HEALTH | ‘कोरोना’च्या धसक्याने जीवनशैलीत चांगले बदल, पावसाळी आजारांत 50% घट!

कोरोनाच्या भीतीने सगळ्यांच्या जीवनशैलीत काही सकारात्मक बदल घडून आले आहेत. आहार, व्यायाम याकडे लोकांनी अधिकचे लक्ष दिले आहे.

HEALTH | ‘कोरोना’च्या धसक्याने जीवनशैलीत चांगले बदल, पावसाळी आजारांत 50% घट!
Follow us
| Updated on: Oct 06, 2020 | 12:40 PM

मुंबई : जागतिक महामारी म्हणून घोषित करण्यात आलेल्या ‘कोरोना’ विषाणूने (Corona Virus) जगभरात काही चांगले बदल घडवून आणले आहेत. कोरोनाच्या भीतीने सगळ्यांच्या जीवनशैलीत काही सकारात्मक बदल घडून आले आहेत. आहार, व्यायाम याकडे लोकांनी अधिकचे लक्ष दिले आहे. यामुळे यंदा मान्सून आजारांत (Monsoon Disease) तब्बल 50% घट दिसून आली आहे (Monsoon Disease cases decreased due to Fear of corona Virus and changed lifestyle).

यंदाच्या वर्षी राजधानी दिल्लीत टायफॉईड- इन्फ्लूएन्झासारख्या मान्सून आजारांत (Monsoon Disease) कमालीची घट दिसून आहे. दरवर्षी या आजारांमुळे अनेक लोक रुग्णालयात भरती होत असतात. मात्र, यंदा या आकड्यात तब्बल 50% घट दिसून आली असल्याचे, दिल्लीच्या डॉक्टरांनी म्हटले आहे.

द्वारका येथील आकाश हेल्थकेअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या म्हणण्यानुसार, गेल्या दोन महिन्यांत टायफॉईड आणि इन्फ्लूएन्झाचे केवळ 50 रुग्ण त्यांच्याकडे उपचारासाठी दाखल झाले होते. दरवर्षी पावसाळी हंगामात साधारणत: 100 ते 150 रूग्ण येथे दाखल असतात. ‘यावर्षी टायफॉईडचे फारसे रुग्ण आढळले नाहीत, सहसा या हंगामात बरीचशी प्रकरणे नोंदवली जातात’, असे इंटरनल मेडिसिनचे वरिष्ठ सल्लागार डॉ. विक्रम जीत सिंह म्हणाले. (Monsoon Disease cases decreased due to Fear of corona Virus and changed lifestyle)

यावर्षी हंगामी आजारांत दिसली घट!

शालिमार बागच्या मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्येही टायफॉईडशी संबंधित प्रकरणांमध्ये सुमारे 50 टक्क्यांची घसरण दिसून आली आहे. तर, इंटरनल मेडिसिन सल्लागार डॉ. पारुल कक्कर यांनी सांगितले की, या हंगामात इतर तापांचे प्रमाण वाढले आहे.

राजेंद्र प्लेस येथील बीएलके हॉस्पिटलमध्येही टायफॉईड आणि इन्फ्लूएन्झाच्या प्रकरणांमध्ये लक्षणीय घट झाली आहे. ‘दरवर्षी टायफॉईडचे प्रमाण वाढत असते आणि पावसाळ्याच्या अखेरीस हे प्रमाण कमी होते. परंतु या वर्षी तसे झाले नाही’, अशी कबूली इंटरनल मेडिसिन विभागाचे प्रमुख आणि वरिष्ठ संचालक राजिंदरकुमार सिंघल यांनी दिली आहे.

राहणीमानातील बदलांमुळे टायफॉईड-इन्फ्लूएन्झाच्या प्रकरणांत घट

टायफॉईड आणि इन्फ्लूएन्झाच्या प्रकरणांत घट होण्यामागे डॉक्टरांनी दोन महत्त्वाची कारणे सांगितली आहेत. पहिले कारण असे की, कोव्हिड-19 (Corona Virus) साथीच्या रोगामुळे स्वच्छतेत खूप वाढ झाली आहे. तर दुसरे कारण म्हणजे लोक फक्त घरगुती अन्न खात आहेत. डॉ. कक्कर म्हणाल्या की, ‘साथीच्या रोगामुळे आपल्या जीवनशैलीत, अन्न व सामाजिक शिष्टाचारांत बदल झाले आहेत. यातील काही बदल फायद्याचे ठरले, ज्यामुळे यावर्षी टायफॉईड आणि हेपेटायटीसचे प्रमाण कमी झाले आहे’.

(Monsoon Disease cases decreased due to Fear of corona Virus and changed lifestyle)

हेही वाचा :

भारतात 10 वर्षांनी BMI चे नियम बदलले, महिला आणि पुरुषांसाठी फिटनेसचं नवं वजन काय?

फिट राहण्यासाठी आता जिममध्ये जाण्याची गरज नाही

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.