AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Summer Beauty : कमी पैशांत दुप्पट निखार, उन्हाळ्यात या वस्तूंचा वापर त्वचेसाठी ठरेल गुणकारी

Summer Beauty Hacks : आयुर्वेदातील बहुतेक गोष्टी घरात असतात. त्याचा वापर करून उन्हाळ्यात त्वचा चमकदार कशी ठेवावी आणि पिंपल्सपासून दूर कसे रहावे, ते जाणून घेऊया.

Summer Beauty : कमी पैशांत दुप्पट निखार, उन्हाळ्यात या वस्तूंचा वापर त्वचेसाठी ठरेल गुणकारी
Image Credit source: freepik
| Updated on: Apr 24, 2023 | 3:07 PM
Share

नवी दिल्ली : उन्हाळ्यात (Summer) जेवढी शारीरिक आरोग्याची काळजी घेतली जाते, तेवढीच त्वचेची काळजी घेणेही (skin care) गरजेचे आहे. या ऋतूत त्वचा कोरडी आणि निस्तेज होते. यासोबतच ब्रेकआऊटमुळे ॲक्ने आणि पिंपल्सची (acne and pimples) समस्या देखील जाणवते. पण या मोसमात तुम्ही ब्युटी पार्लरमध्ये न जाता घरच्या घरी स्किन ट्रीटमेंट (skin treatment at home) करू शकता. त्यासाठी तुमच्या खिशाला फारसा फटका बसणार नाही. आयुर्वेदिक सौंदर्य उपायांच्या मदतीने तुम्ही तुमच्या त्वचेची सहज काळजी घेऊ शकता.

आयुर्वेदातील बहुतेक गोष्टी घरात असतात. त्याचा वापर करून उन्हाळ्यात त्वचा चमकदार कशी ठेवावी आणि पिंपल्सपासून दूर कसे रहावे, ते जाणून घेऊया.

कोरफडीचा कूल फेस मास्क

उन्हाळ्यात कोरफड त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. कोरफड ही तिच्या थंड गुणधर्मांसाठी ओळखली जाते. उन्हाळ्यात त्याचा फेस मास्क लावल्याने त्वचेला मुरुम आणि मुरुमांपासून संरक्षण मिळते. हा मास्क बनवण्यासाठी एक चमचा कोरफडीचा रस किंवा जेल, एक चमचा मध आणि गुलाबपाण्याचे काही थेंब मिसळा व चेहऱ्यावर लावा. हा फेस मास्क 15 मिनिटे चेहऱ्यावर ठेवा.

हळद व चंदन

हळद आणि चंदन हे दोन्ही आयुर्वेदिक घटक आहेत जे त्यांच्या त्वचा उजळण्याच्या गुणधर्मांसाठी ओळखले जातात. हा फेस स्क्रब बनवण्यासाठी एक चमचा चंदन पावडर, हळद आणि पाणी मिसळून पेस्ट बनवा. यानंतर हे मिश्रण चेहऱ्यावर लावा. काही वेळाने चेहरा कोमट पाण्याने धुवा.

खोबरेल तेल

त्वचेला मॉइश्चरायझ करण्यासाठी नारळ तेल हा उत्तम पर्याय आहे. हे बनवण्यासाठी एक कप खोबरेल तेल आणि एक चमचा व्हिटॅमिन ई कॅप्सूल मिक्स करा. हे मिश्रण फेसाळ होईपर्यंत ढवळत रहा. बनवल्यानंतर ते बरणीतही साठवता येते.

मध आणि दालचिनी

मध आणि दालचिनी या दोन्हीमध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात, जे त्वचेतील लालसरपणा आणि जळजळ कमी करण्यास मदत करतात. दोन्ही मिक्स करून पेस्ट बनवा आणि 15 ते 20 मिनिटे त्वचेवर लावा. यानंतर चेहरा धुवा.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?