AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Fashion | पार्टीला जात आहात? मग, ‘पेन्सिल स्कर्ट’ स्टाईल नक्की ट्राय करून पाहा!

आपल्याला फॅशनेबल कपडे परिधान करून, एखाद्या पार्टीत इतरांपेक्षा वेगळे दिसायचे असेल, तर आपण पेन्सिल स्कर्ट लूक ट्राय करू शकता.

Fashion | पार्टीला जात आहात? मग, ‘पेन्सिल स्कर्ट’ स्टाईल नक्की ट्राय करून पाहा!
| Updated on: Dec 24, 2020 | 4:46 PM
Share

मुंबई : आपल्याला फॅशनेबल कपडे परिधान करून, एखाद्या पार्टीत इतरांपेक्षा वेगळे दिसायचे असेल, तर आपण पेन्सिल स्कर्ट ट्राय करू शकता. पेन्सिल स्कर्ट अतिशय स्टाइलिश आहे आणि व्हर्सेटाईल आऊटफिट्समध्ये याची गणना केली जाते. पार्टी, रिसेप्शन वा गेट टू गेदर या सगळ्या समारंभात हा लूक तुम्हाला आणखी ट्रेंडी बनवेल. आपण कुठल्याही पार्टी अथवा समारंभात हा लूक ट्राय करू शकता (Fashion Style Tips for Pencil Skirt Look).

पेन्सिल स्कर्ट आपल्याला एक अतिशय स्टायलिश आणि मोहक लुक देतात. तथापि, या लूकला योग्यप्रकारे स्टाईल करणे आवश्यक आहे. पेन्सिल स्कर्ट बाजारातही तुम्हाला सहज उपलब्ध होतात. वेगवेगळ्या फॅब्रिक्समध्ये आणि रंगांमध्ये बाजारात उपलब्ध आहेत, जे बघायला आणि परिधान करायला खूपच सुंदर दिसतात. या वेगवेगळ्या टिप्स वापरून आपण ही स्टाईल परिधान करू शकता.

आज आम्ही तुम्हाला बॉलिवूड अभिनेत्रीच्या काही उत्तम पेन्सिल स्कर्ट लुकबद्दल सांगणार आहोत, जे तुम्ही देखील ट्राय करू शकता…

लूक 1

बहुतेक तरुण मुलींना पेन्सिल स्कर्ट परिधान करणे आवडते. ऑफिस ते पार्टीपर्यंत आपण कुठेही ही स्टाईल वापरू शकता. पांढर्‍या प्लेन पेन्सिल स्कर्टवर ‘प्रिंटेड बटण अप ब्लाऊज शर्ट’ टीमअप करा, तो तुम्हाला खूपच आकर्षक लूक देईल. त्याच वेळी, या लूकला साजेसे निळे पंपहिल्स फुटवेअर परिधान करा. ही स्टाईल आपल्याला एक स्टेटमेंट लूक देईल (Fashion Style Tips for Pencil Skirt Look).

लूक 2

जर आपल्याला या स्कर्टसह एलिगंट आणि मोहक लूक हवा असेल तर आपण काही सर्वोत्कृष्ट सेलिब्रिटींच्या लूकचे अनुसरण देखील करू शकता. करिनाने एका इव्हेंटमध्ये डार्क ब्राउन पेन्सिल स्कर्ट स्टाईल केला होता ज्यात तिने पूर्ण स्लीव्हजलेस टॉप घातला होती. यासह करीनाने मॅचिंग पंपहिल्स फूटवेअर घातले होते. आपण त्यावर बूट किंवा शूज परिधान करून स्टायलिश लूक मिळवू शकता.

लूक 3

अ‍ॅनिमल प्रिंट असलेल्या पेन्सिल स्कर्टसह ब्लॅक टॉप बटण अप स्लीव्हसह टीमअप करू शकता. क्रॉप टॉपसह पेन्सिल स्कर्ट परिधान करणे ही एक चांगली कल्पना आहे. परंतु आपल्याला क्रॉप टॉप घालायचे नसल्यास काही हरकत नाही. आपण शर्टसह पेन्सिल स्कर्ट देखील टीमअप करू शकता. जर आपण शर्ट घातला असेल तर, शर्टला आत टॅक करा. ही स्टाईल वजनदार स्त्रियांवरर खूपच शोभून दिसते.

(Fashion Style Tips for Pencil Skirt Look)

हेही वाचा :

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.