AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Skin Care : तिशीनंतरही तरूण दिसायचंय? ‘या’ ड्रिंकचे सेवन तुमच्यासाठी ठरेल फायदेशीर…

Healthy Skin Tips: वाढत्या वयासोबत शरीरामध्ये अनेक बदल पाहायला मिळतात. चेहऱ्यावर सुरकुत्या आणि पिंपल्स सारख्या समस्या दिसून येतात. अशा परिस्थितीमध्ये त्वचेची योग्य काळजी घेणे महत्त्वाचे असते. तुम्ही योग्य आहार आणि व्यायाम केल्यास तुमची त्वचा तरूण राहाण्यास मदत होते. चला तर जाणून घेण्यासाठी निरोगी आरोग्यासाठी आणि त्वचेच्या आरोग्यासाठी काय करावे?

Skin Care : तिशीनंतरही तरूण दिसायचंय? 'या' ड्रिंकचे सेवन तुमच्यासाठी ठरेल फायदेशीर...
Nariyal Pani
| Edited By: | Updated on: Feb 22, 2025 | 7:48 PM
Share

निरोगी आरोग्यासाठी तुमच्या आहारामध्ये संतुलित आहाराचा समावेश करणे गरजेचे आहे. बदलत्या जीवनशैलीमुळे आणि चुकीच्या खाण्या पिण्याच्या सवयींमुळे तुम्हाला कमी वयामध्ये अनेक आजार होऊ शकतात. त्यामुळे तुमच्या आहारामध्ये पौष्टीक पदार्थांचा समावेश करणे गरजेचे आहे. तुमच्या आहारात नारळ पाण्याचा समावेश केल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतील. नारळ पाणी प्यायल्यामुळे तुम्ही रोगांपासून दूर राहाता आणि तुमच्या शरीराला ताकद मिळण्यास मदत होते. नारळ पाण्यामध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स, मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि पोटॅशियम असते ज्यामुळे तुम्ही नेहमी निरोगी राहाता.

नारळ पाणी प्यायल्यामुळे गरमीमध्ये तुमचं शरीर हायड्रेटेड राहाते. गरमीमध्ये तुमच्या शरीरातील पाणी घामाच्या स्वरूपात बाहेर पडते ज्यामुळे तुम्हाला डिहायड्रेशन होऊ शकते आणि चक्कर सारख्या समस्या उद्भवतात. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही जर नारळ पाणी प्यायलात तर तुमच्या आरोग्याला अनेक फायदे होतात. नारळ पाणीचे सेवन केल्यामुळे तुमच्या शरीरातील साखर संतुलिक राहाते त्यासोबतच किडनी स्टोन सारख्या समस्या होत नाहीत. नारळ पाणी सकाळी प्यायल्यामुळे तुमच्या शरीराला उर्जा मिळते. नारळ पाण्यामधील अँटीऑक्सिडंट्स शरीरात असलेल्या हानिकारक मुक्त रॅडिकल्सशी लढण्यास मदत करतात.

अभ्यासानुसार, नारळाचे पाणी प्यायल्यामुळे तुमच्या हृदयाचे आरोग्य निरोगी राहाते आणि हृदयविकाराचा धोका टळतो. नारळ पाण्याचे आठवड्यातून 2-3 वेळा सेवन केल्यामुळे तुमच्या शरीरातील खराब चरबी बाहेर पडण्यास मदत होते त्यासोबतच तुमचं शरीर डिटॉक्सिफाय होण्यास मदत होते. नारळ पाण्यामुळे कोलेस्टेरॉल आणि ट्रायग्लिसराइडच्या पातळीत घट होतो ज्यामुळे हृदय निरोगी राहाते. नारळ पाण्यामुळे तुमची त्वचा देखील चमकदार होते. नारळ पाण्यामुळे त्वचेला वेगळीच चमक आणि हायड्रेशन मिळते तसेच त्यामधील जिवनसत्त्वे आणि खनिडे तुमची त्वचा घट्ट करतात. तुम्हाला जर पिंपल्स मुरूम आणि चेहऱ्यावर काळ्या डागांच्या समस्या असल्यास तुम्ही नियमित नारळाच्या पाण्याचे सेवन करा. 30 नंतर तुमच्या त्वचेवर अनेक बदल दिसून येतात. सुरकुत्या आणि कोरड्या त्वचेसाठी नारळ पाण्याचे सेवन फायदेशीर ठरते. नारळाच्या पाण्याचे सेवन केल्यामुळे तुम्ही दीर्घकाळ तरूण दिसता आणि चेहऱ्यावर नैसर्गिक चमक कायम राहाते. नारळ पाणी पिल्याने पचनसंस्था देखील निरोगी राहते आणि शरीरातील चयापचय वाढण्यास मदत होते.

नारळ पाणी प्यायल्यामुळे द्धकोष्ठतेची समस्या दूर होते त्यासोबतच कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होण्यास मदत होते. जर तुम्ही वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर नारळ पाण्याचे सेवन तुमच्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरेल. नारळ पाणीमध्ये कमी प्रमामात कॅलरीज असतात ज्यामुळे वजन कमी करण्यास मदत होते. नारळ पाणी प्यायल्यामुळे तुमच्या शरीरातील रोगप्रतिराकशक्ती वाढण्यास मदत होते. तसेच त्यामधील अँटी-इंफ़्लेमेटरी गुणधर्म संसर्गाचे आजारांपासून वाचवण्यास मदत करतात.

डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.