साडी खरेदी करण्याच्या ‘या’ 6 टिप्स वाचा, निवड सोपी होईल
साडी खरेदी करताना मनात भरत नाही का? ऑनलाइन साडी खरेदी करताना गोंधळ उडतो का? असं असेल तर चिंता करू नका. आज आम्ही तुम्हाला साडी खरेदीच्या खास 6 टिप्स देणार आहोत, जाणून घेऊया.

आजकाल महिलांना ऑनलाइन शॉपिंग करायला आवडते. ऑनलाइन साड्या खरेदी करणे हा एक चांगला आणि सोपा पर्याय वाटू आहे. पण, ऑनलाइन साड्या खरेदी करणे इतके सोपे नाही. साड्या ऑनलाइन खरेदी करण्यापूर्वी पुढील गोष्टींची काळजी घ्या.
1 साडीचे फॅब्रिक आणि लांबी तपासा
शॉपिंग वेबसाइट्सवर साड्यांचे फोटो उत्तम पद्धतीने मांडली जातात, पण ती साडी नेमकी कशी आहे, हे चित्रातून कळू शकत नाही. त्यामुळे कोणतीही साडी तुमच्या शॉपिंग कार्टमध्ये जोडण्यापूर्वी तिचे तपशील तपासण्याचा प्रयत्न करा. ऑथेंटिक शॉपिंग वेबसाइट नेहमी तिच्या उत्पादनाची संपूर्ण माहिती देते, जसे की त्याचे फॅब्रिक आणि लांबी.
2 रिव्ह्यूमध्ये साडीचा फोटो, व्हिडिओ नक्की बघा
साडीचे तपशील तपासल्यानंतर, त्याचे रिव्ह्यू वाचण्याची वेळ आली आहे. शॉपिंग साइटवर तुम्हाला साडीची इमेज आवडली असेल. पण जर तुम्हाला साडीची खरी इमेज पहायची असेल तर रिव्ह्यू तपासा. अनेकदा रिव्ह्यूमध्ये उत्पादनाच्या वास्तविक इमेज आणि व्हिडिओ असतात. यासोबतच कापडाच्या दर्जाबाबतही लिहिले आहे. जेणेकरून तुम्हाला उत्पादनाविषयी चांगली माहिती मिळेल.
3. विश्वासार्ह विक्रेत्याकडूनच साड्या खरेदी कराव्यात
लक्षात ठेवावे की ऑनलाइन जग फसवणुकीचे आहे. तुम्हाला कोणत्याही प्रकारची फसवणूक टाळायची असेल, तर तुम्ही विश्वासार्ह विक्रेत्याकडूनच साड्या खरेदी कराव्यात. काही ऑनलाइन विक्रेते त्यांच्या प्रामाणिकपणासाठी आणि फॅशन कलेक्शनसाठी ओळखले जातात. त्यामुळे, जर तुम्ही त्यांच्याकडून साड्या खरेदी केल्या तर तुमची फसवणूक होण्याची शक्यता खूपच कमी असते.
4 ब्रँडेड साड्या घ्या
निकृष्ट दर्जाच्या साड्या घ्यायच्या नसतील तर ब्रँडेड साड्या घ्या. ब्रँडेड साड्या थोड्या महाग असू शकतात, परंतु त्यांचा दर्जा, प्रिंट्स आणि एम्ब्रॉयडरी इत्यादी खूप चांगली असतात.
5. साडीची रिटर्न पॉलिसी तपासा
तुम्ही ऑर्डर केलेले उत्पादन तुम्हाला आवडणार नाही अशी परिस्थिती असू शकते. त्या बाबतीत, तुम्हाला तुमची ऑर्डर परत करावी लागेल आणि तुमचे पैसे परत मागावे लागतील. त्यामुळे, ऑर्डर करण्यापूर्वी कोणत्याही साडीची रिटर्न पॉलिसी तपासण्याचा प्रयत्न करा.
6. साडीचे शिपिंग तपशील तपासा
तुम्ही ऑर्डर करत असलेल्या साडीचे शिपिंग तपशील देखील तुम्ही दोनदा तपासले पाहिजेत. विशेषत: तुम्ही एखाद्या खास प्रसंगासाठी साडी विकत घेतली असेल तर ते अधिक महत्त्वाचे ठरते. उदाहरणार्थ, तुम्हाला दोन दिवसांत एखाद्या फंक्शनसाठी साडीची आवश्यकता असू शकते, तर ती चार दिवसांत वितरित केली जाईल. त्यामुळे अशावेळी तुम्ही साडीचे इतर पर्याय शोधावेत.