AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Health : अरेरे किती तो कॉन्फिडन्स! मसल्ससाठी उचललं 23 वर्षाच्या तरुणानं 220 किलोचं वजन, पुढे काय झालं वाचा….

त्याच्या छातीतचे स्नायू त्याच्या हाडातून फाटले आहेत. त्यानंतर छातीत पू भरलेला भाग तयार झाला होता. त्याने अनुभवलेली ही सर्वात वाईट वेदना होती. स्नायू फाटल्याबरोबर रायन वेदनेनं खाली पडला. तो अजूनही रिकव्हर होतोय.

Health : अरेरे किती तो कॉन्फिडन्स! मसल्ससाठी उचललं 23 वर्षाच्या तरुणानं 220 किलोचं वजन, पुढे काय झालं वाचा....
रायन क्रॉलीचा तो वाईट प्रसंगImage Credit source: social
| Updated on: Jul 17, 2022 | 2:38 PM
Share

नवी दिल्ली : जीममध्ये (Gym) व्यायाम करताना ट्रेनर आवर्जुन सांगतो की, क्षमतेपेक्षा जास्त वजन उचलू नका, शक्य होईल तितकच वजन उचला.  जगात असे अनेक बॉडीबिल्डर्स (Bodybuilder) आहेत जे खूप वजन उचलतात. ते लोक रात्रंदिवस मेहनत करतात आणि ताकद वाढवल्यावरच एवढं जड वजन उचलतात. ताकदीशिवाय जड वजन उचलले तर गंभीर दुखापतही होऊ शकते. 2021मध्ये ब्रिटिश बॉडीबिल्डरचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्या व्हिडीओमध्ये बारबेलमध्ये प्लेट्स टाकून 220 किलो वजनाचा बेंच प्रेस व्यायाम करत होता. व्यायाम करत असताना त्याचे संतुलन बिघडले आणि उजव्या छातीच्या हाडाने छातीचे स्नायू फाटले. त्या व्हिडीओने (Video) सगळ्यांनाच धक्का बसला. काही काळापूर्वी या बॉडीबिल्डरने त्याच्या रिकव्हरी प्रक्रियेबद्दल सांगितले होते आणि तीस किलो वजनाच्या व्यायाम करतानाचा व्हिडीओही शेअर केला होता. कोण आहे हा बॉडीबिल्डर, ज्याला ही इतकी मोठी दुखापत कशी झाली आणि नेमकं काय झालं होतं, त्यानं नेमकं काय केलं होतं, हे जाणून घेऊया…

कोण आहे बॉडीबिल्डर?

या ब्रिटिश बॉडीबिल्डरचे नाव रायन क्रॉली असून त्याचा जन्म हॅम्पशायरमध्ये झालाय. वयाच्या सोळाव्या वर्षांपासून तो बॉडीबिल्डिंग करत आहे. मार्च 2021मध्ये तो जिममध्ये 220 किलो बेंच प्रेस करत होता. त्याचवेळी त्याच्यासोबत एक धक्कादायक घटना घडली. जगभरात लाखो लोकांनी तो व्हिडीओ पाहिला आणि शेअर केला. व्हिडीओमध्ये दिसले की रायन छातीच्या व्यायामासाठी 220 किलो वजन उचलत आहे आणि तो बारबेल खाली आणताच छातीचा स्नायू बाहेर येतो आणि त्या भागात रक्त जमा होते. त्याच्या छातीचे हाड त्याचे स्नायू फाटले होते.

रायन क्रॉलीची इन्स्टा पोस्ट

सर्वात वाईट वेदना

बॉडीबिल्डर रायनने एका मुलाखतीदरम्यान सांगितलं की, त्याच्या छातीतचे स्नायू त्याच्या हाडातून फाटले आहेत. त्यानंतर छातीत पू भरलेला भाग तयार झाला होता. त्याने अनुभवलेली ही सर्वात वाईट वेदना होती. स्नायू फाटल्याबरोबर रायन वेदनेनं खाली पडला. रायनने जनरेशन आयर्न फिटनेस अँड बॉडीबिल्डिंग नेटवर्कला सांगतिले की तो अजूनही रिकव्हर होतोय. अलीकडेच त्याने तीस किलोपासून डंबेल प्रेस आणि बारबेल प्रेस करतानाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. म्हणजेच तो अजून वजन उचलण्यात असमर्थ आहे.

छातीची दुखापत वाढली

जास्त वजन उचलण्याची भीती

रायनने एका मुलाखतीदरम्यान सांगितलं की, मी थोडे वजन उचलले की मला भीती वाटते. मी मानसशास्त्रज्ञांच्या संपर्कात येण्यापूर्वी माझे शरीर पुन्हा परत करा. मला भीती वाटते. तो अपघात मी अजूनही विसरु शकलो नाही. एवढी गंभीर दुखापत होऊनही मी लगेच दवाखान्यात गेलो नाही. पण नंतर जेव्हा वेदना कमी झाल्या नाहीत तेव्हा पंचवीस तासानंतर दवाखान्यात गेलो.

आता छोट्या वजनाचीही भीती वाटते

सर्जनने छातीची शस्त्रक्रिया केली. आता दुखापत होऊन जवळपास सोळा महिने झाले आहेत. त्यामुळे मी बरे होण्याच्या प्रक्रियेत आहे, असं रायन सांगतो.

जास्त वजन टाळतोय

पुन्हा सुरुवात…

रायनच्या इंस्टाग्राम पोस्टनुसार तो वजन उचलण्याचं टाळतोय. तो अगदी साधा व्यायाम करतोय. ज्यामध्ये पुशअप्स, पुलअप्स अशा व्यायामाच्या प्रकारांचा समावेश आहे. त्यामुळे व्यायाम करताना शक्य होईल तितकंच वजन उचला.

मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...