केसांना तूप लावण्याचे जबरदस्त फायदे, वाचा याबद्दल अधिक !

| Updated on: Apr 18, 2021 | 5:30 PM

तूप खाणे आपल्याच नाहीतर आपल्या केसांच्या आरोग्यासाठी देखील अत्यंत फायदेशीर आहे.

केसांना तूप लावण्याचे जबरदस्त फायदे, वाचा याबद्दल अधिक !
तूप
Follow us on

मुंबई : तूप खाणे आपल्याच नाहीतर आपल्या केसांच्या आरोग्यासाठी देखील अत्यंत फायदेशीर आहे. त्यात अनेक प्रकारचे पोषक घटक असतात. तूपात व्हिटॅमिन ए, के, ई असते. तूप खाल्लांने आपले केस चांगले होतात. केस बहुधा कोरडे आणि निर्जीव होतात. तुपामुळे डोक्यातील कोंडा, फुटलेले केस, पांढरे केस या समस्या दूर होऊ शकतात. जर आपले केस खराब झाले असतील तर आपण केसांना तूपाने मालिश करा. यामुळे तुमचे केस मुलायम आणि चमकदार बनतील. (Ghee is beneficial for hair)

-सध्या जवळपास सर्वच लोक कोंड्याच्या समस्येमुळे हैराण आहेत. काहीही केले तरी डोक्यातील कोडा कमी होत नाही. जर तुमच्याही डोक्यात कोडा आहे तर तूप आणि बदाम तेलाने मालिश करा.

-केस कोरडे आणि निर्जीव दिसू लागतात. केस चमकदार करण्यासाठी आपण तूप वापरू शकता. कोमट तूप घेऊन मालिश करा. यानंतर, केसांवर लिंबाचा रस लावा आणि तसेच राहू द्या आणि नंतर केस धुवा.

-तूप स्प्लिट एण्ड्सचे पोषण करते, जे मुळात कमकुवत असतात. व्हिटॅमिन ए, डी, के 2, ई आणि अँटिऑक्सिडेंट्स सारख्या पोषक द्रव्यांसह समृद्ध तूप आपल्या केसांसाठी फायदेशीर आहे.

-रात्रभर केसांची सखोल कंडिशनिंग करायची असेल तर आपल्या केसांना तूप लावा. मग शॉवर कॅपने डोके झाकून सकाळी उठून आपले केस धुवा.

-बदललेल्या जीवनशैलीमुळे आपल्या केसांची वाढ होत नसेल तर तूपात आवळा आणि कांद्याचा रस मिसळा आणि मालिश करा.

-तूप केसांना हायड्रेट करते. केसांमध्ये ओलावा कमी झाल्यामुळे केस निस्तेज व खराब होतात. अशा केसांसाठी तूप उत्तम उपाय आहे. त्यात आढळणारे हेल्दी फॅटी अॅसिड स्कल्पचे पोषण करून केसांच्या मुळांना हायड्रेट करतात.

संबंधित बातम्या : 

Food | ‘या’ पदार्थांना दूर ठेवा आणि हिवाळ्याच्या काळात सर्दी-खोकल्यापासून सुरक्षित राहा!

HEALTH | ‘कोरोना’च्या धसक्याने जीवनशैलीत चांगले बदल, पावसाळी आजारांत 50% घट!

(Ghee is beneficial for hair)