Happy Easter Day 2021 : ईस्टर संडेनिमित्त प्रियजनांना पाठवण्यासाठी खास मेसेज !

ख्रिश्चन लोकांमध्ये इस्टर संडे दिवस अत्यंत पवित्र मानला जातो. या दिवशी ख्रिश्चन धर्मावर विश्वास ठेवणारे लोक चर्चमध्ये जातात आणि येशूचं स्मरण करतात.

Happy Easter Day 2021 : ईस्टर संडेनिमित्त प्रियजनांना पाठवण्यासाठी खास मेसेज !
ईस्टर संडे

मुंबई : ख्रिश्चन लोकांमध्ये ईस्टर संडे दिवस अत्यंत पवित्र मानला जातो. या दिवशी ख्रिश्चन धर्मावर विश्वास ठेवणारे लोक चर्चमध्ये जातात आणि येशूचं स्मरण करतात. ईस्टर संडे आज सर्वत्र साजरा केला जात आहे, परंतु कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे यावर्षी मिरवणूक काढण्यात येणार नाही. चर्च आणि घरात खास प्रार्थना करून लोक ईस्टर संडे सण साजरे करीत आहेत. (Happy Easter Day 2021 WhatsApp Facebook and Twitter for loved ones on Easter Sunday Special message to send)

सोशल मीडियावरही, लोक ईस्टर संडेच्या एकमेकांना शुभेच्छा देत आहेत. हेच कारण आहे की, ट्विटर देखील ईस्टर संडे हॅपी ईस्टरचा ट्रेंड करीत आहे. एका यूजरने सोशल मीडियावर लिहिले की, हॅप्पी ईस्टर संडे, ईस्टरच्या शुभेच्छा, हा दिवस प्रत्येकासाठी आशीर्वादाने परिपूर्ण होऊ शकतो. तर दुसर्‍याने लिहिले की, हॅप्पी ईस्टर !! देव तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो आणि हा दिवस तुमच्यासाठी अगदी चांगला असावा.

ईस्टर संडेच्या दिवशी ख्रिश्चन लोक प्रार्थना करतात आणि उपवास करतात. या विशेष दिवशी चर्चची सजावट करण्यात येते. चर्चमध्ये आणि घरात मेणबत्त्या लावून प्रार्थना केली जाते. या दिवशी लोक एकमेंकाना अंडी गिफ्ट देतात आणि नवीन आयुष्याच्या सुरुवातीचा संदेश देतात.

संबंधित बातम्या : 

(Happy Easter Day 2021 WhatsApp Facebook and Twitter for loved ones on Easter Sunday Special message to send)

Published On - 10:32 am, Sun, 4 April 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI