Hair Care Tips : पावसाळ्यात अशी घ्या तुमच्या केसांची काळजी, फॉलो करा या सोप्या टिप्स

बदलत्या ऋतूनुसार केसांच्या समस्या उद्भवणे हे अतिशय सामान्य आहे. मजबूत आणि चांगले केस मिळावेत यासाठी लोक अनेक महागड्या उत्पादनांचा वापर करतात. मात्र दरवेळेस फायदा होतोच असे नाही

Hair Care Tips : पावसाळ्यात अशी घ्या तुमच्या केसांची काळजी, फॉलो करा या सोप्या टिप्स
Image Credit source: freepik
| Updated on: Jun 24, 2023 | 2:41 PM

नवी दिल्ली : पावसाळ्याचा मोसम आता (monsoon) जवळ आला आहे. थोड्याच दिवसांत सगळीकडे थंड वातावरण होईल. सततच्या पावसाने गारवा आला तरी अशा ऋतूत आजारांचा त्रासही वाढतो. सर्दी, खोकला, व्हायरल, फ्लूच्या त्रासाने अनेक लोक हैराण होतात. त्याशिवाय या ऋतूमध्ये त्वचा आणि केसांच्या समस्याही (skin and hair problem) वाढताच. अशा परिस्थितीत आपले आरोग्या चांगले रहावे यासाठी आपण काळजी घेतोच. पण त्यासोबतच त्वचेची आणि केसांचीही काळजी घ्यायला हवी.

पावसाळ्यात केस गळणे आणि तुटण्याची समस्या अधिक वाढते. जर तुम्हीही पावसाळ्यात या समस्येने त्रस्त होत असाल तर काही टिप्सच्या मदतीने तुम्ही तुमचे केस निरोगी ठेवू शकता. त्या टिप्स कोणत्या हे जाणून घेऊया.

– पावसाळ्यात बाहेर किंवा ऑफीसला जाता-येताना तुमचे केस भिजतात व ते अधिक तुटतात. हे टाळायचे असेल तर केस पावसात भिजल्यास घरी आल्यावर लगेच स्वच्छ पाण्याने केस धुवावेत. तुम्हाला हवे असेल तर तुम्ही शांपूचाही वापर करू शकता. केसांना शांपू लावून 2 ते 5 मिनिटे राहू द्यावा, नंतर बोटांनी हलक्या हाताने मसाज करा. थोड्यया वेळाने केस साध्या पाण्याने स्वच्छ धुवा. असे केल्याने केसांमधील घाण पूर्णपणे साफ होईल.

– नंतर एक कोरडा, शक्य असेल तर सुती पंचा किंवा टॉवेल घेऊन त्याने केस हळूहळू वाळवा आणि थोडा वेळ मोकळे सोडा. केस नैसर्गिकरित्या, वाऱ्यावर वाळवा. ते ड्रायरने वाळवण्याची चूक करू नका. केस कोरडे झाल्यावर बोटांनी जटा सोडवून नीट विंचरा.

– आता खोबरेल तेल किंवा मोहरीचे तेल गरम करून त्यात थोडे लिंबू पिळा. हे तेल केसांना लावून हळूवार हाताने मुळांना मसाज करा. तेल केसांमध्येच राहू द्या. अगदीच गरज वाटली तर ३ -४ तासांनी केस धुवून टाका.

– मात्र केस जास्त वेळ ओले राहणार नाहीत याची वेळीच काळजी घ्या.

– पावसाळ्यात किंवा कधीही केस धुतल्यानंतर कंडीशनर जरूर लावावे. यामुळे केस हायड्रेटड राहतात. त्यासाठी तुम्ही विविध हेअर मास्कचाही वापर करू शकता. त्यासाठी तुम्ही प्रोटीन आणि केराटिन युक्त कंडिशनरचाही वापर करू शकता.

– पावसाळ्यात आठवड्यातून किमान दोनदा कोमट तेलाने केसांना मसाज करा. तुम्ही रात्री झोपण्यापूर्वीदेखील केसांना मसाज देखील करू शकता.

– केसांसाठी कोरफडीचे जेल वापरल्यानेही केसांचा पोत सुधारतो व ते गळणे कमी होते.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)