AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ऑफीसमध्ये वारंवार लागते भूक ? ड्रॉवरमध्ये ठेऊ शकता ‘हे’ हेल्दी पदार्थ

ऑफीसमध्ये अचानक लागणाऱ्या भुकेमुळे अनेकदा जंक फूड खाल्लं जातं. हे टाळण्यासाठी, तुमच्या ड्रॉवरमध्ये काही हेल्दी स्नॅक्स ठेवा. भाजलेले चणे, मखाणे, नट्स किंवा खाकरा असे पौष्टिक पर्याय जवळ ठेवल्यास अनहेल्दी खाणे टाळता शकतं.

ऑफीसमध्ये वारंवार लागते भूक ? ड्रॉवरमध्ये ठेऊ शकता 'हे' हेल्दी पदार्थ
Image Credit source: Jordan Lye/Moment/Getty Images
| Updated on: Oct 05, 2026 | 9:50 PM
Share

ऑफीसमध्ये काम करता-करता अचानक भूक लागणं खूप कॉमन आहे. अशा परिस्थितीत जर तुम्ही डबा वगैरे आणला नसेल, काही खायला नसेल तर बऱ्याच वेळेस जवळच्या दुकानातून चिप्स, बिस्कीटस नमकीन किंवा काही जंक फूड आणलं जातं. बऱ्याच वेळा भूक लागल्यावर काही चटपटीत खायची इच्छा होते आणि आपण विचार न करता काहीही खातो. पण जर तुमच्या ऑफीस ड्रॉवरमध्ये पहिल्यापासूनच काहीतरी खायला ठेवलं असेल तर, भूक लागल्यावर ते खातू येऊ शकतं, जेणेकरून बाहेरचं, जंक किंवा अनहेल्दी पदार्थ खाण्याची गरजच पडणार नाही. किंवा त्याचं प्रमाणा कमी करता येऊ शकतं. आणि विशेष म्हणजे, भुकेच्या वेळेस खायला ठेवायचे पदार्ख खूप महाग असतात असंही नाही. काही साधे-सोपे, पटकन तोंडात टाकता येतील असे पदार्थ तुम्ही ड्रॉवर मध्ये सहज ठेवू शकता.

1. भाजलेले चणे

ऑफीसच्या ड्रॉवरमध्ये भाजलेले चणे ठेवणं हा एक चांगला पर्याय आहे. ते ठेवण्यासाठी फ्रीज वगैरेचीही गरज पडत नाही. एखाद्या डब्यात, झिप लॉकच्या पिशवीत ते बराच काळ, नीट साठवून ठेवता येऊ शकतात. जेव्हा मधल्या वेळेस किंवा संध्याकाळी थोडी भूक लागते तेव्हा भाजलेले चणे खाऊ शकता. तुम्हाला साधे चणे आवडत नसतील तर त्यावर थोडं सैंधव मीछ किंवा चाट मसाला टाकू खाऊ शकता.

2. मखाणे

मखाणे हलकं स्नॅक असून ते ऑफीसमध्ये ठेवणंही सोपं आहे. घरातून भाजून आणलेले मखाणे, एका छोट्या डब्यात भरून ठेवू शकता. ते खाल्ल्यावर, काही चटपटीत, कुरकुरीत खाण्याची इच्छा कमी होऊ शकते. मात्र त्याच खूप मीठ किंव मसाला नसेल, याची काळजी घ्या.

3. नट्स

बदाम, अक्रोड आणि काजू यासारखे नट्स किंवा सुका-मेवा सुध्या ऑफीसच्या ड्रॉवरमध्ये सहज ठेवू शकता. विशेष म्हणजे, हे अगदी थोड्या प्रमाणात खाल्लं तरी पोट बराच काळ भरल्याची जाणीव होते. मात्र ते खाताना प्रमाण कमी ठेवा, कारण त्यामध्ये कॅलरीच जास्त असतात.

4. भाजलेल्या बिया

भोपळ्याच्या बिया, सूर्यफूल, टरबुजाच्या बिया, या हलक्या परतून भुकेच्या वेळी खाणं चांगला ऑप्शन ठरू शकतो. या सगळ्या भाजून, एकत्र करून छोट्या डब्यात ठेवायचं आणि थोड्या -थोड्या प्रमाणात भुकेच्या वेळेस खायच्या.

5. खाकरा

पातळ पण कुरकुरीत असा खाखरा हाँ संध्याकाळच्या भुकेसाठी उत्तम पर्याय ठरू शकतो. त्यावेळी जे खाण्याचं क्रेव्हिंग होतं, ते शांत करण्याचा चांगला ऑप्शन म्हणजे खाकरा. तो छोट्या पॅकेटमध्येही तुकडे करून ठेवू शकता, म्हणजे जास्त खाल्ला जाणार नाही.

