AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चार वेळा अपयश पदरी, तरी हार मानली नाही, 23 लाखाची नोकरी सोडून झाल्या IAS

IAS kajal jawla success story:देशातील सर्वात अवघड समजली जाणारी युपीएससीची परीक्षा उत्तीर्ण होणे सोपे नाही. या परीक्षेला हजारो विद्यार्थी बसत असतात. त्यातील मोजकेच विद्यार्थ्यांना या परीक्षेत यश मिळते. या परीक्षेत चिकाटीने अभ्यास आणि मेहनत करणाऱ्यांनाच यश मिळते.

चार वेळा अपयश पदरी, तरी हार मानली नाही, 23 लाखाची नोकरी सोडून झाल्या IAS
IAS kajal jawla success story
| Updated on: Jun 13, 2026 | 8:14 PM
Share

IAS kajal jawla success story: देशातील सर्वात अवघड परीक्षेपैकी एक मानली जाणारी युपीएससीची परीक्षा पास होणे सोपे नसते. या परीक्षेत उत्तीर्ण होण्याची स्वप्ने लाखो तरुण पहात असतात. त्यासाठी रात्रीचा दिवस करत अभ्यास करत असतात. या परीक्षेत पास होण्यासाठी अभ्यासा सोबतच मानसिक क्षमता देखील हवी असते. अशीच एक प्रेरणादायी कहाणी आयएएस काजल जावला यांची आहे. त्यांनी अनेक अपयशानंतर हार न मानता अखेर आपल्या वडीलांचे स्वप्न पूर्ण केले.

मेरठ येथून सुरुवात…

उत्तर प्रदेशातील मेरठ येथे राहणाऱ्या काजल जावला यांना लहानपणापासून अभ्यासाची आवड होती. त्यांनी इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले आणि त्या नोकरी करु लागल्या. त्यांना वार्षिक २३ लाखाचे पॅकेज मिळत होते. जे कोणत्याही तरुणासाठी मोठी नोकरी होती. परंतू काजल यांना त्यांच्या वडीलांचे स्वप्न पूर्ण करायचे होते. त्यामुळे त्यांनी नोकरी सोडून युपीएससीच्या तयारीला लागल्या.

चार वेळा अपयशाचा सामना –

UPSC ची तयारीचा प्रवास काजल यांच्यासाठी सोपा नव्हता. त्यांचा विवाह झाला होता आणि आता त्या ऑफीस आणि फॅमिली अशा दोन्ही तारेवरची कसरत करत होत्या. त्यांनी संपूर्ण मेहनतीने वेळ काढून अभ्यासाला सुरुवात केली. आणि प्रवासात टॅक्सीतही अभ्यास सुरु केला. ऑफीसातून आल्यानंतर त्या अभ्यासाला बसत. काजल यांच्या पतींना त्यांना मोलाची साथ दिली. त्यांनी घराची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली आणि पत्नीला अभ्यासासाठी वेळ दिला.

परंतू यशाचा प्रवास इतका सोपा नव्हता. सुरुवातीला चार प्रयत्नात त्यांना यश मिळाले नाही. काजल यांनी हार न मानता आपल्या कमजोरीवर काम करणे सुरु केले. त्यांनी प्रत्येक अपयशानंतर आपल्यातील दोषांवर मात करीत आणखी जोमाने तयारी केली.

पाचव्या प्रयत्नात यश –

काजल जावला यांची मेहनत अखेर फळाला आली. त्यांनी साल २०१८ मध्ये पाचव्या प्रयत्नात UPSC सिव्हील सेवा परीक्षा पास केली आणि ऑल इंडिया रँक २८ मिळवला. त्यांच्या या यशाने हे स्पष्ट केले तुमचे लक्ष्य स्पष्ट आणि प्रयत्न निरंतर असतील तर कोणतीही कठीण गोष्ट सोपी होते.

Follow Us