गर्भावस्थेदरम्यान डोकेदुखीची समस्या उद्भवतेय? मग, ‘हे’ घरगुती उपाय ट्राय करा!

गर्भधारणेच्या पहिल्या आणि दुसऱ्या तिमाहीत बऱ्याच महिलांना डोकेदुखीची समस्या वारंवार येते. ज्यांना आधीच डोकेदुखीचा त्रास झाला आहे, त्यांच्या समस्या यावेळी आणखी वाढतात.

गर्भावस्थेदरम्यान डोकेदुखीची समस्या उद्भवतेय? मग, ‘हे’ घरगुती उपाय ट्राय करा!
गर्भावस्थेदरम्यान डोकेदुखीची समस्या
Follow us
| Updated on: Feb 11, 2021 | 7:00 PM

मुंबई : गर्भधारणेच्या पहिल्या आणि दुसऱ्या तिमाहीत बऱ्याच महिलांना डोकेदुखीची समस्या वारंवार येते. ज्यांना आधीच डोकेदुखीचा त्रास झाला आहे, त्यांच्या समस्या यावेळी आणखी वाढतात. या समस्या हार्मोनल बदलांमुळे आणि रक्त परिसंवादाच्या मार्गात बदल झाल्यामुळे उद्भवू शकतात. बर्‍याच वेळा कॅफिनचे सेवन पूर्णपणे थांबवणे, ताणतणाव, झोपेची कमतरता, बसण्याच्या चुकीच्या पद्धती, दृष्टी कमी होणे, जास्त सूर्यप्रकाश, पाण्याचा अभाव, उशिरा खाणे, सर्दी, पडसे आणि उच्च रक्तदाब यामुळे ही समस्या निर्माण होते. मात्र, अशावेळी औषध किंवा गोळ्या घेणे आरोग्यासाठी अतिशय हानिकारक ठरू शकते. म्हणून अशावेळी काहीतरी घरगुती उपचार करणे सोयीस्कर ठरते. चला तर, ही समस्या कशी टाळायची ते जाणून घेऊया…(Home remedies for headache during pregnancy)

असा करा उपाय :

– ताणमुळे डोकेदुखी झाल्यास, मानेच्या खाली असलेल्या भागावर थंड पट्टी ठेवा. सर्दीमुळे काही समस्या येत असल्यास, नीलगिरीच्या तेलाचे काही थेंब गरम पाण्यात टाकून वाफ घ्या. मग तोंड झाकून थोडा वेळ विश्रांती घ्या.

– मायग्रेनच्या वेदना कधीकधी काही लोकांना प्रचंड त्रास देतात. त्यापासून मुक्त होण्यासाठी काही मिनिटांसाठी डोक्यावर आणि डोळ्यांवर थंड पाण्याची पट्टी ठेवा. किंवा स्वच्छ कपड्यात बर्फाचे काही तुकडे ठेवा आणि डोक्याला शेक द्या.

– आल्याचा रस डोकेदुखीसाठी खूप फायदेशीर आहे. यासाठी एकतर आल्याचा एक छोटा तुकडा तोंडात ठेवा आणि हळूहळू त्याचा रस सेवन करा. जर आपण हे करू शकत नसाल, तर आल्याचा चहा किंवा आले पाण्यात उकळा आणि त्यात मध घाला, ते प्या. याने लवकर दिलासा मिळेल (Home remedies for headache during pregnancy).

– कधीकधी शरीरात व्हिटामिन सी पुरेशा प्रमाणात नसल्यामुळेही डोकेदुखी होते. गरोदरपणात बहुतेकदा महिलांमध्ये डोकेदुखी अधिक होते. या प्रकरणात, लिंबाचे सेवन उपयुक्त ठरू शकते. कोमट पाण्यात मध घालून किंवा लिंबूयुक्त चहा बनवून लिंबाचे सेवन करता येते. लिंबू अँटिऑक्सिडेंट म्हणून देखील काम करते.

– बर्‍याचदा गर्भधारणेदरम्यान स्त्रिया झोप घेण्यास असमर्थ असतात, ज्यामुळे थकवा आणि डोकेदुखीसारख्या समस्या उद्भवतात. जेव्हा जेव्हा आपल्याला थोडा वेळ मिळेल तेव्हा तेव्हा आराम करा. त्याचबरोबर कोणत्याही प्रकारचे ताण कमी करण्यासाठी योगा आणि ध्यान करण्याची सवय नियमितपणे अंगीकारा.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

(Home remedies for headache during pregnancy)

हेही वाचा :

Non Stop LIVE Update
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.