पायांवरील काळेपणा व कोरडेपणा दूर करण्यासाठी ‘या’ सोप्या घरगुती उपायांचा करा अवलंब

उन्हाळा केवळ चेहरा आणि हातांसाठीच नव्हे तर पायांसाठीही त्रासदायक ठरू शकतो. तीव्र सूर्यप्रकाश आणि धुळीमुळे पायांची चमक कमी होते आणि त्वचा काळवंडण्याचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढू शकते. त्यामुळे पायांवरील काळेपणा व कोरडेपणा कमी करण्यासाठी काही घरगुती उपाय जाणून घेऊयात.

पायांवरील काळेपणा व कोरडेपणा दूर करण्यासाठी या सोप्या घरगुती उपायांचा करा अवलंब
Blackness on the legs
| Edited By: | Updated on: Apr 18, 2026 | 3:15 PM

आपण छान दिसावे यासाठी प्रत्येकजण प्रामुख्याने चेहरा, मान,हात याकडे लक्ष देतो. तसेच त्यांची केअर करताना अनेक घरगुती उपाय देखील करतो. अशातच मात्र पायांकडे आपण पुरेसे लक्ष देत नाहीत. दिवसभरात तुमच्या पायांच्या त्वचेला सर्वाधिक धूळ, घाम आणि सूर्यप्रकाशाचा सामना करावा लागतो. यामुळेच पायांच्या त्वचेवर काळपटपणा जमा होतो आणि त्वचेची नैसर्गिक चमक नाहीशी होते. या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी अनेक लोकं महागड्या प्रोडक्टचा वापर करतात, परंतु त्यातील केमिकल प्रत्येकाच्या त्वचेला अनुकूल असतीलच असे नाही. अशा परिस्थितीत घरगुती उपाय एक सुरक्षित आणि प्रभावी पर्याय म्हणून समोर येतात. आपल्या स्वयंपाकघरात सहज उपलब्ध असलेले लिंबू, बेसन, दही किंवा मध यांसारखे सामान्य घटक केवळ त्वचेला आतून पोषणच देत नाहीत, तर हळूहळू काळपटपणा दूर करून पायांचा रंग सुधारतात.

या उपायांचे वैशिष्ट्य हे आहे की ते नैसर्गिक आहेत, त्यांचे दुष्परिणाम होण्याचा धोका कमी असतो आणि त्यांच्या नियमित वापरामुळे दीर्घकाळ टिकणारे परिणाम मिळू शकतात. जर तुम्हालाही काळवंडलेल्या, कोरड्या आणि खरखरीत पायांचा त्रास होत असेल, तर आराम देऊ शकणाऱ्या काही घरगुती उपायांबद्दल जाणून घेऊयात.

लिंबू आणि मध टॅनिंग करतील कमी

तुम्ही तुमचे पाय पुन्हा उजळ करण्यासाठी लिंबू आणि मधाचा वापर करू शकता. लिंबामध्ये नैसर्गिक ब्लीचिंग गुणधर्म असतात जे टॅनिंग आणि काळे डाग कमी करण्यास मदत करतात. तर मध त्वचेला खोलवर आर्द्रता देते. हे मिश्रण त्वचेवरील मृत पेशी काढून टाकते आणि त्वचा स्वच्छ व मऊ बनवते. यासाठी फक्त 1 चमचा लिंबाचा रस आणि 1 चमचा मध एकत्र मिसळा आणि ते तुमच्या पायांना लावा. 15 ते 20 मिनिटांनंतर कोमट पाण्याने स्वच्छ धुवा.

बेसन आणि दह्याचे पॅक

पाय उजळ करण्यासाठी बेसन आणि दह्याचा पॅक हा देखील एक चांगला पर्याय आहे. बेसन हा एक उत्कृष्ट नैसर्गिक स्क्रब आहे जो त्वचेवरील घाण आणि मृत त्वचा काढून टाकतो. दह्यामधील लॅक्टिक ॲसिड त्वचा उजळ आणि गुळगुळीत करते. 2 चमचे बेसनमध्ये 1/2 चमचा दही मिक्स पेस्ट बनवा आणि ती तुमच्या पायांना लावा. हा पॅक सुकल्यावर हलक्या हाताने स्क्रब करा आणि स्वच्छ धुवा. हा पॅक लावल्याने तुमची त्वचा स्वच्छ दिसेल, त्वचा उजळ होईल आणि कोरडेपणा कमी होईल.

हळद आणि दुधाचे मिश्रण

हळद आणि दुधाचे मिश्रण तुमचे पायांची त्वचा उजळ करण्यास मदत करते. हळदीमध्ये जिवाणूनाशक आणि त्वचा उजळ करणारे गुणधर्म आहेत, तर दूध त्वचेचे पोषण करून तिला उजळ करते. 1 चिमूटभर हळद 2/3 चमचा दुधात मिसळून पेस्ट बनवा आणि ती तुमच्या पायांना लावा. 15 मिनिटांनंतर ते धुवून टाका. यामुळे त्वचा स्वच्छ होते आणि डाग व काळे ठिपके कमी होतात.

तांदळाचे पीठ आणि गुलाबपाणी

तांदळाचे पीठ मृत त्वचा काढून टाकण्यासाठी एक उत्तम स्क्रब आहे, आणि गुलाबपाणी त्वचेला ताजेपणा देऊन तिचा रंग उजळवते. यासाठी फक्त 2 मोठे चमचे तांदळाचे पीठ आणि पेस्ट बनवण्यासाठी पुरेसे गुलाबपाणी एकत्र करा. ही पेस्ट तुमच्या पायांना लावा, हळुवारपणे स्क्रब करा आणि नंतर स्वच्छ धुवा. यामुळे त्वचा मऊ होते. त्वचेचा काळपटपणा कमी होतो आणि त्वचेला नैसर्गिक चमक येते.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

Follow Us