6. ग्रॅनोला बार

घरच्या घरी बनवलेला ग्रॅनोला बार ऑफिसमध्ये ठेवण्यासाठी चांगला पर्याय आहे. यात ओट्स, नट्स आणि सीड्स यासारख्या गोष्टी टाकू शकता. अचानक भूक लागल्यास , चॉकलेट किंवा गोड बिस्किट यांना पर्याय म्हणून हाँ खाता येऊ शकतो.

7. पॉपकॉर्न

पॉपकॉर्न म्हणजे फक्त पिक्चर पाहतानाच खाल्लं पाहिजे असं नाही. घरच्या घरी कमी तेल, लोणी आणि साखर वापरून बनवलेले पॉपकॉर्न, हाही ऑफिससाठी फायदेशीर पर्याय ठरू शकतो. हे एअरटाइट डब्यात भरून ठेवा आणि संध्याकाळी हलके काही खायची इच्छा झाल्यावर थोड्या प्रमाणात खा.

स्नॅक्स ड्रॉवरमध्ये कसे ठेवाल ?

ऑफिसच्या ड्रॉअरमध्ये स्नॅक्स ठेवताना ते लहान-लहान डब्यात किंवा पॅकेटमध्ये ठेवा. यामुळे एकाच वेळी पूर्ण पॅकेट खाण्याची सवय कमी होईल. तसेच, ड्रॉअरमध्ये असे स्नॅक्स ठेवा जे तुम्हाला खायला आवडता. चिप्स किंवा गोड बिस्कीटं, आणून, ती साठवून ठेवणं टाळा. जेव्हा हेल्दी ऑप्शन्स तुमच्या समोरच असतील, तेव्हा जंक फूडपासून दूर राहणे थोडे सोपे होईल.

Follow Us
कल्याणमध्ये भरधाव कारचा थरार; संतप्त नागरिकांनी केली तोडफोड
Kalyan : कल्याणच्या सहजानंद चौकात भरधाव कारचा थरार; संतप्त नागरिकांनी केली तोडफोड, नेमकं काय घडलं?
पूर्णेकर प्रकरणात मोठा खुलासा; पप्या शिंदे-संतोष कनोजियाने रचला कट
Pradeep Purnekar : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठा खुलासा; पप्या शिंदे-संतोष कनोजियाने रचला कट, नेमकं काय घडलं?
आमदार फुटले, पक्ष फुटला, पण पेपर फुटला तेव्हा...; पेपरफुटीवरून....
Raj Thackeray : आमदार फुटले, पक्ष फुटला, पण पेपर फुटला तेव्हा...; पेपरफुटीवरून राज ठाकरेंचा सरकारवर घणाघात
आम्ही मेलेल्या आईचं दूध प्यायलो नाही; राज ठाकरेंसमोर विवेकानंद पाटील..
Vivekanad Patil : आम्ही मेलेल्या आईचं दूध प्यायलो नाही; राज ठाकरेंसमोर विवेकानंद पाटील आक्रमक, MPSC अध्यक्षांना थेट इशारा
मंगेश चिवटेंच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब; शिवसेनेकडून उद्या....
Mangesh Chivte : मंगेश चिवटेंच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब; शिवसेनेकडून उद्या अर्ज भरणार, पण पुणे शिक्षक मतदारसंघासाठी महायुतीत पेच कायम?
मुंबईत पाणीकपात अन् रस्ते धुण्यासाठी 8 कोटी 25 लाख; पालिकेच्या....
Mumbai : मुंबईत पाणीकपात अन् रस्ते धुण्यासाठी 8 कोटी 25 लाख; पालिकेच्या प्रस्तावावर संतापाचा सूर, पडद्यामागे काय घडतंय?
फॉर्म सिक्समध्ये बेकायदेशीर बदल सिद्ध; गांधींचा ज्ञानेश कुमारांवर....
Rahul Gandhi : फॉर्म सिक्समध्ये बेकायदेशीर बदल सिद्ध; राहुल गांधींचा ज्ञानेश कुमारांवर गंभीर आरोप, म्हणाले...
हनी सिंहच्या अडचणी वाढल्या?; महाराष्ट्र सायबरकडून समन्स, मात्र चौकशीला
honey singh : हनी सिंहच्या अडचणी वाढल्या?; महाराष्ट्र सायबरकडून समन्स, मात्र चौकशीला गैरहजर
आम्ही 2022 ला काहीतरी केलं....; शिरसाटांच्या विधानाने चर्चांना उधाण
Sanjay Shirsat : आम्ही 2022 ला काहीतरी केलं....; संजय शिरसाटांच्या त्या विधानाने राजकीय चर्चांना उधाण
MPSCच्या आजी-माजी अध्यक्षांवर कारवाईचा मार्ग मोकळा?...
MPSCच्या आजी-माजी अध्यक्षांवर कारवाईचा मार्ग मोकळा?; फडणवीसांची राज्यपालांकडे मोठी शिफारस, काय आहे मागणी?