AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मेथीच्या दाण्यांचा फेसपॅक ट्राय करा आणि चेहऱ्यावरील मुरूमांना गुडबाय म्हणा!

मेथीचे दाणे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. मधुमेहासारखे गंभीर आजार देखील मेथीचे दाणे खाल्ल्याने दूर होण्यास मदत होते.

मेथीच्या दाण्यांचा फेसपॅक ट्राय करा आणि चेहऱ्यावरील मुरूमांना गुडबाय म्हणा!
सुंदर त्वचा
| Edited By: Anish Bendre | Updated on: Apr 16, 2021 | 10:22 AM
Share

मुंबई : मेथीचे दाणे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. मधुमेहासारखे गंभीर आजार देखील मेथीचे दाणे खाल्ल्याने दूर होण्यास मदत होते. मात्र, तुम्हाला हे माहिती आहे का? की, मेथीच्या दाण्यांच्या गुणधर्मामुळे आपल्या चेहऱ्यावरील मुरूमाची समस्या देखील दूर होण्यास मदत होते. मेथीचे दाणे आपल्या त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर आहे. विज्ञान आणि आयुर्वेद म्हटले जाते की, हा रोग टाळण्यासाठी मेथीचे दाणे वापरले जाऊ शकतात. (Fenugreek seeds are beneficial for the skin)

मेथीचे दाणे रात्रभर पाण्यात भिजवून ठेवावी. सकाळी उठल्यावर त्यातील पाणी काढून त्याची बारीक पेस्ट तयार करा आणि त्यामध्ये मध, हळद आणि थोडेसे गुलाब पाणी घालावे यानंतर ही पेस्ट व्यवस्थित मिक्य करून घ्या आणि आपल्या चेहऱ्यावर लावा साधारण 20 ते 25 मिनिटे ही पेस्ट आपल्या चेहऱ्यावर तशीच ठेवा आणि नंतर धुवावी. साधारण आठवड्यातून दोनदा असे केले तर चेहऱ्यावरील मुरूमाची समस्या दूर होण्यास मदत होईल.

दही आणि मेथी दोन्हीमध्ये अँटी इंफ्लेमेटरी गुणधर्म आढळतात. हे गुणधर्म शरीरात ग्लुकोजची पातळी कमी करण्यासाठी मदत करतात. अशा वेळी एक कप दहीमध्ये मेथीची पूड घालून खा. याचा तुम्हाला नक्की फायदा होईल. मेथीमध्ये आढळणारे पौष्टिक घटक मधुमेहाच्या समस्येसवर गुणकारी ठरतातच, परंतु पचन आणि आम्लपित्ताच्या समस्येस देखील प्रतिबंधित करतात. जर, आपल्यालाही मेथीच्या माध्यमातून या समस्यांपासून आराम मिळवायचा असेल, तर यासाठी दररोज 10 ग्रॅम मेथीचे दाणे गरम पाण्यात भिजवून त्याचे सेवन करावे.

अभ्यासानुसार, एका दिवसात 2 ते 25 ग्रॅम मेथीचे सेवन करणे योग्य आणि सुरक्षित आहे. तथापि, त्याचे प्रमाण किती बरोबर आहे, ते सेवन करत असलेल्या व्यक्तीवर अवलंबून असते. तसे, त्याचे एकावेळी जास्तीत जास्त प्रमाण 10 ग्रॅम निश्चित केली गेले आहे. याशिवाय मेथीचे कच्चे दाणे 25 ग्रॅम, पावडर 25 ग्रॅम आणि भिजवलेली मेथी देखील 25 ग्रॅमच योग्य आहे. परंतु, जर तुम्हाला मेथीचे सेवन करायचे असेल तर प्रथम डॉक्टरांचा सल्ला घ्या.

संबंधित बातम्या : 

(Fenugreek seeds are beneficial for the skin)

Follow Us
मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय...
Devendra Fadnavis : मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय; फडणवीसांचा राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन जा; राऊतांचा विरोधकांना...
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन शेतकऱ्यांकडे जा; संजय राऊतांचा विरोधकांना सल्ला
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी...
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी राज-उद्धव ठाकरे घेणार मोठा निर्णय?
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची मागणी
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना...
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना दिलं उत्तर
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर..
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदावर्तेंचा थेट इशारा
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक...
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; ‘सर्व निर्णय सहमतीने...
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; सर्व निर्णयांबाबत दिलं स्पष्टीकरण, महाराष्ट्रात...