बायकोच्या या तीन सवयींमुळे होतो नवऱ्याचा वैताग, वैवाहिक जीवनात येते कटूता

लग्नानंतर आपलं आयुष्य सुखात जावं अशी प्रत्येकाची इच्छा असते, पण कधी कधी दोघांच्या किंवा एका व्यक्तीच्या चुकीमुळे वैवाहिक आयुष्य पूर्णपणे उद्ध्वस्त होतं.

बायकोच्या या तीन सवयींमुळे होतो नवऱ्याचा वैताग, वैवाहिक जीवनात येते कटूता
संशयी बायको
Image Credit source: Social Media
| Updated on: Jul 21, 2023 | 1:36 PM

मुंबई : लग्न ही कोणत्याही आयुष्याची दुसरी इनिंग मानल्या जाते. लग्नानंतर (Happy Marriage Tips) मुलगा आणि मुलगी दोघांचेही आयुष्य पूर्णपणे बदलून जाते. लग्नानंतर परिस्थिती पूर्वीसारखी राहत नाही. लग्नानंतर आपलं आयुष्य सुखात जावं अशी प्रत्येकाची इच्छा असते, पण कधी कधी दोघांच्या किंवा एका व्यक्तीच्या चुकीमुळे वैवाहिक आयुष्य पूर्णपणे उद्ध्वस्त होतं. लग्नानंतर पती-पत्नीमध्ये किरकोळ भांडणे होणे ही सामान्य गोष्ट आहे, ज्यामध्ये कोणाचीही चूक असू शकते, परंतु प्रत्येक वेळी नवऱ्याचीच चूक असेल असे नाही, अनेक वेळा पत्नीही अशा गोष्टी करते ज्यामुळे नाते बिघडू शकते. बायकोच्या कोणत्या सवयींमुळे नवऱ्याचा वैताग होतो ते जाणून घेऊया.

सुखी संसारासाठी पत्नीने या सवयी बदलाव्या

1. प्रत्येक गोष्टीवर संशय घेणे

विश्वास हा कोणत्याही नात्याचा भक्कम पाया असतो आणि पती-पत्नीच्या नात्यात तो आणखी महत्त्वाचा ठरतो कारण हे नातं आयुष्यभर जपावं लागतं. अनेक वेळा असे प्रसंग येतात जेव्हा पत्नीला आपल्या पतीवर संशय येतो. जसे की एखाद्या स्त्री मैत्रिणीशी किंवा सहकाऱ्याशी अनौपचारिकपणे बोलणे किंवा मैत्रिणींशी विनोद करणे इ. यासाठी अनेक स्त्रिया आपल्या पतीचा फोन तपासतात किंवा त्याला फॉलो करायला मागेपुढे पाहत नाहीत. जेव्हा नवरा प्रेमप्रकरणात नसतो आणि तरीही तुम्हाला संशय येतो, तेव्हा कुठेतरी तुम्ही पतीच्या विश्वासाचा अपमान करत आहात. संशय घेण्याची ही सवय लवकरात लवकर सोडली पाहिजे.

2. सतत कशाची तरी मागणी करणे

लग्नानंतर पतीने आपल्या पत्नीला राणी प्रमाणे ठेवावे अशी प्रत्त्येक बायकोची इच्छा असते, नवऱ्याने आपला हट्ट पुरवावा असे प्रत्त्येकच बायकोला वाटते परंतु जर तिने त्याच्याकडून जास्त मागणी केली तर ते नाते बिघडू शकते. यामुळे जोडप्यांमधील तणाव वाढणे निश्चित आहे. नवऱ्याची आर्थिक मर्यादा काय आहे आणि भविष्यातील जबाबदारीसाठी तो किती बचत करतोय हे तुम्ही ओळखलेच असेल. त्यानुसारच ते खर्च करू शकतील.

3. पतीची कोणाशी तरी तुलना करणे

अनेकदा असे दिसून आले आहे की काही बायका आपल्या पतीची तुलना त्यांच्या नातेवाईकांशी किंवा बाहेरच्या व्यक्तीशी करतात. पतीला ही सवय कधीच आवडत नाही आणि त्यामुळे त्यांच्याच नात्यात दुरावा निर्माण होतो. पत्नीच्या या कृतीमुळे पतीचा अहंकार दुखावला जाऊ शकतो, कारण पुरुषांना आवडत नाही की त्याची पत्नी त्याची तुलना दुसऱ्या व्यक्तीशी करते. पत्नींनी हे लक्षात ठेवले पाहिजे की प्रत्येक व्यक्ती स्वतःमध्ये वेगळी असते, समोरची व्यक्ती कितीही चांगली असली तरी ती तुमच्या पतीची जागा घेऊ शकत नाही.