गर्भावस्थेदरम्यान का उद्भवते केस गळतीची समस्या? जाणून घ्या कारणे आणि उपाय

बर्‍याचदा ही समस्या गर्भावस्थेच्या तिमाहीत उद्भवते आणि प्रसुतिनंतर काही महिने केस गळण्याची प्रक्रिया सुरूच राहते.

गर्भावस्थेदरम्यान का उद्भवते केस गळतीची समस्या? जाणून घ्या कारणे आणि उपाय
Follow us
| Updated on: Feb 01, 2021 | 6:51 PM

मुंबई : सर्वसाधारणपणे, प्रत्येक व्यक्तीच्या एकूण केसांपैकी केवळ 10 टक्के केस निष्क्रिय होऊन गळून पडतात. ही प्रक्रिया दर दोन ते तीन महिन्यांनी होते आणि गळलेल्या केसांच्या जागी नवीन केस पुन्हा येतात. परंतु गर्भधारणेदरम्यान आणि बाळच्या जन्मानंतर बहुतेक स्त्रियांचे केस लक्षणीय प्रमाणात गळू लागतात (Hair fall problem during pregnancy reasons and solution).

बर्‍याचदा ही समस्या गर्भावस्थेच्या तिमाहीत उद्भवते आणि प्रसुतिनंतर काही महिने केस गळण्याची प्रक्रिया सुरूच राहते. ही समस्या अगदीच सामान्य आहे. सहसा ही समस्या गर्भधारणेदरम्यान हार्मोन्सच्या चढ-उतारांमुळे उद्भवते. पण याची इतरही काही कारणे असू शकतात. त्यांच्याबद्दल जाणून घेणे आवश्यक आहे.

पोषणाची कमतरता

गर्भवती महिलेला सामान्य महिलांपेक्षा जास्त पोषण आवश्यक असते. कारण तिच्या गर्भात असलेल्या बाळालाही पोषणाची गरज असते. अशा परिस्थितीत, तिच्या शरीराला पुरेसे पोषकद्रव्ये न मिळाल्यास केस गळण्याची समस्या उद्भवू शकते. गर्भधारणेदरम्यान लोह, जस्त आणि फॉलिक अॅसिड सारख्या घटकांचा अभाव देखील केस गळण्याचे कारण असू शकते.

थायरॉईडची कमतरता

केसांची वाढ आणि देखभाल करण्यासाठी थायरॉईड संप्रेरक महत्त्वाची भूमिका बजावते. परंतु कधीकधी गर्भधारणेदरम्यान, महिलांच्या शरीरात थायरॉईड संप्रेरकाची कमतरता निर्माण होते, ज्यामुळे केस गळतीची समस्या उद्भवू शकते.

अनुवांशिक समस्या

काही प्रकरणांमध्ये ही समस्या अनुवांशिक देखील असू शकते. जर आपल्या कुटुंबातील आई, आजी किंवा आजी यांना गरोदरपणात अशी काही समस्या आली असेल, तर त्याचा परिणाम आपल्यावर होणे देखील संभव आहे.

औषधे असू शकतात कारण

गर्भावस्थेदरम्यान आपण कोणत्याही आजाराशी संबंधित औषधे घेत असाल, तर ही औषधे देखील केस गळतीचे कारण असू शकतात. यासाठी आपण एकदा तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता (Hair fall problem during pregnancy reasons and solution).

झोपेचा अभाव

गर्भधारणेदरम्यान बर्‍याच वेळा स्त्रियांना अनेक समस्या येतात, ज्यामुळे त्यांना झोप लागत नाही. त्याचबरोबर मुलाच्या जन्मानंतर स्त्रियांना रात्री उशिरापर्यंत बाळाबरोबर जागे राहावे लागते. अशा परिस्थितीत त्यांचे रुटीन बिघडते, ज्यामुळे केस गळण्याची समस्या उद्भवू शकते.

हे उपाय येतील कामी

– नारळ तेल कोमट करा आणि त्या तेलाने किमान 15 ते 20 मिनिटे केसांना मसाज करा. आठवड्यातून किमान तीन दिवस हा उपाय करा. लवकरच चांगला परिणाम दिसेल.

– स्काल्पवर कोरफड जेल लावा, 10 मिनिटे मसाज करा आणि 15 मिनिटे केस तसेच राहू द्या. त्यानंतर शॅम्पू लावून केस व्यवस्थित धुवा.

– एका पॅनमध्ये दोन चमचे नारळ तेल किंवा ऑलिव्ह तेल घाला. गरम झाल्यावर त्यात दोन चमचे आवळा पावडर घाला. तपकिरी होईपर्यंत तेल गरम करा. थंड झाल्यावर ते केसांच्या मुळांवर लावा आणि एक तासासाठी केस तसेच सोडा. नंतर कोमट पाण्याने केस स्वच्छ धुवा.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

(Hair fall problem during pregnancy reasons and solution)

हेही वाचा :

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.