‘या’ दिवसापासून फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेल होणार सुरू, फोनपासून टीव्हीपर्यंत सर्व काही मिळणार स्वस्त
सणासुदीच्या या दिवसांमध्ये फ्लिपकार्ट आणि अमेझॉननेही ग्राहकांना वस्तु खरेदीवर मोठ्या प्रमाणात उत्तम ऑफर्स देण्याची तयारी सुरू केली आहे.अशातच फ्लिपकार्टने देखील सेलची तारीख जाहीर केली आहे, सेल कोणत्या दिवशी सुरू होईल आणि किती दिवस असणार आहे? हे आपण आजच्या लेखात जाणून घेऊयात...

ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्ट सेल लवकरच सुरू होणार आहे. ऑनलाईन शॉपिंग करणाऱ्यांसाठी या सेलमध्ये अनेक वस्तुंवर बंपर डिस्काउंट मिळणार आहे. अशातच येत्या सणासुदी निमित्त तुम्ही नवीन फोन किंवा नवीन घरगुती वस्तू खरेदी करण्याचा विचार करत आहात का? मग विशलिस्ट बनवायला सुरुवात करा कारण फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेलची तारीख जाहीर झाली आहे. सेल दरम्यान, ॲपल, सॅमसंग, मोटोरोला ब्रँडचे स्मार्टफोन बंपर डिस्काउंटसह विकले जातील. सेलसाठी तयार केलेली मायक्रोसाइट देखील लाईव्ह करण्यात आली आहे जिथे सेलमध्ये उपलब्ध असलेल्या ऑफर्सची माहिती दिली जात आहे. केवळ फ्लिपकार्ट सेलच नाही तर अमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेलची तारीख देखील जाहीर करण्यात आली आहे.
फ्लिपकार्ट सेल कोणत्या दिवशी सुरू होईल?
गॅझेट्स 360 च्या रिपोर्टनुसार, फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेल 23 सप्टेंबरपासून सुरू होईल, पण सेल किती तारखेपर्यंत चालेल? ही माहिती अद्याप देण्यात आलेली नाही. रिपोर्टमध्ये असेही नमूद केले आहे की फ्लिपकार्टच्या काही तास आधी, अमेझॉनने ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेलची तारीख देखील जाहीर केली आहे. रिपोर्टनुसार, फ्लिपकार्टप्रमाणेच, अमेझॉन सेल देखील 23 सप्टेंबरपासून सुरू होईल.
नेहमीप्रमाणे, फ्लिपकार्ट प्लस आणि ब्लॅक सदस्यांना सेलमध्ये लवकर प्रवेश मिळेल. कंपनीने सेलपूर्वी माहिती दिली आहे की ग्राहकांना सेल दरम्यान स्टील डील्स, मर्यादित वेळेच्या ऑफर्स आणि फेस्टिव्ह रश अवर्स सारख्या आकर्षक ऑफर्स मिळतील.
सेल मध्ये तुम्हाला हे स्मार्टफोन स्वस्तात मिळतील
सेल दरम्यान तुम्हाला iPhone 16, Motorola Edge 60 Pro, Samsung Galaxy S24 सारखे स्मार्टफोन स्वस्त किमतीत मिळतील. याशिवाय, ऑडिओ प्रोडक्टबद्दल बोलायचे झाले तर, OnePlus Buds 3 देखील मोठ्या सवलतींसह विकले जाईल. स्मार्टफोन आणि इअरबड्स व्यतिरिक्त, 55 इंचाचा स्मार्ट टीव्ही, फ्रंट लोड वॉशिंग मशीन स्वस्तात खरेदी करण्याची उत्तम संधी असेल.
फ्लिपकार्ट सेलसाठी अॅक्सिस बँक आणि ICICI बँकेसोबत भागीदारी करण्यात आली आहे, म्हणजेच सेल दरम्यान तुम्ही या बँकांच्या कार्ड्सद्वारे पेमेंटवर अतिरिक्त 10 टक्के बचत करू शकाल.
