AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Lemon Water | केवळ स्वादच नाही तर, ‘या’ फायद्यांसाठी लिंबू पाणी पिणे आवश्यक!

लिंबूयुक्त पाणी प्यायल्याने शरीराची प्रतिकारशक्ती सुधारते, परंतु यात साखरेऐवजी गुळ वापरण्याची खबरदारी घेतली पाहिजे. अधिक साखर घालून सेवन केल्याने पोटात आम्लता निर्माण होते.

Lemon Water | केवळ स्वादच नाही तर, ‘या’ फायद्यांसाठी लिंबू पाणी पिणे आवश्यक!
लिंबू पाणी
| Updated on: Feb 17, 2021 | 1:06 PM
Share

मुंबई : अशी काही पेये आहेत, जे बहुतेक उन्हाळ्यात प्यायल्यास उन्हाळ्यातील समस्या दूर करण्यास मदत होते. उदाहरणार्थ, उन्हाळ्याच्या काळात, आम्लपित्त, मळमळ किंवा अपचन यासारख्या समस्या उद्भवतात, अशा परिस्थितीत ही लिंबू पाणी प्रभावी मानले जाते. लिंबू पाणी हे असेच एक पेय आहे, जे उन्हाळ्यात तोंडाची चव वाढवण्यासाठी वापरले जाते, परंतु आपणास माहित आहे का की चवी व्यतिरिक्त, लिंबू पाणी शरीरासाठी अनेक प्रकारे फायदेशीर आहे. चला, जाणून घ्या याचे फायदे (Health Benefits of lemon water) :

लिंबू पाणी पिण्याचे फायदे –

– लिंबूयुक्त पाणी प्यायल्याने शरीराची प्रतिकारशक्ती सुधारते, परंतु यात साखरेऐवजी गुळ वापरण्याची खबरदारी घेतली पाहिजे. अधिक साखर घालून सेवन केल्याने पोटात आम्लता निर्माण होते.

– उन्हाळ्यात घामामुळे शरीराचे अनेक घटक बाहेर पडतात. आवश्यक इलेक्ट्रोलाइट्स देखील शरीराबाहेर पडतात. दररोज एका ग्लास लिंबू पाणी प्यायल्याने या घटकांची मात्रा शरीरात टिकून राहते.

– व्हिटामिन सी समृद्ध लिंबू पाणी त्वचा सुधारते. आठवड्यातून एकदा याचे सेवन केल्याने त्वचेच्या समस्या देखील दूर होतात.

– त्यामध्ये उपस्थित पोटॅशियम उच्च रक्तदाब नियंत्रित करू शकते. जेव्हा जेव्हा उच्च रक्तदाबाची समस्या जाणवते, तेव्हा एक ग्लास लिंबू पाणी प्यायले पाहिजे.

– याच्या सेवनामुळे नैराश्य आणि तणाव कमी होतो. बर्‍याच संशोधनात असे निष्कर्ष समोर आले आहेत की, शरीर हायड्रेटेड राहिल्यास तणावापासून दूर राहण्यात मदत होते. त्याचबरोबर, शिकंजीमध्ये लिंबाचा वापर केला जातो, जो तुम्हाला ताजेतवाने ठेवण्यात प्रभावी आहे.

– हे पिण्यामुळे तोंडातून येणारी दुर्गंधीही दूर होते. दिवसातून दोन ते तीन वेळा लिंबू पाणी प्यायल्याने दात आणि हिरड्यांच्या समस्येवर आराम मिळतो.

– लिंबू सरबत प्यायल्यानेही पचन क्रिया चांगली आहे. त्यात लिंबू आणि मीठ हे घटक असतात, यामुळे पोटात उष्णता निर्माण होत नाही (Health Benefits of lemon water).

‘हे’ ही लक्षात ठेवा!

लिंबाच्या पाण्याचे नियमित सेवन केल्याने छातीत जळजळ होण्यास त्रास होऊ शकतो आणि एखाद्या व्यक्तीस आधीपासूनच हा आजार असेल, तर त्यांनी लिंबाच्या पाण्यापासून दूर रहावे. हार्टबर्नला ‘अ‍ॅसिड रिफ्लक्स’ असेही म्हणतात, ज्यात पोटात तयार होणारे अ‍ॅसिड अन्न पचवण्यासाठी अन्ननलिकेकडे परत येते, ज्यामुळे छातीत दुखणे आणि जळजळ जाणवते. असे झाल्यास लिंबासह सर्व आम्ल पदार्थांचे कमीतकमी सेवन केले पाहिजे.

जरी लिंबूपाणी पिण्याचे आरोग्यासाठी अनेक प्रकारचे फायदे आहेत, परंतु आपल्याला तोंडात अल्सरची समस्या असल्यास, लिंबू पाणी अजिबात पिऊ नये. यामुळे तोंडातील फोड बरे होण्यापेक्षा अधिक गंभीर बनू शकतात. याशिवाय दररोज सकाळी रिकाम्या पोटावर जास्त प्रमाणात लिंबूपाण्याचे सेवन केल्यास तोंडात फोड व गॅस्ट्रोओफेझियल रिफ्लक्स डिसीज या सारखे आजारही उद्भवू शकतात.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

(Health Benefits of lemon water)

हेही वाचा :

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.