AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tamarind Benefits: चिंच खाल्यामुळे आरोग्याला होतील ‘हे’ 5 फायदे… नक्की ट्राय करा

Benefits of Tamarind: भारतीय पदार्थांची चव वाढवणारी चिंच तुमच्या आरोग्यासाठी देखील खूप फायदेशीर असते. चिंचमध्ये अनेक पोषक तत्व आढळतात ज्यामुळे आपले शरीर मजबूत होण्यास मदत होते. चला मग जाणून घेऊया काय आहेत भरपूर प्रमाणात चिंच खाण्याचे फायदे.

Tamarind Benefits: चिंच खाल्यामुळे आरोग्याला होतील 'हे' 5 फायदे... नक्की ट्राय करा
| Edited By: | Updated on: Jan 30, 2025 | 3:45 PM
Share

अनेक भारतीय पदार्थांमध्ये चिंच वापरली जाते. कोणत्याही पदार्थामध्ये चिंच मिसळल्यामुळे त्या पदार्थाची चव वाढते. चिंच कोणत्याही पदार्थामध्ये गोड आणि आंबट चव देते. परंतु तुम्हाला माहिती आहे का? चिंच तुमच्या आरोग्यासाठी देखील अत्यंत फायदेशीर ठरू शकतो. चिंचमध्ये भरपूर प्रमाणात हे. व्हिटॅमिन ए, सी, ई, के, बी6, मॅग्नेशियम, फॉस्फरस, कॅल्शियम आणि प्रथिने यांसारखे अनेक आवश्यक पोषक घटक आढळतात ज्यामुळे तुमचं आरोग्य निरोगी राहाण्यास मदत होते.

चिंचमध्ये अनेक पोषक घटक असतात जे तुमच्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असते. चिंच खाल्ल्यामुळे तुमच्या शरीरातील आरोग्य निरोगी राहाण्यास मदत होते. चिंच योग्य प्रमाणात खाल्ल्यामुळे तुमची पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. चिंच तुमच्या त्वचेच्या आरोग्यासाठी देखील फायदेशार ठरते. चला तर जाणून घेऊया चिंच खाल्ल्यामुळे तुमच्या आरोग्याला नेमकं काय फायदे होतात.

चिंचेमध्ये असलेले टार्टेरिक ऍसिड तुमची पचनक्रिया सुधारण्यास मदत करते. ज्यामुले अन्न पचायला सोपे जाते आणि बद्धकोष्ठता, ॲसिडिटी यासारख्या समस्यांपासून आराम मिळतो. याशिवाय चिंचेमध्ये असलेले फायबर पचनसंस्था निरोगी ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. चिंचेमध्ये पोटॅशियमचे प्रमाण जास्त असते ज्यामुळे तुमच्या शरीरातील रक्तदाब नियंत्रित राहाण्यास मदत होते. याशिवाय चिंचेमधील असलेले अँटिऑक्सिडंट्स हृदयविकाराचा धोका कमी करतात . चिंचेमधील फ्लेव्होनॉइड्स खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतात ज्यामुळे हृदय निरोगी राहते. चिंचेमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते ज्यामुळे तुमच्या शरीरातील रोगप्रतिकारकशक्ती मजबूत होण्यास मदत होते. चिंच खाल्यास तुमच्या शरीराला संसर्गाशी लढण्यास मदत करते आणि रोगांपासून संरक्षण करते. चिंचेमध्ये जास्त प्रमाणात फायबर असते ज्यामुळे पोट जास्त काळ भरलेले राहते आणि भूक कमी होते. याशिवाय चिंचेमध्ये कॅलरी कमी असते ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते . चिंचेमध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी असतात ज्यामुळे तुमची त्वचा निरोगी आणि चमकदार होण्यास मदत होते. मुरुम, डाग आणि त्वचेच्या इतर समस्या दूर करण्यासाठी चिंच फायदेशीर ठरते.

चिंच खाण्यापूर्वी ‘या’ गोष्टी नेहमी लक्षात ठेवा :

चिंच जास्त प्रमाणात खाल्ल्याने दातांच्या इनॅमलला नुकसान होते. जर तुम्हाला ॲसिडिटीची समस्या असेल तर चिंचेचे सेवन मर्यादित प्रमाणात करा. गर्भवती महिलांनी डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच चिंचेचे सेवन करावे.

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?.