Summer Eye Care | अतिउष्णतेमुळे डोळे कोरडे, उन्हाळ्यात डोळ्यांची काळजी कशी घ्याल?

तापमान अति वाढले तर विविध प्रकारचे आजार होऊ शकतात आणि त्यामुळे डोळ्यांची अधिक काळजी घेणे गरजेचे ठरते (Summer Eye Care Tips)

Summer Eye Care | अतिउष्णतेमुळे डोळे कोरडे, उन्हाळ्यात डोळ्यांची काळजी कशी घ्याल?
रात्री उशिरापर्यंत स्क्रीन पाहण्याचा परिणाम केवळ डोळ्यांवरच नाही तर त्वचेवरही होतो. त्वचा तज्ज्ञ डॉक्टर सांगतात की हाय एनर्जीवाली एलईडी ब्लू लाइट आपल्या डोळे आणि त्वचेचे नुकसान करते. मग ते एलईडी लाइट बल्ब, कॉम्प्युटर स्क्रीन किंवा फोन असो. झोपेच्या एक तास आधी या सर्व गोष्टींपासून अंतर ठेवल्यास झोप लवकर आणि चांगली येते.
Follow us
| Updated on: May 12, 2021 | 12:10 PM

मुंबई : उन्हाळा सुरु झाला असून सूर्य सर्वत्र आग ओकत आहे. उष्णतेने अंगाची लाहीलाही होत असल्यामुळे अनेक जणांना एसीमध्ये राहण्याचा, आईस्क्रिम खाण्याचा मोह होतो. फळांचा रस पिणे, हलके कपडे घालणे, घरातच थांबणे यासारखे उपाय सर्वच करतात. मात्र डोळे या अतिशय महत्त्वाच्या अवयवाकडे अनेकदा दुर्लक्ष होते. त्वचेची काळजी घेण्यासाठीची कटाक्षाने पथ्य पाळली जातात. उष्ण हवामानाला अनुसरुन आहार घेण्याकडे लक्ष देतात, परंतु उन्हाळ्यामध्ये डोळ्यांचे रक्षण करण्याच्या महत्त्वाच्या मुद्द्याकडे आपण दुर्लक्ष करतो. (Summer Eye Care Tips)

तापमान अति वाढले तर विविध प्रकारचे आजार होऊ शकतात आणि त्यामुळे डोळ्यांची अधिक काळजी घेणे गरजेचे ठरते, असे ऑफ्थॅल्मॉलॉजिस्ट म्हणतात. कॉन्जंक्टिव्हायटिसमुळे डोळ्यांचा संसर्ग अंदाजे 30% वाढत असल्याचे निरीक्षण आहे.

उन्हाळ्यात पुढील काही समस्याही सर्रास आढळतात:

– सूर्यप्रकाशाशी थेट संपर्क येणे : सूर्यप्रकाशामध्ये अतिनिल किरणांचा समावेश असल्याने मोतिबिंदू होण्याचा धोका अधिक असतो, रेटिनाचे नुकसान होण्याची म्हणजे सोलार रेटिनोपॅथीची शक्यताही वाढते.

– सूर्यप्रकाशातील अतिनिल किरणांशी थेट संपर्क आला तर पेरिजिअम म्हणजे कॉर्नियाची अतिरिक्त वाढ करणारा आजार होऊ शकतो.

– उन्हाळ्यामध्ये अनेकांना डोळे कोरडे पडण्याचा त्रास होतो.

– उन्हाळ्याच्या दरम्यान, सूर्यप्रकाशाशी आणि अतिरिक्त उष्णतेशी संपर्क आल्याने डोळ्यांमध्ये कोरडेपणा येतो. त्यामुळे डोळ्यांतील टिअर फिल्मचे प्रमाण कमी होते.

– अॅलर्जिक कॉन्जंक्टिव्हायटिस व व्हायरल कॉन्जंक्टिव्हायटिस यामध्ये अचानक वाढ होत असल्याचेही आमच्या मेडिकल सेंटरमध्ये आढळले आहे.

डोळ्यांचे संरक्षण करण्यासाठी टिप्स :

– डोळ्यांना होणारे कोणतेही नुकसान रोखण्यासाठी यूव्ही प्रोटेक्शन सनग्लासेस उपयुक्त ठरतात, तसेच त्यामुळे सूर्यप्रकाशाशी येणारा संपर्कही कमी होतो.

– उन्हाळ्यामध्ये डोळ्यांमध्ये कोरडेपणा येण्याचे प्रकार सर्रास घडतात. पुरेसे पाणी पिणे, परिपूर्ण आहार घेणे आणि पाणीदार फळे खाणे यामुळे डोळ्यांतील कोरडेपणा रोखण्यासाठी मदत होत असल्याने याद्वारे उन्हाळ्यामध्ये हायड्रेटेड राहावे.

– डोळ्यांचा नैसर्गिक ओलावा कायम राखण्यासाठी कृत्रिम अश्रू, ल्युब्रिकंट किंवा आय ड्रॉपसारख्या पर्यायी घटकांची मदत होते. उन्हाळ्यामध्ये त्यांचा वापर केला तर डोळ्यांचा कोरडेपणा रोखण्याबरोबरच कोणत्याही प्रकारचा संसर्ग रोखण्यासाठी ओलावा जतन करून ठेवणे शक्य होते.

– व्हिटॅमिन ए भरपूर प्रमाणात असलेल्या पदार्थांचे सेवन करा, जसे हिरव्या पालेभाज्या, गाजर, काकडी, पपई, इ

डोळे या आपल्या अत्यंत महत्त्वाच्या अवयवाची योग्य काळजी घेणयासाठी संतुलित आहार घेणे, पुरेसे पाणी पिणे आणि वर नमूद केलेल्या टिप्स अमलात आणणे गरजेचे आहे.

लेखक : डॉ. वामशिधर, फॅको रेफ्रॅक्टिव्ह सर्जन मॅक्सिव्हिजन आय हॉस्पिटल

संबंधित बातम्या :

डोळ्यांखाली वारंवार सूज येतेय? मग, ‘हे’ उपाय नक्की करून पाहा!

(Summer Eye Care Tips)

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.