दीपके आजीच्या अंत्यदर्शनाला मुकले; दिल्ली पोलिसांच्या कारवाई...
अभिजीत दीपके आजीच्या अंत्यदर्शनाला मुकले; दिल्ली पोलिसांच्या कारवाईमुळे नातेवाईकांची तीव्र नाराजी
दिल्लीतील 57 मेट्रो स्थानके बंद; सर्वोच्च न्यायालयात गृह सचिवांविरोधात
दिल्लीतील 57 मेट्रो स्थानके बंद; सर्वोच्च न्यायालयात गृह सचिवांविरोधात अवमान याचिका! सुनावणी सुरु