AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चेहऱ्यावर हवाय नॅचरल ग्लो, तर ‘या’ टिप्स फाॅलो करा

त्वचा निरोगी ठेवण्यासाठी आपण विविध उपाय ट्राय करतो. निरोगी आणि चमकदार त्वचा मिळवण्यासाठी, विविध सौंदर्य उत्पादनांचा वापर करतात.

चेहऱ्यावर हवाय नॅचरल ग्लो, तर 'या' टिप्स फाॅलो करा
सुंदर त्वचा
| Edited By: Anish Bendre | Updated on: Mar 23, 2021 | 12:36 PM
Share

मुंबई : त्वचा निरोगी ठेवण्यासाठी आपण विविध उपाय ट्राय करतो. निरोगी आणि चमकदार त्वचा मिळवण्यासाठी, विविध सौंदर्य उत्पादनांचा वापर करतो. परंतु, आपणास माहित आहे का की, या महागड्या उत्पादनांऐवजी काही चांगल्या सवयींचा अवलंब करून देखील आपण निरोगी त्वचा मिळवू शकता. या सवयींचा अवलंब केल्याने त्वचा सुधारण्यास सुरुवात होते. (Follow these tips to get a natural glow on your face)

-हळद अँटीबॅक्टेरीयल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्मांनी परिपूर्ण आहे. यामुळे त्वचा चमकदार होण्यास मदत होते. यातील पोषण तत्त्व कोलेजनचे उत्पादन वाढवतात, ज्यामुळे त्वचेवरील सुरकुत्या कमी होण्यास मदत मिळते. बेसनमध्ये अर्धा चमचा हळद पावडर मिक्स करा. दूध टाकून पेस्ट तयार करा जर तुमच्याकडे गुलाब जल असेल तर या पेस्टमध्ये गुलाब जल मिक्स करा. ही पेस्ट चेहरा आणि मानेवर लावा आणि चेहरा कोमट पाण्याने धुवून घ्या.

-मध आणि दूध दोन्हीही क्लींजिंग एजंट म्हणून काम करतात आणि मुरुमांना कारणीभूत बॅक्टेरीया कमी करण्यासाठी कार्य करतात. हे त्वचेत क्लिंजरसारखे कार्य करते. यासाठी आपल्याला एक चमचे दूधात 2 चमचे मध मिसळून पेस्ट तयार करावी लागेल. ही पेस्ट आपल्या चेहऱ्यावर 5 ते 10 मिनिटे लावून ठेवा आणि नंतर थंड पाण्याने धुवा. त्वचा निरोगी आणि चमकदार राहण्यासाठी टोनर आणि मॉइश्चरायझर वापरा.

-मुलतानी माती आणि गुलाबाच्या पाण्यात, ऑलिव्ह ऑईल मिसळून त्याची पेस्ट बनवा. ही पेस्ट चेहऱ्यावर व्यवस्थित लावा. दीड तासानंतर कोमट पाण्याने आपला चेहरा धुवा. यामुळे त्वचेचा कोरडेपणा नाहीसा होईल. केळी आणि खोबरेल तेलाचा फेस पॅक तयार करण्यासाठी आपल्याला एका वाडग्यात केळी मॅश करावी लागतील. या केल्याच्या मिश्रणात एक चमचा खोबरेल तेल मिसळून चेहऱ्यावर लावा. कोरडा झाल्यानंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा.

-थोडी मसूर डाळ शुद्ध तुपात भाजून घ्या. यानंतर, डाळ दुधात भिजवून घ्या आणि ही डाळ चांगली भिजल्यानंतर त्याची बारीक पेस्ट करून घ्या. ही पेस्ट किमान एक ते दीड तास चेहर्‍यावर लावा. चेहऱ्यावर फेस पॅक लावलेला असताना, कुणाशीही बोलू नका किंवा हावभाव करू नका. अन्यथा, त्वचा सैल होईल. सुकल्यानंतर चेहरा कोमट पाण्याने धुवा. आपण दररोज हा फेस पॅक वापरू शकत नसाल, तर दोन ते तीन दिवसांनी पुन्हा चेहऱ्यावर प्रयोग करा. हा फेस पॅक रेफ्रिजरेटरमध्ये ठेवून पुन्हा वापरू शकता.

संबंधित बातम्या : 

(Follow these tips to get a natural glow on your face)

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली