AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हॉटेल रूममध्ये छुपा कॅमेरा शोधण्यासाठी ‘ही’ ट्रिक वापरा

हॉटेलमधील छुपा कॅमेरा शोधण्यासाठी काही ट्रिक्स तुम्हाला माहिती हव्यात. त्यापैकी एक म्हणजे कॅमेरे इन्फ्रारेड प्रकाश उत्सर्जित करतात. हा प्रकाश डोळ्यांना दिसत नाही. हे जाणून घेण्यासाठी तुम्ही स्मार्टफोनचा बॅक कॅमेरा वापरू शकता. तसेच अँड्रॉईड आणि आयओएस डिव्हाईसमध्ये युजर्सला असे अनेक अ‍ॅप्स मिळतात, जे छुपा कॅमेरा सहज शोधू शकतात.

हॉटेल रूममध्ये छुपा कॅमेरा शोधण्यासाठी ‘ही’ ट्रिक वापरा
| Edited By: | Updated on: Feb 28, 2025 | 6:47 PM
Share

भारतात नवनवीन ठिकाणे शोधण्याची क्रेझ झपाट्याने वाढत आहे. आता फूड ब्लॉगर्स, बाईकर्स आणि कुटुंबीय दर एक-दोन महिन्यांनी सुट्ट्यांचे प्लॅनिंग करून नवीन ठिकाणे शोधतात. हे सर्व जण आपल्या प्रवासादरम्यान विश्रांती घेण्यासाठी आणि रात्र घालवण्यासाठी हॉटेल बुक करतात. अशा अनेक बातम्या तुम्ही अनेकदा वाचल्या आणि ऐकल्या असतील, ज्यात फला हॉटेलच्या खोलीत छुपा कॅमेरा सापडल्याचं सांगण्यात आलं आहे.

जर तुम्हीही नवीन जागा एक्सप्लोर करणार असाल आणि रात्र घालवण्यासाठी हॉटेल बुक करत असाल तर रात्री झोपण्यापूर्वी तुमच्या खोलीत छुपा कॅमेरा नाही ना, हे तपासून पाहावे. येथे आम्ही तुम्हाला स्मार्टफोनद्वारे हिंडन कॅमेरा तपासण्याच्या काही सोप्या ट्रिक्स सांगणार आहोत.

स्मार्टफोनच्या टॉर्चद्वारे जाणून घ्या सर्व कॅमेऱ्यांमध्ये लेन्स असते, त्यामुळे तो प्रकाश परावर्तित करतो. त्यामुळे रात्री हॉटेलरूमचा लाईट बंद करून मोबाइलची टॉर्च पेटवून कॅमेरा लपवण्याची शक्यता असलेल्या दिशेला कॉल करावा. या ठिकाणी कॅमेरा असता तर तुमच्या मोबाईलच्या टॉर्चचा प्रकाश परावर्तित होतो.

स्मार्टफोनच्या कॅमेऱ्याने जाणून घ्या सर्व कॅमेरे इन्फ्रारेड प्रकाश उत्सर्जित करतात. हा प्रकाश डोळ्यांना दिसत नाही. हे जाणून घेण्यासाठी तुम्ही स्मार्टफोनचा बॅक कॅमेरा वापरू शकता. अनेकदा बॅक कॅमेराही आयआर लाईट शोधत नाही. अशावेळी स्मार्टफोनच्या फ्रंट कॅमेऱ्याच्या मदतीने इन्फ्रारेड लाईट सहज ओळखता येते.

कॅमेरा-डिटेक्शन अ‍ॅप अँड्रॉईड आणि आयओएस डिव्हाइसमध्ये युजर्सला असे अनेक अ‍ॅप्स मिळतात, जे छुपे कॅमेरे सहज शोधू शकतात. गुगल प्ले स्टोअर आणि अ‍ॅप स्टोअरवरून तुम्ही हे अ‍ॅप्स डाऊनलोड करू शकता. हे अ‍ॅप्स इन्फ्रारेड लाईट, मॅग्नेटिक फिल्ड आणि असामान्य सिग्नलसाठी स्कॅनद्वारे छुपे कॅमेरे शोधतात.

लाईट बंद करा खोलीत गेल्यावर लाईट बंद करा आणि मग आजूबाजूला तपासून पाहा की लाल लाईट दिसतोय का? लाल लाईट असेल तर तो कॅमेराही असू शकतो.

कॅमेरा डिटेक्टर एक डिव्हाईस आहे जे आपल्याला लपलेले कॅमेरे शोधण्यात मदत करू शकते. कॅमेरा डिटेक्टर तुम्ही कोठूनही ऑनलाईन किंवा ऑफलाईन खरेदी करू शकता. ऑनलाईन कॅमेरा डिटेक्टर 3 हजार ते 8 हजारांपर्यंत उपलब्ध असतील.

सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा आपण हॉटेलच्या खोलीत असाल तेव्हा सावधगिरी बाळगा. एखाद्या गोष्टीवर संशय येत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करण्याऐवजी तो कॅमेरा आहे असे समजावे. ताबडतोब ती गोष्ट नीट तपासून पहा.

निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका.
BJP पदाधिकाऱ्याचं अजब कांड, मतदारांना पैशांचे आमिष दाखवलं अन् कोंडून..
BJP पदाधिकाऱ्याचं अजब कांड, मतदारांना पैशांचे आमिष दाखवलं अन् कोंडून...
मोदी ऑन बोर्ड E-Mail चा उल्लेख अन्...पृथ्वीराज चव्हाणांचा सनसनाटी दावा
मोदी ऑन बोर्ड E-Mail चा उल्लेख अन्...पृथ्वीराज चव्हाणांचा सनसनाटी दावा.
मराठी अन् मुस्लिम मतदारांच्या ध्रुवीकरणासाठी ठाकरे बंधूंची रणनिती ठरली
मराठी अन् मुस्लिम मतदारांच्या ध्रुवीकरणासाठी ठाकरे बंधूंची रणनिती ठरली.
मोदी आणि एपस्टीनचं काय नातं? एपस्टीन प्रकरणावरून चव्हाणांचा थेट सवाल
मोदी आणि एपस्टीनचं काय नातं? एपस्टीन प्रकरणावरून चव्हाणांचा थेट सवाल.
भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश
भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश.
बाबरच्या नावाने मशीद बांधली तर कारसेवक तिथे जातील अन्... राणांचा इशारा
बाबरच्या नावाने मशीद बांधली तर कारसेवक तिथे जातील अन्... राणांचा इशारा.
BMC निवडणुकीसाठी मनसे अ‍ॅक्टिव्ह...राज ठाकरेंच्या मनसेची मोर्चेबांधणी
BMC निवडणुकीसाठी मनसे अ‍ॅक्टिव्ह...राज ठाकरेंच्या मनसेची मोर्चेबांधणी.
ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची रणनीती, शिंदे सेना-BJP समान जागा लढणार
ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची रणनीती, शिंदे सेना-BJP समान जागा लढणार.
3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री
3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री.