हिवाळ्यातील सुपरफूड आहेत डिंकाचे लाडू, ‘या’ 6 जबरदस्त आरोग्यदायी फायद्यांसह जाणून घ्या सोपी रेसिपी

डिंकाचे लाडू हिवाळ्यात आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. त्यात निरोगी जीवनासाठी आवश्यक असलेले अनेक पोषक घटक असतात. म्हणूनच हिवाळ्यात डिंकाचे लाडू खाण्याचा सल्ला देतात. जर तुम्हालाही डिंकाचे लाडू घरी बनवायचे असेल तर आजच्या लेखात आपण त्याची रेसिपी आणि आरोग्यदायी फायदे जाणून घेऊयात.

हिवाळ्यातील सुपरफूड आहेत डिंकाचे लाडू, या 6 जबरदस्त आरोग्यदायी फायद्यांसह जाणून घ्या सोपी रेसिपी
Laddu
Image Credit source: Tv9 Network
| Edited By: | Updated on: Nov 15, 2025 | 2:05 PM

हिवाळा सुरू होताच आपण आपल्या आहारात अनेक बदल करत असतो. कारण ऋतूच्या बदलाने आपल्या आरोग्यावर परिणाम होत असतो. म्हणून ऋतूनुसार खाल्ल्याने आरोग्याच्या समस्या टाळण्यास मदत होते. म्हणूनच थंडीच्या दिवसांमध्ये आपली आजी डिंकाचे लाडू बनवायला सुरूवात करायच्या. डिंकाचा लाडू खूप पौष्टिक असतात आणि चवीला अप्रतिम असतात.

त्यामुळे हिवाळ्यात डिंकाचे लाडू खाणे खूप फायदेशीर मानले जाते. तर आजच्या लेखात आपण घरी डिंकाचा लाडू कसा बनवायचा आणि ते खाल्ल्याने आपल्या आरोग्याला कोणते फायदे होतात ते जाणून घेऊयात.

गोंड लाडू खाण्याचे फायदे

ऊर्जा आणि उबदारपणा प्रदान करते – डिंक हे गरम स्वभावाचे असते, म्हणून डिंक हिवाळ्यात शरीराला नैसर्गिकरित्या उबदार ठेवण्यास मदत करते. तूप, पीठ आणि काजू यांच्या मिश्रणाने बनवले जाणारे डिंकाचे लाडू उर्जेचा चांगला स्रोत आहेत, ज्यामुळे थकवा दूर होण्यास मदत होते.

हाडे आणि सांध्यासाठी फायदेशीर – डिंक कॅल्शियमने समृद्ध आहे , जे हाडांची घनता वाढविण्यास आणि त्यांना मजबूत करण्यास मदत करते. तसेच तुम्ही डिंकाच्या लाडूचे सेवन केल्यास त सांध्यातील लुब्रिकेशन सुधारण्यास आणि सांधेदुखी आणि संधिवात कमी करण्यास देखील मदत करते.

आई आणि बाळासाठी – डिंकाचे लाडू हे नुकतेच प्रसृती झालेल्या आईसाठी खूप फायदेशीर असते. पारंपारिकपणे डिंकाचे लाडू प्रसूतीनंतर त्या महिलेला खायला दिले जातात. हे लाडू आईच्या शरीराला शक्ती आणि आवश्यक पोषण प्रदान करतात आणि स्तनपान सुधारतात.

रोगप्रतिकारक शक्ती वाढवते – डिंक आणि काजूमध्ये असलेले पोषक तत्वे, जीवनसत्त्वे आणि खनिजे रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यास मदत करतात, ज्यामुळे थंडीच्या दिवसात सर्दी, खोकला आणि इतर हंगामी आजार टाळता येतात.

पचनास मदत करते – डिंक हे फायबरचे एक चांगले स्रोत आहे , जे निरोगी पचनसंस्था राखण्यास आणि बद्धकोष्ठतेपासून मुक्त होण्यास मदत करते.

त्वचा आणि केसांसाठी – डिंकाचे लाडूमध्ये असलेले तूप आणि काजू हेल्दी फॅट्स आणि व्हिटॅमिन ई प्रदान करतात, जे हिवाळ्यात त्वचेला कोरडेपणापासून वाचवतात आणि केसांना निरोगी ठेवतात.

लक्षात ठेवा की डिंकाचे लाडू कॅलरीज आणि फॅटने समृद्ध असतात, म्हणून ते संतुलित प्रमाणातच खावेत.

डिंकाचे लाडू बनवण्याची कृती

आवश्यक साहित्य

डिंक – 100 ग्रॅम

गव्हाचे पीठ – 250 ग्रॅम

साजूक तूप – सुमारे 300 ग्रॅम

पिठीसाखर – 250 ग्रॅम

बदाम, काजू – 100 ग्रॅम

नारळाचा किस- 50 ग्रॅम

वेलची पावडर – 1 टीस्पून

बनवण्याची पद्धत

प्रथम, एका पॅनमध्ये सुमारे 200 ग्रॅम तूप गरम करा. आता त्यात डिंक थोड्या थोड्या प्रमाणत टाका.

जेव्हा डिंक फुगून हलका सोनेरी रंगाचा होईल तेव्हा तो काढून प्लेटमध्ये ठेवा. थंड झाल्यावर लाटण्याच्या साहाय्याने किंवा वाटीने बारीक करा.

आता त्याच पॅनमध्ये उरलेले 100 ग्रॅम तूप टाका. नंतर गव्हाचे पीठ त्या तुपात टाकून मंद आचेवर भाजण्यास सुरुवात करा.

पीठ हलके सोनेरी रंगाचे होईपर्यंत आणि चांगला वास येईपर्यंत सतत परतवत राहा.

आता भाजलेले पीठ एका मोठ्या प्लेट किंवा भांड्यात काढा.

नंतर, एका पॅनमध्ये चिरलेले बदाम आणि काजू हलके सोनेरी होईपर्यंत भाजून घ्या. नारळाचा किस देखील हलके भाजून घ्या.

आता भाजलेले पीठ, कुस्करलेला डिंक, भाजलेले काजू आणि वेलची पूड हे सर्व मिश्रण चांगले मिक्स करा.

मिश्रण थोडे गरम झाल्यावर त्यात पिठीसाखर टाका आणि नीट मिक्स करा. लक्षात ठेवा की जर मिश्रण खूप गरम असेल तर साखर वितळेल.
तयार मिश्रणाचे छोटे छोटे गोल लाडू बनवा.

जर तुम्हाला मिश्रण कोरडे वाटले आणि लाडू तयार होत नसतील तर तुम्ही एक किंवा दोन चमचे गरम तूप घालून ते मिक्स करू शकता.

चविष्ट आणि निरोगी डिंकाचे लाडू तयार आहेत! ते पूर्णपणे थंड झाल्यावर हवाबंद डब्यात ठेवा.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)