सफरचंद, संत्रं यावर दालचिनी पावडर टाकून खा, मिळतील आश्चर्यकारक फायदे
आपल्या चांगल्या आरोग्यासाठी आपण नेहमी हेल्दी आहार घेत असतो. अशातच अनेकजण डाएटमध्ये फळांचा समावेश करतात. त्याचवेळी आपल्यापैकी अनेकांना सवय असते ती म्हणजे काही फळे खाताना त्यांची आणखीन चव वाढावी यासाठी मीठ टाकून फळांचे सेवन करतात. पण तुम्ही फळांवर मीठाऐवजी दालचिनी पावडर टाकुन खाल्ल्याने तुम्हाच्या आरोग्याला याचे आश्चर्यकारक फायदे मिळतील. कोणते फायदे शरीराला होतात ते आपण आजच्या या लेखात जाणून घेऊयात...

फळांना अधिक चव येण्यासाठी आपण अनेकदा त्यावर चिमुटभर मीठ टाकून खात असतो. पण तुम्ही फळांचे सेवन करताना त्यावर कच्चे मीठ टाकून खाता त्यामुळे तुमच्या शरीराला याचा फायदा होण्याऐवजी अधिक नुकसान करते. यासाठी आज लेखात आपण फळांमध्ये दालचिनी पावडर टाकून खाण्याचे फायदे सांगणार आहोत. दालचिनी केवळ पदार्थांची चव वाढवतेच असे नाही तर ती तुमच्या आरोग्यासाठी देखील खूप फायदेशीर आहे. दालचिनीमध्ये आढळणारे पोषक तत्व तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतातच पण अनेक प्रकारच्या संसर्ग आणि आजारांपासून तुमचे रक्षण देखील करतात. दालचिनीमध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, लोह, पोटॅशियम आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात जे ताण कमी करतात. चला तर मग जाणून घेऊयात दालचिनी पावडरचे आरोग्यदायी फायदे…
दालचिनी पावडर खाण्याचे आश्चर्यकारक फायदे
मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर
फळांमध्ये मीठाऐवजी दालचिनी पावडर टाकून खाल्ल्याने रक्तातील साखरेची वाढ काही प्रमाणात नियंत्रित करता येते. मधुमेहाच्या रुग्णांनी कधीही फळांमध्ये मीठ टाकून खाऊ नये तर त्यात दालचिनी पावडर टाकावे. यामुळे खूप आरोग्यदायी फायदे मिळतात.
वजन नियंत्रण
तुम्हाला जर तुमचे वजन नियंत्रित करायचे असेल तर तुम्ही दालचिनी पावडर टाकून फळे खावीत. हे तुमचे चयापचय वाढवते आणि शरीरात साठलेली चरबी काही प्रमाणात कमी करण्यास देखील मदत करते.
आतड्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर
दालचिनीमध्ये अनेक पोषक घटक असतात जे तुमच्या आतड्यांच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. हे तुमच्या आतड्यांचे आरोग्य सुधारते.
हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर
दालचिनीमध्ये मॅग्नेशियम आणि पोटॅशियमसह भरपूर अँटीऑक्सिडंट्स असतात. त्यामुळे फळांचे सेवन करताना दालचिनी पावडर टाकूनच करावे. कारण यांच्या सेवनाने हृदयरोग आणि रक्तदाबाच्या रुग्णांसाठी हे फायदेशीर आहे. जर तुम्हाला हृदयाशी संबंधित कोणताही आजार असेल तर तुम्ही तुमच्या जीवनशैलीत दालचिनीचा समावेश करावा.
दालचिनी पावडर पचन आणि बद्धकोष्ठतेसाठी फायदेशीर
दालचिनी तुमच्या पचनासाठी देखील खूप चांगली आहे. एवढेच नाही तर पोटाशी संबंधित समस्या देखील दूर करते. ज्या लोकांना बद्धकोष्ठता, गॅस, आम्लता आणि अपचनाची समस्या आहे त्यांनी रिकाम्या पोटी फळे खाताना त्यात दालचिनी पावडर टाकून खावीत.
दालचिनीमध्ये असतात अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म
दालचिनीमध्ये बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ आणि बुरशीनाशक गुणधर्म असतात जे किरकोळ संसर्ग बरे करण्यास देखील मदत करतात. दिवसभर तुम्हाला ऊर्जेचा अभाव, थकवा, अशक्तपणा जाणवतो. म्हणून तुम्ही रिकाम्या पोटी दालचिनी पावडर पाण्यात मिक्स करून प्यावी किंवा फळांमध्ये टाकून खावी.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)
