शाकाहारी लोकांसाठी खास अंड्याची निर्मिती केली जाणार

नवी दिल्ली : अंडे शाकाहारी की मांसाहारी यावरुन अनेकदा वाद निर्माण झाले आहेत. अंडे हे कोंबडी किंवा इतर पक्षी म्हणजेच सजीवांकडून मिळत असल्याने ते मांसाहारी असल्याचा दावा अनेकांकडून केला जातो. तर काही जण दररोज खाण्यात वापरल्या जाणाऱ्या अंड्यात गर्भ नसतो त्यामुळे ते शाकाहारी असल्याचे सांगितलं जाते. या वादामुळे अनेक शाकाहारी व्यक्तींना अंडे खाता येत नाही. …

good news for vegetarians, शाकाहारी लोकांसाठी खास अंड्याची निर्मिती केली जाणार

नवी दिल्ली : अंडे शाकाहारी की मांसाहारी यावरुन अनेकदा वाद निर्माण झाले आहेत. अंडे हे कोंबडी किंवा इतर पक्षी म्हणजेच सजीवांकडून मिळत असल्याने ते मांसाहारी असल्याचा दावा अनेकांकडून केला जातो. तर काही जण दररोज खाण्यात वापरल्या जाणाऱ्या अंड्यात गर्भ नसतो त्यामुळे ते शाकाहारी असल्याचे सांगितलं जाते. या वादामुळे अनेक शाकाहारी व्यक्तींना अंडे खाता येत नाही. मात्र आता लवकरच मूगाच्या डाळीपासून अंड्याची निर्मिती करण्यात येणार आहे. हे अंडे शाकाहारी असल्याने ते शाकाहारी व्यक्तींनाही खाता येणार आहे.

एका प्रसिद्ध नामांकित कंपनीने गेल्यावर्षी अंड्यासाठी पर्याय म्हणून मूग डाळीचा वापर केला होता. गेल्यावर्षी या कंपनीने अमेरिकेतील बाजारात हे अंडे विक्रीस ठेवले होते. त्या ठिकाणी अंड्याच्या या शाकाहारी पर्यायाला भरपूर प्रतिसाद मिळाला. त्यामुळे कंपनी आता लवकरच भारतीय बाजारात मूग डाळीपासून बनवलेलं शाकाहारी अंडे विक्रीस ठेवणार आहे.

संडे हो या मंडे, रोज खाओ अंडे असे म्हटलं जाते. अंड्यात प्रामुख्याने तीन भाग असतात. अंड्याचे कवच, पिवळा बलक आणि पांढरा भाग असे तीन भाग अंडयात असतात. यातील पांढऱ्या भागात प्रथिनं असतात, पिवळा बलकमध्ये कोलेस्ट्रॉल, फॅट्स आणि प्रथिने असतात. या सर्वांचा विचार करता अंड्यात व्हिटॅमिन, कॅल्शियम, पोटॅशियम, प्रथिनं आणि फॉस्फरससारखे शरीराला आवश्यक असणारी सर्व पोषक तत्त्वे मिळतात. यामुळे प्रत्येकाने दिवसाला एकतरी अंडे खावे असा सल्ला दिला जातो.

मात्र अंडे हे शाकाहारी की मांसाहारी गटात बसते याबाबत अद्याप कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही. त्यामुळे शाकाहारी लोक सहसा अंडे खाणं टाळतात. या लोकांसाठी काही कंपन्या अंड्याला पर्याय शोधत आहे. काही वर्षांपूर्वी सोयाबीनच्या झाडापासूंन शाकाहारी अंड्याची निर्मिती केली गेली होती. हे अंडे दिसायला कोंबडीच्या अंड्याप्रमाणेच होते. पण याची चव थोडी वेगळी होती. या अंड्यातील पिवळा बलक हा वनस्पती तेल आणि काही विशिष्ट जेलपासून तयार करण्यात आला होता.

ग्राहकांना न सांगता अंड्यात बदल करण्याचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. अनेक शाकाहारी लोक उकडलेले अंडे किंवा भुर्जी यांसारखे अंड्यापासून बनवलेले पदार्थ खात नाहीत. मात्र ही लोक केक किंवा पुडिंग या गोष्टी मात्र आवडीने खातात. त्यामुळे अनेक शाकाहारी लोकांना आपण अंडे खात असल्याची थोडीशीही चाहूल लागत नाही, अशी माहिती प्लांट बेस्ड फूड्स असोसिएशनच्या सर्वेसर्वा मिशेल सिमन यांनी दिली.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *