Gastric Headache: गॅसमुळे होतेय का डोकेदुखी? हे घरगुती उपाय देतील दिलासा!

पोटात गॅस तयार झाल्यामुळे डोकेदुखीच्या समस्येचा सामना करणारे अनेक जण आहेत. गॅसमुळे होणाऱ्या डोकेदुखीसाठी अनेक गोष्टी कारणीभूत असतात. जाणून घ्या, गॅस्ट्रिक डोकेदुखी (Gastric Headache) कशामुळे होते आणि कोणत्या घरगुती उपायांनी ही समस्या कमी करता येऊ शकते.

Gastric Headache: गॅसमुळे होतेय का डोकेदुखी? हे घरगुती उपाय देतील दिलासा!
वनिता कांबळे

|

Aug 09, 2022 | 11:33 PM

डोकेदुखी हा सामान्य आजार (Common diseases) असला तरी तुमचे डोके नेमके कोणत्या कारणामुळे दुखते आहे हे खूप महत्त्वाचे आहे. डोकेदुखीच्या अनेक कारणांपैकी गॅस हे देखील एक कारण आहे. पोटात गॅस तयार झाल्यामुळे डोकेदुखीचा त्रासही होतो. जठराची समस्या (Stomach problem) आणि अॅसिडिटीमुळेही अनेकांना डोकेदुखीच्या समस्येला सामोरे जावे लागते. गॅसमुळे होणारी डोकेदुखी खूप वेदनादायक असते कारण यामध्ये व्यक्ती एकाच वेळी डोकेदुखी आणि गॅसच्या समस्येशी झुंज देत असते. अशा परिस्थितीत गॅस आणि डोकेदुखीवर वेळीच उपचार (Timely treatment) न केल्यास ही समस्या आणखी वाढू शकते आणि तुम्हाला वेगळ्या त्रासाला सामोरे जावे लागू शकते. अशा परिस्थितीत, प्रथम आपण गॅस्ट्रिक डोकेदुखी म्हणजे काय आणि ते कसे बरे केले जाऊ शकते हे जाणून घेऊया.

गॅसमुळे डोकेदुखी कशी होते

एका वेबसाइटशी बोलताना मुंबईच्या वोकहार्ट हॉस्पिटलचे आयसीयू संचालक डॉ. बिपिन जिभकाटे यांनी सांगितले की, अपचन किंवा आम्लपित्त,गॅस यांसारख्या सामान्य गॅस्ट्रोइंटेस्टाइनल समस्यांमुळे गॅस्ट्रिक डोकेदुखी उद्भवते. त्यांनी सांगितले की, आपले पोट आणि मेंदू यांच्यात खोलवर संबंध आहे. गॅस्ट्रोइंटेस्टाइनल सिस्टममधील समस्यांमुळे बऱ्याच लोकांना डोकेदुखीचा त्रास होतो. याचे कारण म्हणजे आवश्यक प्रमाणात अन्न तुमच्या शरीरात पोहचत नाही, ज्यामुळे तुम्हाला डोकेदुखीचा त्रास सुरू होतो.

ते पुढे म्हणाले, “हेलिकोबॅक्टर पायलोरी संसर्ग, इरिटेबल बोवेल सिंड्रोम, बद्धकोष्ठता(Irritable Bowel Syndrome ), जीईआरडी (गॅस्ट्रो-एसोफेजियल रिफ्लक्स डिसऑर्डर), गॅस्ट्रोपेरेसिस, इन्फ्लॅमेटरी बोवेल डिसीज(Inflammatory Bowel Disease) यासारख्या काही परिस्थितीमुळे देखील डोकेदुखी होऊ शकते.”

डोकेदुखी दूर करण्यासाठी घरगुती उपाय

लिंबूपाणी:-– लिंबू डोकेदुखी पासून मुक्त होण्यासाठी एक उत्तम घरगुती उपाय आहे कारण त्यात दाहक-विरोधी गुणधर्म आहेत. एका लिंबाचा रस कोमट पाण्यात मिसळून प्या. गॅसमुळे होणारी डोकेदुखी टाळण्यास मदत होते.

ताक- पोटात गॅस निर्माण झाल्यामुळे तुम्हाला डोकेदुखीचा त्रास होत असेल तर दिवसातून दोनदा ताक प्यायल्याने खूप आराम मिळतो.

येाग्य प्रमाणात पाणी प्या- डोकेदुखीचे सर्वात मोठे कारण म्हणजे पुरेसे पाणी न पिणे. शरीरात पाण्याच्या कमतरतेमुळे डोकेदुखी होते. अशा परिस्थितीत जर तुम्हाला डोकेदुखी टाळायची असेल तर दररोज 10 ते 12 ग्लास पाणी नक्की प्या.

तुळशीची पाने चघळा:- दररोज ७-८ तुळशीची पाने चघळल्याने डोकेदुखी कमी होते आणि स्नायूंना आराम मिळतो. तुळशीच्या पानांमध्ये वेदनाशामक गुणधर्म असतात जे तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरतात.

पोटाच्या समस्येपासून मुक्ती मिळवण्यासाठी घरगुती उपाय

या पेयांचे सेवन करा- काकडीचा रस, लिंबूपाणी, आले पाणी, नारळ पाणी, ओवा(अजवाईन)चे पाणी आणि बडीशेपचे पाणी यासारखी काही पेये गॅसेस, ऍसिड रिफ्लक्स आणि बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून मुक्त होण्यास मदत करू शकतात. हे पेय पोटातील पेशी बरे करण्यास मदत करतात.

लसूण दूध- लसणाच्या दुधामध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात आणि ते गॅस, पोटदुखी, सूज आणि अपचन कमी करण्यास मदत करते. जर तुम्हाला हृदयरोग किंवा संधिवात असेल तर तुम्ही लसणाच्या दुधाचे सेवन करू शकता.

पुदिना – पुदिना हे अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटीबॅक्टेरियल गुणांनी समृद्ध आहे. हे तुमच्या पोटात आणि घशातील जळजळ शांत करते आणि त्वरित आराम देते.

आहार– नेहमीच्या आहारात पांढरा तांदूळ, तपकिरी तांदूळ, लाल तांदूळ, पोहे, साबुदाणा, इडली डोसा यासारख्या गोष्टींचा समावेश करा. मूग, तूर, उडीद डाळ यांचाही आहारात समावेश करा. या सर्व गोष्टी तुमच्या पोटासाठी खूप फायदेशीर मानल्या जातात.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें