AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ginger | आरोग्यच नव्हे तर, त्वचा आणि केसांसाठीदेखील ‘आले’ गुणकारी!

आले केवळ आरोग्यासाठीच नाहीतर त्वचा आणि केसांसाठी देखील खूप फायदेशीर आहे.

Ginger | आरोग्यच नव्हे तर, त्वचा आणि केसांसाठीदेखील ‘आले’ गुणकारी!
विविध आरोग्य समस्यांवर फायदेशीर आले
Harshada Bhirvandekar
Harshada Bhirvandekar | Updated on: Dec 30, 2020 | 4:33 PM
Share

मुंबई : आले आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. आपल्या सर्वांनाच ही गोष्ट माहित आहे. परंतु, आपल्याला हे माहित आहे का की, आले केवळ आरोग्यासाठीच नाहीतर त्वचा आणि केसांसाठी देखील खूप फायदेशीर आहे. आले आपल्या त्वचेशी संबंधित अनेक समस्या दूर करण्याचे काम करते. आल्याचा रस त्वचेवरील डाग, सुरकुत्या, मुरुम कमी करतो (Ginger helpful for skin and hairs problem).

आल्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वे, झिंक यासारखे बरेच पौष्टिक घटक आढळतात, जे त्वचेला पोषण देण्याचे काम करतात. चला तर, जाणून घेऊया आल्यामुळे आपले केस आणि त्वचेची समस्या कशाप्रकारे दूर होतील…

मुरुमांपासून मिळेल मुक्ती

आल्यामध्ये अँटी-एजिंग गुणधर्म आहेत, जे मुरुम आणि डाग काढून टाकण्यास मदत करतात. आपण कॉटन बॉलच्या मदतीने चेहऱ्यावर आल्याचा रस लावू शकता. याशिवाय आपण आल्याचा फेस स्क्रब देखील बनवू शकता. आल्याचा फेस स्क्रब बनवण्यासाठी 2 चमचे ऑलिव्ह तेल, थोडासे आले, 3 चमचे ब्राऊन सुगर या सगळ्यांचे बारीक वाटून हे मिश्रण एका वाटीत काढून घ्या. यानंतर ही पेस्ट चेहर्‍यावर लावा. चेहऱ्यावर हा आल्याचा स्क्रब लावा आणि गोलाकार मोशनमध्ये मसाज करा. यानंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा. काही दिवसांतच याचा फायदा दिसून येईल.

आले आणि मध

चेहऱ्यावरील मुरुमांमुळे त्रास होत असेल, तर आले आणि मधाची पेस्ट चेहर्‍यावर लावा. सुमारे 15 ते 20 मिनिटे हा फेस मास्क चेहऱ्यावर लावून ठेवा. मुरुमांच्या समस्येपासून मुक्त होण्यासाठी आठवड्यातून किमान 2 वेळा हा फेसपॅक वापरा (Ginger helpful for skin and hairs problem).

केसांतील कोंडा

हिवाळ्यातील केसांतील कोंड्याची समस्या सर्वात त्रासदायक आहे. आपणही या समस्येतून मुक्त होऊ इच्छित असल्यास, आल्याचा रस आपल्या तेलात मिसळा आणि नंतर ते केसांवर लावा. हे तेल लावल्यानंतर हलक्या हातांनी स्काल्पची मालिश करा. याशिवाय तुम्ही दह्यामध्ये आल्याचा रस घालून हे मिश्रण केसांमध्ये लावू शकता. यामुळे आपले केस मॉइश्चराइझ होतात. आल्यामुळे आपल्या केसांमधील कोंडा कमी होण्यास मदत होते.

डार्क सर्कल्स

डोळ्यांभोवतालची काळी वर्तुळे अर्थात डार्क सर्कल्स कमी करण्यासाठी आपण आल्याचा रसाचा वापर करू शकता. आल्याच्या रसाने डोळ्यांखाली मसाज करा. मसाज करताना हा रस आपल्या डोळ्यांत जाणार नाही याची काळजी घ्या. रस डोळ्यात गेल्याने डोळ्यांना हानी होणार नाही, मात्र ते चुरचुरू लागतील.

(Ginger helpful for skin and hairs problem)

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

हेही वाचा :

Follow Us
सचिन वाझेचा जामीन कायम राहणार? कोर्टाने पुन्हा सुनावणी नाकारली; कारण..
सचिन वाझेचा जामीन कायम राहणार? कोर्टाने पुन्हा सुनावणी नाकारली; कारण...
कर्जमाफीचा तिसरा हप्ता आला; शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट पैसे जमा...
मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता आला; शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट पैसे जमा...
AI चं नाव बदललं? डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; आता...
Donald Trump : AI चं नाव बदललं? डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; आता Artificial Intelligence नव्हे तर....
अरबी समुद्रात ड्रग्ज तस्करांना झटका! एवढे किलो हेरॉईन-मेथाफेमाईन जप्त
Lakshadweep : अरबी समुद्रात ड्रग्ज तस्करांना मोठा झटका! तब्बल एवढे किलो हेरॉईन-मेथाफेमाईन जप्त; थेट पाकिस्तानी...
माझ्या डॅडला न्याय द्या! प्रदीप पूर्णेकरांच्या मुलाचा टाहो; म्हणाले...
माझ्या डॅडला न्याय द्या! प्रदीप पूर्णेकरांच्या मुलाचा टाहो; मुख्यमंत्र्यांना केलं भावनिक आवाहन, म्हणाले...
प्रदीप पूर्णेकर यांना का संपवलं?; राऊतांनी सांगितलं खरं कारण म्हणाले..
Sanjay Raut : प्रदीप पूर्णेकर यांना का संपवलं?; संजय राऊतांनी सांगितलं खरं कारण, म्हणाले...
रत्नागिरीत पंचनाम्याला सुरुवात, कृषी विभागाचं पथक थेट बांधावर
Ratnagiri : रत्नागिरीत पंचनाम्याला सुरुवात, कृषी विभागाचं पथक थेट बांधावर
राज्यभरातून दुष्काळग्रसतांसाठी मदतीचे हात सरसावले; गजानन महाराज...
Dry Drought Help : राज्यभरातून दुष्काळग्रसतांसाठी मदतीचे हात सरसावले; शेगावच्या गजानन महाराज संस्थानकडून तब्बल एवढी मदत जाहीर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट; CCTV फुटेज समोर तर....
Thane : प्रदीप पुर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट; CCTV फुटेज समोर तर, जुन्या वादातून....
संजय राऊत यांच्या विरोधात फौजदारी अवमान याचिका दाखल; नेमकं प्रकरण काय?
मोठी बातमी! संजय राऊत यांच्या विरोधात फौजदारी अवमान याचिका दाखल; नेमकं प्रकरण काय?