Fashion Tips | वजनदार झुमक्यांनी कान दुखतायत? मग ‘या’ टिप्स नक्की ट्राय करा!

बर्‍याच वेळा या जड कानातले घालण्याने कानात जखम होते. ज्यामुळे महिला असे कानातले घालण्यास घाबरतात.

Fashion Tips | वजनदार झुमक्यांनी कान दुखतायत? मग ‘या’ टिप्स नक्की ट्राय करा!
Follow us
| Updated on: Jan 13, 2021 | 5:14 PM

मुंबई : लग्नाच्या मोसमात प्रत्येकाला सुंदर दिसण्याची इच्छा असते. विशेषत: लग्नात महिला महागडे कपडे आणि स्टायलिश दागिने घालतात. अशावेळी, महिला कपड्यांवर मॅचिंग असे जड कानातले घालतात. हे जड कानातले आपल्याला लूकला स्टायलिश टच देतात आणि चेहऱ्याचे सौंदर्य देखील वाढवतात. परंतु, जास्त वेळ जड कानातले घातल्यामुळे कानात वेदना होण्याची समस्या निर्माण होऊ शकते (Fashion tips for wearing heavy jhumka in wedding season).

बर्‍याच वेळा या जड कानातले घालण्याने कानात जखम होते. ज्यामुळे महिला असे कानातले घालण्यास घाबरतात. जर, तुम्हालाही असे जड कानातले घालायला आवडत असतील, पण कान दुखण्याच्या भीतीमुळे कानातले परिधान करण्यास कुचराई करत असाल, तर आम्ही तुमच्यासाठी काही टिप्स घेऊन आलो आहोत. त्यांचा अवलंब करून आपण या समस्येतून मुक्ती मिळवू शकता.

कानांवर क्रीम किंवा तेल लावा.

जर, आपल्याला बराच वेळ इयररिंग घातल्याने त्रास होत असेल, तर कानातले घालण्यापूर्वी कानांना क्रीम किंवा तेल लावा. असे केल्याने कानाची त्वचा मऊ होईल आणि जड झुमके घातल्याने काहीही त्रास होणार नाही. शिवाय क्रीम आपल्या त्वचेला मॉइश्चराइझ करण्यासाचे काम करते.

जास्त वेळ जड कानातले घालणे टाळा.

आपण लग्नाच्या सर्व फंक्शन्समध्ये वेगवेगळे लूक ट्राय करून पाहू शकता. आपण एखाद दिवस हलके कानातले आणि दुसर्‍या दिवशी वजनदार कानातले घालू शकता. यामुळे आपल्या कानांना देखील आराम मिळेल.

जड कानातल्यांसाठी साखळ्यांचा वापर करा.

आजकाल जड इयररिंग्ज सोबत साखळ्यांचा ट्रेंडही सुरु आहे. जड कानातले घालताना कानात साखळी देखील घालू शकतात. यामुळे कानातल्यांना सपोर्ट मिळेल आणि कानांवरील भार हलका होईल. जर आपण बराच काळ इयर चेनसह लांब कानातले घातले तर वेदना होणार नाही (Fashion tips for wearing heavy jhumka in wedding season).

ट्रान्सपरंट दोरा लावा.

जर तुमचे कानातले खूप जड असतील तर तुम्ही कानातल्याच्या पुढील भागाकडून आणि मागील भागापर्यंत एक ट्रान्सपरंट दोरा लावू शकता. जो दोरा तुम्ही तुमच्या कानाभोवती गुंडाळून कानाच्या मागच्या बाजूने त्याला एक गाठ मारू शकता. असे केल्याने कानातल्याचा भार पाळ्यांवर न येता संपूर्ण कानावर येईल. कानाच्या पाळ्या न दुखल्यामुळे तुम्हाला या पद्धतीने मोठे आणि जड कानातले घालणं सुसह्य होईल. शिवाय दोरा ट्रान्सपरंट असल्यामुळे तो कानातल्यासोबत झाकला जाईल.

सपोर्ट पॅच वापरा.

जेव्हा कानातले खरेदी कराल, तेव्हा त्या कानातल्यांसोबत सपोर्ट पॅचदेखील विकत घ्या. बाजारात तुम्हाला कानासाठी सपोर्ट पॅच सहज विकत मिळतील. हे सपोर्ट पॅच ट्रान्सपरंट आणि मऊ मटेरिअलचे असतात. ज्यामुळे ते कानातल्यांसोबत घातल्यावर दिसत नाहीत आणि कानांना आधार मिळल्यामुळे कान दुखत नाहीत. कानातले घालताना कानाच्या पाळीच्या मागच्या बाजूने हे सपोर्ट पॅच तुम्हाला फक्त कानातल्यामध्ये अडकवण्याची गरज असते. कानाचे छिद्र मोठे होऊ नये यासाठी सपोर्ट पॅच घालणे नेहमीच फायद्याचे ठरते.

(Fashion tips for wearing heavy jhumka in wedding season)

हेही वाचा :

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.