Tips and Tricks : शूजमधील दुर्गंधी घालावण्यासाठी वापरा ‘या’ ट्रिक्स
तुमच्या वापरात असलेल्या शूजची योग्य प्रकारे स्वच्छता घेतली गेली नाही तर त्याचा वास येण्याची समस्या त्रासदायक ठरते. आणि वेळेअभावी तुम्ही शूज धुवू शकत नसाल, तर त्यामधून येणारा वास दूर करण्यासाठी काही सोप्या टिप्स जाणून घेऊया

अनेकांना शूज घातल्यानंतर पायाला खूप घाम येत राहतो. पायाला येणाऱ्या घामामुळे बॅक्टेरिया तयार होतात त्यामुळे शूजमधून आणि पायांमधून दुर्गंधी येऊ लागते. दुर्गंधी येणारे शूज हे आपल्यासाठी आणि इतरांसाठीही डोके दु:खी ठरु शकतं. विशेषतः हिवाळ्यात आणि पावसाळ्यात सूर्यप्रकाशाअभावी आणि कमी तापमानामुळे धुतलेले शूज लवकर वाळणे अवघड होऊन बसते तेव्हा ही परिस्थिती अधिकच बिकट होते. अशा वेळी शूजच्या दुर्गंधीपासून मुक्त होण्यासाठी काही सोप्या पद्धती आहेत. येथे आम्ही तुम्हाला शूज न धुता त्यांचा दुर्गंध दूर करण्यासाठी काही सोप्या टिप्स सांगत आहोत. त्यांच्याबद्दल जाणून घेऊया
1. शूज उन्हात ठेवा
शूजमध्ये बऱ्याचदा ओलावा आणि घामामुळे बॅक्टेरिया तयार होतात, जे दुर्गंधीचे मुख्य कारण बनतात. शूज उन्हात ठेवल्याने त्यातील ओलावा सहज सुकून जातो आणि बॅक्टेरियाही नष्ट होतात. त्यामुळे दुर्गंधही येत नाही. दररोज काही तास शूज उन्हात ठेवून तुम्ही हा उपाय अवलंबू शकता. ही एक स्वस्त आणि प्रभावी पद्धत आहे जी तुमच्या शूजला ताजेपणा देते.
2. बेकिंग पावडर वापरा
बेकिंग सोडा हा एक नैसर्गिक दुर्गंधीनाशक आहे जो ओलावा आणि गंध शोषण्यास मदत करू शकतो. त्यामुळे शूजचा दुर्गंध कमी करण्यासाठी बेकिंग पावडर उपयुक्त मानली जाते. बेकिंग पावडर तुमच्या शूजमध्ये जमा होणारे बॅक्टेरिया आणि घाण काढून टाकण्यास मदत करते. या उपायासाठी तुम्ही रात्री शूजमध्ये बेकिंग पावडर टाकून रात्रभर तसेच ठेवा. सकाळी शूजमधील बेकिंग पावडर काढून टाका. यामुळे शूजमधील दुर्गंधी लक्षणीयरीत्या कमी होईल. या प्रक्रियेमुळे शूजमधून येणारा दुर्गंधी दूर होते.
3. व्हिनेगर वापरा
पांढरा व्हिनेगर हा बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ आहे जो शूजचा दुर्गंध सहजपणे काढून टाकू शकतो. यासाठी स्प्रे बॉटलमध्ये व्हिनेगर आणि पाणी निक्स करून हे पाणी शूजच्या आतमध्ये स्प्रे करा. थोड्या वेळाने बॅक्टेरिया नष्ट होतील आणि शूजमधून दुर्गंधी नाहीशी होईल.
४. चहाच्या पिशव्यांचा वापर
शूजमधून दुर्गंधी कमी करण्यासाठी चहाच्या पिशव्या हा आणखी एक प्रभावी मार्ग आहे. कारण यात टॅनिन हे एक नैसर्गिक संयुग आहे ज्यामध्ये बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारे गुणधर्म असतात. यासाठी सर्वप्रथम उकळत्या पाण्यात चहाच्या काही पिशव्या उकळून घ्याव्यात. त्यानंतर चहाच्या पिशव्या काढून थंड होऊ द्या. ते थंड झाल्यावर त्यांना थोडा वेळ शूजच्या आत ठेवा. या पद्धतीमुळे शूजमधील दुर्गंधी तर दूर होईलच शिवाय ताजेपणाही येईल.
5. दररोज मोजे बदलणे
शूजच्या दुर्गंधीचे एक मुख्य कारण म्हणजे घामात ओले झालेले मोजे. शूजमधून येणारी दुर्गंधी दूर करण्यासाठी रोज मोजे बदलण्याची सवय लावा. एकाच मोज्यांचा वारंवार वापर केल्याने शूजमध्ये बॅक्टेरिया आणि घामाचा वास तसाच राहतो. दररोज नवीन आणि स्वच्छ मोजे परिधान केल्याने पायांची त्वचा स्वच्छ तर राहतेच शिवाय शूजमधून येणारी दुर्गंधीही दूर राहते.
